Submitted by ashishcrane on 13 February, 2014 - 06:21
पटेल तुलाही
बघ गमावून कधीतरी... मग कमावणं कळेल
बघ विखुरलेलं कधीतरी... मग जमवणं कळेल
तू काय? मी काय? कुणीतरी चुकलंच असणार,
चूक कुणाचीही असली तरी, निष्कर्ष 'तुटणंच' असणार
'वळून पहावं तू' वाटत होतं जरूर, पण तो 'नियम' नव्हता,
क्षणाक्षणाला मरण जगलो पण तिथं यम नव्हता.
गुन्हेगारालाही मिळते गं एकदा बोलायची संधी
पण तुझ्याजवळ येणारे रस्ते आगीचे अन शब्दांना बंदी
पटेल तुलाही कधीतरी, गोष्टीला दोन बाजू असू शकतात,
एकच नाही कधीकधी दोन्ही बाजू बरोबर असू शकतात.
-- आशिष राणे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे!
छान आहे!