छुप्या जाहीरातींसाठीच्या लेखनाचा नमुनाअर्ज क्र. १

Submitted by Aseem Bhagwat on 15 February, 2014 - 21:38

छुप्या जाहीरातींना मान्यता असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. छुप्या जाहीराती कशाला म्हणावे याबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आद्य छुपेलेखक श्री सचिन पगारे यांनी प्रशस्त केलेल्या विहीत नमुन्यातच अशा प्रकारचे लिखाण केल्यास नंतरचे वादविवाद टळू शकतात हे लक्षात घेऊन इच्छुकांसाठी नमुना सादर करण्यात येत आहे. भावी छुप्या लेखकांनी याचा लाभ घ्यावा हा उदात्त हेतू आहे. यात गाळलेल्या जागी नेत्याने नाव आणि त्याची कामगिरी टाकली कि एक नवा लेख तयार होईल .
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमुना क्र. १

भारताचे आशास्थान श्री .................................

........................................................... करून ............................................... त्यावर टीका करणारा ........................................... सारखा नेता हा सध्याच्या काळात दुर्मिळच म्हणावा लागेल. . नाहीतर इतर पक्षाचे नेते “आपला तो बाब्या नि दुसऱ्याचे कार्टे” ह्याच न्यायाने वागताना दिसतात. ह्या पार्श्वभूमीवर ..........जींचे हे रूप भारतीय जनतेला दिलासा देणारे ठरले.

......................जी हे भारतीय राजकारणात आले हा भारतातील तरुणासाठी आशेचा किरण आहे .भारतातील भविष्यातील नेतृत्व हे .........जींच असेल ह्यात वाद नाही. आदरणीय ................जीं च्या स्वप्नातला भारत उभारण्यासाठी .................... प्रयत्न करत आहेत. हि मोठी गोष्ट आहे पण ...............जी हे आव्हान पेलतीलच ह्यात शंकाच नको.

देशावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी ................जीं मधील गुण हे प्रकर्षाने दिसून आले. मग ती ............. दुर्घटना असो कि इतर काही असो .विषय काहीही असो सदैव आक्रमक असणार्या नेत्यांच्या तुलनेत ..........जींचे शांत,संयमी, पण वेळप्रसंगी आक्रमक असे रूप हे सध्याच्या नेत्यांमध्ये अभावानेच पाहायला मिळते.

........................... दुर्घटनेच्यावेळी मदत करण्यामधील त्यांचा पुढाकार सार्या देशाने पहिला व जे केले ते कर्तव्य म्हणून त्यात आपण काही मोठे करतोय असला बडेजाव नाही.

.....................जी हे आज न उद्या देशाचे नेतृत्व करणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे हे त्यांच्या विरोधकांनाहि कळून चुकले आहे. ................... म्हटले कि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते नि ते गोबेल्स नीतीचा वापर करू लागतात. ज्यावेळी ........................... राजकारणात आले त्यावेळी हि हेच झाले. नंतर ............ आल्या तेव्हा हेच झाले. आणि आता ............जीं विरुद्ध हेच होते आहे.

निवडणुकीच्या रिंगणात जिंकण्यासाठी विरुद्ध पक्षाने नेहमी एककलमी कार्यक्रम राबवला तो म्हणजे ‘वैयक्तिक चारित्र्यहनन’. ......................तील प्रत्येक नेत्यावर पातळी सोडून टीका झाली पण मोठ्या मनाच्या ह्या लोकांनी संयम बाळगला. .............जी, .............जी नि ..............जी ह्यांच्या विरुद्ध होणारी हीन टीका जनतेला आवडली नाही नि त्यांनी विरोधकांना त्यांच्या योग्य जागी म्हणजे ...................... बसवले.

आपल्या ...........तील हा ............चा गुण ..........जीं मधेही आहे. त्यामुळे विरोधकांच्या फालतू टीकेला उत्तरे देण्यापेक्षा त्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करून लोकसेवेचे व्रत घेतलेल्या योग्याप्रमाणे त्यांचे कार्य अखंड चालू आहे.

आम्ही गरीब आहोत, आम्हाला कोणी मदत करत नाही, अशी भावना गरीब लोकात असते. हि दुर्बलतेची भावना उखाडण्याचा मोठा प्रयत्न ...............जीनि मोठ्या खुबीने केला. “............. हि एक ........ अवस्था आहे” असे ते म्हणाले. कारण आम्ही गरीब आहोत, आम्हाला कोणी वाली नाही अशी भावना हि माणसाला अधिकच दुर्बल करत असते हे ............जींना माहित आहे त्यामुळे गरिबांनी कणखर बनावे, मोठी स्वप्ने पाहायला शिकावे, हा त्यांचा हेतू होता.

गरिबांना फक्त सल्ले देवून काहीही होणार नाही हे त्यांना माहित होते म्हणून ..........................................., .............................., ............................ योजना ह्या ............ आखल्या / सुरू केल्या.

