Submitted by अ. अ. जोशी on 20 February, 2014 - 07:40
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो
पानगळ असली तरी मधुमास होतो
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही
ते तसे होईल तेंव्हा खास होतो
तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो
फायदा नात्यातला चंद्रास होतो
केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी
स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो
बंधने तुडवीत जातो सहज सारी
हा तुझ्याइतका मलाही भास होतो
प्रेम इतके काय कामाचे जिथे की,
आपला वापर 'अजय' सर्रास होतो
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पर्श जितका बोलका हृदयांस
स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो
पानगळ असली तरी मधुमास होतो>>>>>>वा वा
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो>>>>>>क्या बात !
मक्ताही आवडला.
-सुप्रिया.
व्वा ! सुंदरच
व्वा ! सुंदरच
अनेक शेर , ओळी छान आहेत आवडली
अनेक शेर , ओळी छान आहेत आवडली
नात्यातला << ना त्यातला असे फोडून वाचले
फारच सुंदर..
फारच सुंदर..
सुप्रिया, अरविंद, वैभव, रमा
सुप्रिया, अरविंद, वैभव, रमा धन्यवाद..!
वैभव,
ना त्यातला... हेही जमू शकेल. पण, अर्थ बदलतो आहे त्याने. सूर्य जळतो आहे, तरी त्याचा फायदा चंद्रास होत नाही, असे म्हणणे बरोबर दिसणार नाही असे वाटते. असो. सुचविल्याबद्दल धन्यवाद.
फार छान.
फार छान.
'मधुमास' आणि 'त्रास' हे
'मधुमास' आणि 'त्रास' हे सर्वात विशेष वाटले.
कैलास, उल्हास धन्यवाद!
कैलास, उल्हास
धन्यवाद!
तू निघुन जातेस याची खंत
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
खुपच सुन्द्रर.........
अतिशय सुरेख आशयाची गझल. सगळे
अतिशय सुरेख आशयाची गझल. सगळे शेर आवडले.
काही काही तर खासच आहेत एकदम.
नेहाराजे६५, दक्षिणा धन्यवाद!
नेहाराजे६५, दक्षिणा धन्यवाद!
पहिले दोन आणि शेवटचा शेर
पहिले दोन आणि शेवटचा शेर मस्त.
ते कदाचित आई अर्थ होईल म्हणून तुम्ही टाळलं असेल. पण मग वेगळा शब्द पाहिजे. हे खटकतं आहे.
सूर्याच्या शेराची कल्पना लईच भारी आहे पण दुसरी ओळ पहिलीइतकी आणि आशयाइतकी खणखणीत आली नाहीये. नात्यातला हा शब्द अजिबात मदत करत नाहीय त्या अर्थाला. काही तरी करा. एक खूप चांगला शेर होईल. काय ते मुकम्मल का काय ते.
केवढी "माये " असं पाहिजे ते. ते "माया" लावण्यांमधल्या प्रसिद्ध " राया" सारखं वाटतंय.
बंधनाचा शेर कळला नाही.
पण एकूण छान आहे. मजा आली वाचायला.
त्रास आणि दास खूप
त्रास आणि दास खूप आवडले
धन्यवाद सर
पारिजाता, जयदीप
पारिजाता, जयदीप धन्यवाद.
पारिजाता,
>>> नात्यातला हा शब्द अजिबात मदत करत नाहीय त्या अर्थाला.<<<
कोणत्या अर्थाला...?
>>> केवढी "माये " असं पाहिजे ते. ते "माया" लावण्यांमधल्या प्रसिद्ध " राया" सारखं वाटतंय. <<
माया या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. माया हे नावही आहे. ते डोक्यातून काढून टाका. माया म्हणजे प्रेम, तसेच माया म्हणजे संपत्ती आणि माया हे 'मायावी' आणि आकर्षण असेही वापरता येते. त्यातील आकर्षण आणि मायावी अशा दोन्ही अर्थाने वापरले आहे.
धन्यवाद.
तेज देण्या केवढा बघ सूर्य
तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो
फायदा नात्यातला चंद्रास होतो
केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी
स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो >.
आवडले.