भारतात चांगल्या कलाकृतींना जीवन नाही अस मला सतत वाटत असतं. इथल्या लोकांची कलागुणांची पारख कमी पडतेय कि मुळात कलागुणांची आवडंच नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण असे आहे खरे …. आणि फिल्म च्या बाबतीत हे पूर्वीपासून घडत होते त्याहीपेक्षा आज ते त्याहीपलीकडे अजीजीने घडत आहे. म्हणुनच कदाचित 'The ship of theseus' सारख्या दर्जेदार फिल्म भारताच्याच निर्मात्यांना भारतात रिलीज करावा वाटत नाही. त्यासाठी कोणीतरी (किरण-आमिर खान) विशेष प्रयत्न घेऊन आपल्यासाठी म्हणून रिलीज करतात आणि इतकं होऊनही परदेशात गाजलेला सिनेमा त्याच्याच देशात भारतात चक्क आदळतो आणि वाईटटट आदळतो. (The ship of theseus बद्दल परत कधीतरी लिहेन…. आता जरा वेगळा विषय)
मला ना सतत अश्या सिनेमांच अप्रूप वाटत राहतं आणि १०० - २०० कोटींच्या घरात जाऊन गाजलेल्या सिनेमांपेक्षा या अश्या अप्रतिम असूनही दुर्लक्षित राहिलेल्या सिनेमांबद्दल कमालीचं आकर्षण कायम होत जातं…. हेच कारण असेल कि माझ्या झोळीत हिट नसूनही निव्वळ उत्कृष्ट दर्जेदार कलाकृती असणार्या फिल्म चा साठा आहे आणि सटर-फटर सिनेमे करोडोंच्या घरात खेळतात तेव्हा मनाला कुठेतरी बोचऱ्या जाणीव होतात. अश्याच कुठल्याश्या अप्रतिम पीस ऑफ सिनेमा ला आपण मरतांना पाहिलेलं असतं… आणि त्या फिल्म च्या पाठी असणाऱ्या संपूर्ण युनिट ची निराशा अश्या वेळी डोळ्यासमोर दिसत राहते. …… असो
हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे नाव चर्चेत राहूनही फारसा न गाजलेला न चाललेला परंतु आपण पाहिल्या नंतर आवर्जून बघाच अस प्रत्येकाला सांगावं वाटावं तशी इच्छा व्हावी अशी अप्रतिम कलाकृती असलेला हलका फुलका संवेदनशील सिनेमा 'ब्लू अम्ब्रेला' .एका मित्राने आठवण करून दिली आणि आधी पाहिलेला असूनही मागल्या आठवड्यात पुन्हा पाहिला … सिनेमा पाहतांना आणि त्याचं सुंदर सुरेल गाणं ऐकतांना पुन्हा एकदा त्या चिमुकल्यांच्या इवल्याश्या भावविश्वात रमून व्हायला झालं.
सिनेमाची कहाणी अगदी साधारण आहे पण तरीही दिलखेचक आहे. हिमाचल प्रदेश मधले रम्य असे लोकेशन, डायरेक्शन, पीक्चरायजेशन आणि ११ वर्ष वयाच्या एका गोड मुलीचा अभिनय तिचे भावविश्व हे सगळं न्याहाळतांना आपण कधी आत आत निघून जातो आणि त्या लहान मुलांच्या विश्वामधलेच एक बनून राहतो कळतही नाही. पंकज कपूर सारख्या कसलेल्या कलाकाराचा अभिनयसुद्धा त्या सोबत अनुभवायला मिळतो हे म्हणजे बोनसच.
एका पहाडी पाड्यावर राहणारी गोंडस, खोडकर मुलगी बिंदिया एकदा तिला एक जापनीज छत्री मिळते. (कशी ते सिनेमातच पाहावे) गावात कुणीही या पूर्वी तशी छत्री पहिली नसते. आणि मुख्य म्हणजे बिनिया या छत्री सोबत प्रचंड खुश असते. हि ख़ुशी आणि ती छत्री बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच पाड्यातला एक व्यापारी नंदू त्याला ती At any cost हवी असते. पुढे या दोघांची ओढा ताण सुरु होते आणि अश्यात सिनेमा एका छोट्या मुलीच्या मनाचा संवेदनशील आणि मेच्युअर प्रवास आपल्या घडवत राहतो.
