Submitted by वैवकु on 15 February, 2014 - 11:48
आज माझाच मला दोष कळाला आहे
आणि माझा सगळा राग निमाला आहे
केवढी हौस तुला नित्यनव्या बाकांची
आणि मी एक जुनी ध्वस्त प्रशाला आहे
विश्व का हे इतके सावळलेले सारे
काय डोळ्यात तुझा रंग उडाला आहे
कोण घेईल तुझा शुद्ध दवाकारी मध
घेच पाहून खुळ्या ही मधुशाला आहे
डूब घे खोल कधी शक्य तुला झाले की
शोध घे कोठुन हा ओघ निघाला आहे
प्राणही आज मला निंबकडू लागावा
एवढी गोड तुझी ओढ मनाला आहे
एक माणूस तुझ्या आत उभा आहे जो
तोच माणूस तुला मूर्ख म्हणाला आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डूब घे खोल कधी शक्य तुला झाले
डूब घे खोल कधी शक्य तुला झाले की
शोध घे कोठुन हा ओघ निघाला आहे
प्राणही आज मला निंबकडू लागावा
एवढी गोड तुझी ओढ मनाला आहे
एक माणूस तुझ्या आत उभा आहे जो
तोच माणूस तुला मूर्ख म्हणाला आहे<<< व्वा
२ कळला नाही... बाकी सगळे
२ कळला नाही... बाकी सगळे आवडले...

डूब सगळ्यात जास्त आवडला...
मतला आणि शेवट्चे तिन्ही
मतला आणि शेवट्चे तिन्ही लाजवाब !!
एक माणूस तुझ्या आत उभा आहे
एक माणूस तुझ्या आत उभा आहे जो
तोच माणूस तुला मूर्ख म्हणाला आहे
व्वा. हा शेर जास्त आवडला.
अगदी अलगद सुरुवात आणि
अगदी अलगद सुरुवात आणि शेवटाला सांधते आहे गझल .
'ओघ' आणि शेवटचा शेर सर्वात
'ओघ' आणि शेवटचा शेर सर्वात विशेष वाटले.
वाह उस्ताद वाह.....आवडली!
वाह उस्ताद वाह.....आवडली!
एकदा वाचली. कुठलाच शेर कळला
एकदा वाचली. कुठलाच शेर कळला नाही.
थोड्या वेळाने परत वाचतो.
प्रथम वाचनात लय पकडण्यातही जरा कसरत करावी लागली.
सर्वांचे आभार खरेतर ह्या
सर्वांचे आभार
खरेतर ह्या रचनेतील विठ्ठलाचा शेर सोडून बाकीचे शेर कुणाला आवडतील ह्याची मला शाश्वती नव्हती म्हणून सर्वांचे विशेष आभार
खरे पाहता ही जरा जुळवाजुळवीची अधिक झाली ! (अक्षरगणवृत्ताचा प्रयत्न >>गालगा गाललगा । गाललगा गागागा<<) तीनच शेर गझलेत ठेवावेत असे झाले होते शेवटी 'मनाला'..चा शेर झाला मग थांबू म्हटले बाकीचे शेर निव्वळ वृत्ताच सराव म्हणून केलेत फक्त मधुशाला मध्ये वरच्या ओळीत अक्षरसंख्या गडबडली
जयदीप दुसरा शेर मलाही कळाला नाहीयेय क्षमस्व
मला स्वतःलाच आवडलेल्या शेरांबाबत सुप्रियातै +१
शेवटचा शेर विठ्ठलाचा आहे