रोज

Submitted by ashishcrane on 13 February, 2014 - 06:12

रोज

image.jpg

हा 'रोज' रोजच येतो
हवं तर तुम्ही टाळून पहा,
भिंतीवरचं कॅलेंडर जाळून पहा,
हा 'रोज' रोजच येतो

तुम्हाला वाटो न वाटो, पटो न पटो,
'रोज' हा रोज श्वास घेतो,
'रोज' रोज काही ना काही देतो,
'रोज' नेहमीच विनापरवानगी नेतो

रोज काही ना काही घडते,
रोजच एक नवीन गाठ पडते,
एक जोडले की दुसरे मोडते,
सुटलेली गाठ...पिळ मागेच सोडते

रोज भास अन रोज आस,
त्याच त्याच आठवणींचा रोजरोज त्रास,
आठवणी सुखरूप अन 'रोज' नीटनेटका
'रोज'च्या गर्दीत मी नेहमी एकटा

'रोज' उथळ, 'रोज' गहिरे
'रोज' कोण?
'रोज' मी, तू, इत्यादी, वगैरे

-- आशिष राणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users