२००७ साली आलेला विशाल भारद्वाज चा हा सिनेमा त्यांच्या बेस्ट सिनेमांच्या यादीत अग्रगण्य आहे. पटकथा,संवाद आणि संगीत विशालचच… कुठेही अतिशयोक्ती नसलेली उगाच रंजक म्हणुन जादुगिरी किंवा स्वप्नील विश्व नसलेली अतिशय नैसर्गिक आणि आसपास घडणारं, जवळचं वाटणारं असच सारं यात असल्याने सिनेमा मनात बसतो. त्यात म्युजिक आणि गाणी तोडीची आहेत गुणगुणायला लावणारी आणि मनात रेंगाळणारी आहेत. गाण्याचे बोल देखील अप्रतीम आहेत.
http://www.youtube.com/watch?v=3l2ppvz0SN0
मारधाड, रक्तरंजन अश्या सिनेमांना कंटाळला असाल किंवा खरच काहीतरी चांगलं पाहण्याची उर्मी मनात असेल तर 'ब्लू अम्ब्रेला' नक्की बघा.
हा फारच अप्रतिम सिनेमा आहे,
हा फारच अप्रतिम सिनेमा आहे, पण तुमचा लेख अगदीच 'अळणी' वाटला.
पंकज कपूरचा अभिनय म्हणजे बोनस वगैरे नसुन 'जान' आहे चित्रपटाची.
लिहू नका असे नाही म्हणणार पण कसेनुसेच झाले लेख वाचून.
हि मूळ गोष्ट 'रस्किन बोंड'
हि मूळ गोष्ट 'रस्किन बोंड' यांची आहे. इतकी सशक्त गोष्ट, होती तशी सांगितली हे विशाल भारद्वाज ह्यांचे श्रेय.
हो सीमंतिनी रस्किन बोंड
हो सीमंतिनी रस्किन बोंड यांच्या कादंबरी वर आधारित फिल्म आहे हि. आणि एखादी कहाणी जशीच्या तशी नुसते वाटले म्हणून मांडता येत नाही. त्यामागे मेहेनत हि असतेच…. कहाणी त्यापासून दूर अशी तशी मांडता येणे आपल्या सोयीनुसार बदल करणे फार कठीण नाही….सगळं मिळवून आणून जशीच्या तशी बनवून दाखवणे यात मेहेनत लागते.
लिहू नका असे नाही म्हणणार पण
लिहू नका असे नाही म्हणणार पण कसेनुसेच झाले लेख वाचून.>>>>>>>फकीर मी इथे हा लेख माझ्या लिखाणाचं परीक्षण करवून घ्यायला लिहिलाच नाहीये. एक अप्रतिम सिनेमा (तुमच्या म्हणण्याप्रमाणेही ) ज्यांनी पहिला नसेल त्यांनी पाहावा आणि एका अप्रतिम कलाकृतीला न्याय द्यावा याच एकमेव उद्देशाने लिहिलेला आहे. तुम्ही already पाहिलाय तेव्हा लेख दुर्लक्षित केला तरी चालेल
एका लेखामधे किती फॅक्ट्स
एका लेखामधे किती फॅक्ट्स चुकीचे आहेत ते तपासून पहा:
खोडकर मुलगी बिंदिया एकदा तिला एक जापनीज छत्री मिळते. <<< बिन्या. (बिनिया)
हिमाचल प्रदेश मधले रम्य असे लोकेशन, डायरेक्शन, पीक्चरायजेशन आणि ११ वर्ष वयाच्या एका गोड मुलीचा अभिनय >>>> पिक्चरायझेशन उर्फ सिनेमॅटोग्राफी : सचिन क्रिश्नन. गोड मुलीचे नाव : श्रेया शर्मा.
पटकथा,संवाद आणि संगीत विशालचच>>> पटकथा: विशाल भारद्वाज, अभिषेक चौबे, मूळ कथा रस्किन बॉन्ड (लेखात याचा उल्लेख नाहीच)
गाण्याचे बोल देखील अप्रतीम आहेत.>>> गुलझार.
पंकज कपूर सारख्या कसलेल्या कलाकाराचा अभिनयसुद्धा त्या सोबत अनुभवायला मिळतो हे म्हणजे बोनसच.>>> पंकज कपूर बोनस नाही, मूळ कथेमधली आणि चित्रपटामधला सर्वात महत्त्वाचा माणूस आहे.