गरिबांना स्वस्तात अन्न मिळतेय हे पाहून विरोधकांनी हा पैशाचा अपव्यय आहे यासारख्या निरर्थक टीका करण्यास सुरवात केली. आपल्या ................. योजनेला साऱ्या देशाचा पाठींबा मिळेल अशा गैरसमजात असलेल्या .................जींना विरोधकांच्या विरोधाचे दुख वाटले. गरिबांना फायदा होईल अशा योजनेलाही विरोधक विरोध करतायत हे पाहून ..................जींना गरिबांसाठी संयम बाजूला ठेवला व विधेयकास विरोध असणार्यास खडसावून सांगितले.”गरिबांना अन्न उपलब्ध करुन देण्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैशांची उधळपट्टी होत नाही . गरिबांचे पोट भरणे हि बाब तुमच्यासाठी उधळपट्टी असेल माझ्या साठी नाही.”

....................योजनेसाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैशांची उधळपट्टी नसून देशातील नागरिकांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी ......................ने केलेला हा प्रयत्न असल्याचे ......................नी स्पष्टपणे सांगितले.

........................जींच्या भारतीय राजकारणातील प्रवेशापासूनच विरोधकांचे धाबे दणाणले आहे. ................जींवर सतत टीका होत असते. विरोधक त्यांचे सातत्याने चारित्र्यहनन करत आहेत.त्यांना नावे ठेवत आहेत. पण नावे ठेवणे हे सोपे असते नाव कमावणे हे कठीण असते हे ................जींना चांगलेच ठावूक असावे.

विरोधकांच्या टीकेला भिक न घालता ज्या धडाक्याने ..............जींचे ............., सर्वसमावेशक, गरिबांचे वाली असणारे नेतृत्व उदयास येत आहे ते भारतासाठी एक आशेचा किरणच ठरले आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमुना अर्ज कसा भरावा ?

१. थोडंसं स्वातंत्र्य घेता येऊ शकतं.
२. मीठ, मसाला इ. चवीपुरते टाकता येऊ शकतात
३. मूळ चौकटीला धक्का लागू नये.
४. नमुना अर्ज भरल्यानंतर लेख कसा तयार होईल यासाठी आद्यलेखकांच्या एका लेखाचे उदाहरण या लिंकवर पहावे
http://www.maayboli.com/node/45681. गाळलेल्या जागेवर त्यांच्या आवडत्या लेखकाचे नाव लिहीले असता आद्य लेखकाला हवा तसा लेख तयार झाला आहे. आपणही विहीत नमुन्यात आपल्या नेत्याचे नाव भरून थोडाफार बदल करून लेख प्रसिद्ध करू शकता.

वा!

Aseem Bhagwat,

कैच्याकै जब्बरदस्त नमुना आहे! भारताच्या जागी इटली ठेवा. ... च्या काही जागी बंगाबंगा बेर्लुस्कोनी ठेवा. तर अधून मधून मोलकरीण आणि माफिया हे शब्द पेरा.

मग बघा काय स्फोट होतो ते! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

नमुना देण्याची कल्पना चांगली आहे पण ढापलेली आहे.. विरु ह्या आयडीने त्याच धाग्यावर प्रतिक्रिया देताना सेम टू सेम हा नमुना वापरला आहे
http://www.maayboli.com/node/45681?page=

त्यावरूनच हि कल्पना सरळ सरळ ढापलेली आहे.

ये हुई ना बात !
बर्‍याच ( म्हणजे दोन चार ) दिवसात काही नवीन दिसले नाही ते.>>>>> सध्या एक मोठा लेख लिहण्याचे ठरवले आहे

सचिन पगारे

लिंक ओपन होत नाही. या आधी कुणी असा नमुना सादर केल्याचं मला तरी माहीती नाही, त्यामुळे ढापल्याचे गंभीर आरोप करू नयेत. अशा प्रकारच्या लिखाणाला परवानगी मिळाल्याने आणि असे लेख लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने गोरगरीब, अक्षरमित्र, अक्षरशत्रू, शब्दप्रभू, शब्दझेब या सर्वांनाच किमान प्रयत्नात कमाल लेख पाडता यावेत यासाठी एका उच्च सामाजिक उद्दिष्टांतर्गत हा उपद्व्याप केला. या पाठीमागे समाजसेवा हा एकमेव भाव होता. समाजसेवा करताना कुठे ढापाढापी झाली तरी ती क्षम्य समजली जाते. तरी देखील तुम्ही ज्या सदस्याचा उल्लेख केला आहे त्यांचे काही म्हणणे असल्यास अवश्य विचार करण्यात येईल.

त्यांच्या वतीने आपण दावा दाखल करण्याचे काही खास कारण ?