२००७ साली याला नॅशनल अॅवॉर्ड मिअळाले होते (बेस्ट चिल्ड्रन्स फिल्म)
नंदिनी, ब्लू अंब्रेला २००७
नंदिनी,
ब्लू अंब्रेला २००७ साली प्रदर्शित झाला हे बरोबर आहे.
या चित्रपटाने अजिबातच व्यवसाय केला नाही, हेही बरोबर आहे.
लेखातल्या या दोन बाबींमध्ये काहीच चूक नाही.
नंदिनी, काही माहिती चुकीची
नंदिनी, काही माहिती चुकीची असेल पण नावं माहित नसणं किंवा न देणं ही तपशीलाची चूक होऊ शकत नाही गं
चिनूक्स +१
पंकज कपूरचा अभिनय बोनस नाही तर मूळ गाभा आहे असं मत दोनदा वरती वाचलं. माझंही मत तसंच आहे. पण तरीही मला असं वाटतं की प्रत्येकाचा चित्रपट बघायचा वेगळा नजरिया असतो, बघण्याचा संदर्भ वेगळा असतो, चित्रपटसाक्षरता वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रमाणात, परिमाणात भावतात. तेव्हा लेखिकेने तिचा दृष्टीकोन मांडला. तो तिच्यापुरता बरोबर असूच शकतो. इट्स ओके!
रस्किन बॉण्डची मूळ कथा न वाचताही एखाद्याला चित्रपट कसा भावू शकतो/नाही हे लक्षात आलं
वरदा,
वरदा,
>>>एका लेखामधे किती फॅक्ट्स
>>>एका लेखामधे किती फॅक्ट्स चुकीचे आहेत ते तपासून पहा: <<
हे कशाला ओढून ताणून.
इतके कुठले फॅक्ट्स चुकीचे आहेत. शेवटी प्रत्येकाचा मूवी बघण्याचा अनुभव व नजरीया असतो. तो तुमच्या अनुभवाशी मिळेलच कशावरून? ( व मिळावा हा अट्टाहास कशाला?)
हा मूवी बाकी सुंदर आहेच. एकंदरीत मला वाटले की माणसाच्या वृतीचे दर्शन दाखवतो. पंकज कपूरचे काम एकदम मस्त. लालची बनिया मस्त दाखवलाय. लहान मुलगी गोड.
मयी, लिहिलेलं आवडलं. मलाही
मयी, लिहिलेलं आवडलं.
मलाही असे अनेक चित्रपट आवडले, ज्यांची नावेही आता आठवत नाही, फक्त ती कथा, तो अभिनय, अजुनही मनात कुठेतरी खोलवर रुतुन बसलाय.
चित्रपट परिक्षण लिहिणे आणि प्रोफेशनली लिहिणे यात फरक असतोच,पण मग हंसाचे चालणे डौलदार म्हणुन बदकाने चालुच नये का? लिहित रहा. शुभेच्छा !
या निमित्याने चांगल्या चित्रपटांची ओळख होते, हेही माझ्यासारख्या चित्रपट निरक्षराला पुरेसे आहे.
अन्यथा न कळणार्या इंग्रजीत लिहीणारे कमी नाहीत, पण मला त्यांचा उपयोग नाही.
खरतर मी फार मोठी लेखिका नाहीच
खरतर मी फार मोठी लेखिका नाहीच आहे मी चाहती आहे. चांगल्या लिखाणाची, चांगल्या सिनेमांची, चांगल्या समजून घेणाऱ्या लोकांची.
आणि मग चांगलं चांगलं ते चांगल्या लोकांपर्यंत पोचवायचं असतं, पोचवायला लिखाण हा एकमेव मार्ग आहे माझ्याकडे…. मी लिहिलंय त्याचा मूळ मुद्दा सोडून त्यात सांगितलाय तो उद्देश सोडून माझ्या लिखाणाचंच परीक्षण करत बसण्याची गरज काय ??
असो …. लिखाण चांगलं नसेलही मी प्रयत्न करेनच पुढे. पण सिनेमा चांगला आहे नक्की बघा
मी आधीच बोलल्या प्रमाणे चांगल्या गोष्टींना भारतात लगेच सपोर्ट मिळत नाहीच ज्यांचा सपोर्ट इथे दिसतोय त्यांचे खरच मनापासून धन्यवाद
धन्यवाद वरदा, झंपी, चीनुक्स,
धन्यवाद वरदा, झंपी, चीनुक्स, विजय
मी पाहिलाय हा पिक्चर.
मी पाहिलाय हा पिक्चर. आजूबाजूला भरपूर बर्फ आणि त्यात ह्या मुलीचं लाकडी घर आठवतंय. स्टोरी खूप नीट आठवत नाहीये पण मला बहुतेक मध्यंतरानंतर जरा संथ वाटून बोअर झाला होता बहुतेक. पुन्हा बघायला हवा.
माझ्याकरता तरी परीक्षण महत्वाचं आहे. पटकथा, संगीत, संवाद कुणाचं आहे हे बघून मी आवर्जून पिक्चर बघेन असं वाटत नाही. पिक्चर बघूनही ह्य. गोष्टींकडे माझं लक्ष जाईलसं वाटत नाही.
मयी, स्टोरी अजून जरा खुलवून लिहिली असतीत तर चालली असती.
सायो :- सिनेमाला फार डिटेल
सायो :- सिनेमाला फार डिटेल अशी स्टोरी नाही फार साधीशीच स्टोरी आहे पण ती सिनेमात छान फुलवलेली आहे. नुसतीच स्टोरी नाही तर सिनेमात निर्माण केलेले वातावरण, निसर्ग सौंदर्य, कलाकारांचा अभिनय आणि त्या चिमुकलीच भावविश्व हे जास्त पाहण्यासारखं किंवा अनुभवण्या सारखं आहे. तेव्हा पुन्हा पाहणार असशील तर या दृष्टीकोनात शिरून बघ … नक्की आवडेल तुला
मी आधीच बोलल्या प्रमाणे
मी आधीच बोलल्या प्रमाणे चांगल्या गोष्टींना भारतात लगेच सपोर्ट मिळत नाहीच ज्यांचा सपोर्ट इथे दिसतोय त्यांचे खरच मनापासून धन्यवाद >>>>>>>>>> मी सध्या भारतात नाही, म्हणुन सपोर्ट करतोय कि काय?
मी सध्या भारतात नाही, म्हणुन
मी सध्या भारतात नाही, म्हणुन सपोर्ट करतोय कि काय?>>>>>>>> अगदीच तसं नाही हो .... आमच्या सारखे काही वेडे इथेपण आहेत ना
रस्किन बाँडची चित्रदर्शी अशी
रस्किन बाँडची चित्रदर्शी अशी ही कथा वाचली आहे.
चित्रपट संपूर्ण पाहता आलेला नाही. पण वरच्या लेखात या चित्रपटाबद्दल फारच कमी लिहिले आहे. लिहायचेच होते तर + इतका महत्त्वाचा+ आवडता चित्रपट आहे तर त्याबद्दल माहिती घेऊन लिहायला हरकत नव्हती.
त्या दुसर्या चित्रपटाबद्दल भरभरून लिहिले असे वाटले.
भरत मी भरभरून लिहिले तर
भरत मी भरभरून लिहिले तर तुम्ही काय बघणार चित्रपटात ?? मला स्वतःला कुठल्याही चित्रपटाचा संपूर्ण पट रिविल करणाऱ्या रीव्युज चा राग येतो. अश्या भरून लिहून संपूर्ण सिनेमा बघायची मज्जा घालवणाऱ्या रीव्युज मी वाचतच नसते. आणि कितीही लिहिले तरी ते तसे वातावरण थोडंच इथ निर्माण होणार आहे म्हणूनच सिनेमा वाचायचा नसतो तो बघायचा असतो.
हो रस्किन बॉंड, गुलझार अशी भारी भारी नावं मी घातली नाहीत.
सिनेमाऑटोग्रफी ला पिक्च्राइजेशन अस काहीबाही बोलले म्हणून तुम्ही सिनेमा बघू नये असं नाहीये …तुम्ही बघाच बघण्यात जास्त मज्जा आहे
चित्रपट शक्य होईल तेव्हा
चित्रपट शक्य होईल तेव्हा बघायचाच आहे. (तुम्ही म्हणताय म्हणून नव्हे). रसास्वाद म्हणून काही प्रकार असतो.
त्या दुसर्या चित्रपटाबद्दल
त्या दुसर्या चित्रपटाबद्दल भरभरून लिहिले असे वाटले.>>>>>>>>दुसरा कुठला ??
मला आवडला हा चित्रपट... फक्त
मला आवडला हा चित्रपट... फक्त स्पीड स्लो वाटला मला... पण अभिनयच्या बाबतीत दोघांचीही कमाल आहे...