असीमजी तुम्हाला तर माहितच असेल पण इतर प्रतिसाद कर्त्यांनी " भारताचे आशास्थान राहुलजी गांधी" ह्या लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यातील ७ व्या पानावर विरु ह्या आयडीचा प्रतिसाद वाचवा त्यातून तुम्हाला कळेल ह्या नमुना कल्पनेचे खरे जनक विरु आहेत.हा लेख त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेवरून सरळ सरळ ढापलेला आहे.

समाजसेवा करताना कुठे ढापाढापी झाली तरी ती क्षम्य समजली जाते. तरी देखील तुम्ही ज्या सदस्याचा उल्लेख केला आहे त्यांचे काही म्हणणे असल्यास अवश्य विचार करण्यात येईल.>>>>>

कबुल केल्या बद्दल आभार (दर आये दुरुस्त आये).विरु ह्या आयडीचे सदस्यत्व रद्द झालेले आहे त्यामुळे त्यांचे काही म्हणणे असेल तरी ते प्रतिक्रिया देवू शकत नाही . तुम्ही माझा उल्लेख छुपेलेखक असा केला आहे तुमचा उल्लेख ढापे लेखक असा करावा का ?

अहो पगारेदादा
तुम्हाला छुपे लेखक म्हणायला मी सुरुवाट केलेली नसून छुप्या जाहीराती या धाग्यावर सर्वप्रथम छुप्या या शब्दाचा प्रयोग झालेला आहे. तसंच छुप्या या प्रकारातल्या जाहीरातींना व्यवस्थापनाने मान्यता देतानाच तुमचे लेख छुप्या प्रकारात मोडतात हे मान्य केलेलं आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. तर मग तुम्ही सुरुवात कुठून करणार ?

दुसरं म्हणजे वीरू यांचं सदस्यत्व रद्द झाले आहे किंवा त्यांनी काय लिहीले आहे याची मला कल्पना नाही. मी काही ढापलेलं नाही. पण समाजसेवेत असा प्रकार झाला तर चालू शकते असं मी म्हटलं होतं. आपल्याला ते समजेल अशीच माझी अपेक्षा होती. तरी देखील ज्याचे लेखन ढापले गेले आहे त्यानेच तक्रार करावी असे संकेत आहेत हे आपल्याला माहीत असेलच. एक तर तुम्ही वीरू यांची परवानगी आणा किंवा तुमच्याकडून मोठाच बावळटपणा झाला हे मोठ्या मनाने कबूल करा.

मूळ जनक Uhoh

तुमच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून सांगत नव्हतो. तुम्हाला लिखाणापासून दूर ठेवण्यासाठी कुठे तरी गुंतवावा असा एक व्यापक कट मायबोलीवर शिजला आहे. त्याचीच पहिली कडी म्हणून छुप्या जाहीरातींचा लेख आला. त्यात तुम्ही बिझी झाल्यानंतर तुम्हाला बेसावध ठेवून विरोधी लेख पाडावते आणि जमल्यास तुम्हाला प्रश्नोत्तरांमधे गुंतवावे म्हणून हा नमुना देखील त्याच व्यापक कटाचा भाग आहे.

तुमचं काही म्हणणं आहे का यावर ?

जनक हा शब्द वापरल्यावर व्यापक कट वैगरे शब्दांचे खेळ होणारच ह्याची कल्पना होतीच असो

.
तुमचं काही म्हणणं आहे का यावर ? अजिबात नाही. चालू द्या तुमच .

माझी व्यवस्थापकांना एक विनंती आहे कि मायबोलीवर अनेक सदस्य लेख लिहितात ते पाहून इतरानाही आपण हि काहीतरी लेख लिहावा अशी उर्मी दाटून येण्याची शक्यता असते त्यात काहीच गैर नाही पण काही सुचत नाही म्हणून इतरांच्या लेखनाचा नमुना घेणे प्रतिसादांवरून धागा निर्माण करणे असे प्रकार होतात. त्यामुळे एखाद्या सदस्याने इतरांनी दिलेल्या प्रतिसादांवरून धागे लिखाणाला परवानगी द्यावी जेणेकरू गोरगरीब, अक्षरमित्र, अक्षरशत्रू, शब्दप्रभू, शब्दझेब या सर्वांनाच किमान प्रयत्नात कमाल लेख पाडता येतील. ज्या सदस्यांचा आयडी रद्द झाला आहे त्यांच्या प्रतिक्रियेवरून लेख लिहिल्यास होणारे वादही टळतील. मायबोलीला अनेक होतकरू लेखक मिळतील ह्यात शंकाच नाही .

(हि प्रतिक्रिया कोणीही वैयक्तीक रित्या स्वतावर घेवू नये. होतकरू लेखकांना लेखन करणे सोपे व्हावे ह्यासाठी समाजसेवेच्या हेतूने हे लिहिलेले आहे)