मयी, आठवण करून दिली ते
मयी, आठवण करून दिली ते छानच.
हे नाव लक्षात होतं पण सिडी नाही मिळाली. ( र्हिदम हाऊस मधेही ) The ship of theseus पण नाही.
चांगले चित्रपट निदान या माध्यमाद्वारे तरी लोकांपर्यंत पोहोचावेत. अल पचिनोचा स्कारफेस हा जुना आणि मला खास न आवडलेला चित्रपट भारतातच नाही तर दुबईमधेही प्रामुख्याने डिस्प्ले वर होता.
मला पण वाटले परीक्षण लिहीले
मला पण वाटले परीक्षण लिहीले आहे म्हणून.
दिनेश, शिप ऑफ थीजीयस आता
दिनेश, शिप ऑफ थीजीयस आता ऑफिशिअली ऑनलाईन (फुकट) उपलब्ध आहे. त्यांच्या फेसबुकच्या पानावर त्याची लिंक मिळेल
मयी बाई लेख दुर्लक्षित करा
मयी बाई लेख दुर्लक्षित करा असे नसते म्हणायचे. सगळे गुडीगुडी, चांगले-चांगले प्रतिसाद हवेत का? पब्लिक फोरमवर तुम्ही काहीही प्रसिध्द केलेत की बर्यावाईट प्रतिक्रिया येणारच कि हो.
पंकज कपूरचा अभिनय बोनस म्हटल्याने थोडे पित्त खवळले होते बाकी काही नाही.
चित्रपटात सगळं गाव जेव्हा त्याला वाळीत टाकते ना तेव्हा त्याचं रडणं पाहवत नाही हो, अगदी खर्याहून खरा अभिनय तो हाच. तो सिन बघताना 'औरंगजेब हो या सिवाजी' रडणार नक्की. हे असं गदगदून रडणं रस्किन बॉन्डलाही नाही मांडता आलं की भारद्वाजच्याही डोक्यात नव्हतं(नसावं) मग म्हणून पंकज कपूर 'बोनस' का?
आणि मग चांगलं चांगलं ते चांगल्या लोकांपर्यंत पोचवायचं असतं>>> वपुल वाचा विपुल वाचा चा परिणाम का हो?
बाकी ते वरदा आणी चिनुक्सचे धन्यवाद का मानले आहेत आपण?
मयेकर, दुसर्या चित्रपटाबद्दल अगदी..
दिन्या नाय झेपणार बघ तुला
दिन्या नाय झेपणार बघ तुला थेअसिस-बिअसिस पण एक लेख नक्की त्यावर पाडशील माबोवर.
शिप ऑफ थिसिअस आणि अनेक बाकी
शिप ऑफ थिसिअस आणि अनेक बाकी चित्रपट इथे मोफत पाहता येतील. तसच १० मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान 'नया सिनेमा फेस्टिवल' ही रु. ९९९ भरुन बघता येईल.
http://www.cineoo.com/theatre
चित्रपट लहान मुलीची कथा आहे
चित्रपट लहान मुलीची कथा आहे ना? म्हणजे चित्रपटाची ती महत्त्वाची (केंद्र) भुमिका ना? का चित्रपट पंकज कपुरच्या व्यक्तिरेखेचा आहे? त्याच्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याला इतकं महत्त्व मिळालं असतं का?
कोण कशासाठी चित्रपट बघायला जाईल, हे कसं सांगता येईल? आणि कोणाला काय आवडावं, हे आपण कसं ठरवू शकतो?
मस्तच आहे ह सिनेमा!!!!! मला
मस्तच आहे ह सिनेमा!!!!! मला आठवतं, हा सिनेमा आला तेव्हा बळंच रूममेटलदाखयावला होता.. आधी यायला तयार नसलेली तीच नंतर सगळ्यांना तो बघायला सांगत होती!!
अजुन एक अशाच वेगळ्या धाटणीचा
अजुन एक अशाच वेगळ्या धाटणीचा इराणी सिनेमा मधे बघितलेला. नाव आठवतच नाहीये काही केल्या.. नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक छोटी मुलगी गोल्ड्फिश खरेदी करायला जाते अन तिची नोट उघड्या, वाळलेल्या पण गज असलेल्या गटारातपद्डते... मस्त सिनेमा होता तो पण!
Pages