या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे
कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावा
सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.
प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या
त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.
या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815
नोप.. काहीतरी कागदाचा
नोप.. काहीतरी कागदाचा प्रॉब्लेम दिसतोय.. दुसर्या दोन चित्रातही आले.. ३० डिग्री न ठेवताही.. ३०० जीएस एम चा हँडमेड पेपर आहे.
नंदिनी
सगळ्यांची चित्र चांगली
सगळ्यांची चित्र चांगली होताहेत.
नताशा- नक्की सांगू शकत नाही मात्र दुकानात पेपर स्टॅक करुन ठेवतात त्यावर वजन असेल आणि पेपर खेचुन काढले तर भारपडुन पेपर वर असे मार्क येतात , ते रंगवल्यावर त्या जागी रंग साचुन लाइन्स दिसतात.
हा चंद्रकोरीच्या चित्राचा
हा चंद्रकोरीच्या चित्राचा प्रयत्न. कसा आहे ते क्रुपया सांगा. चंद्रकोर अजून मोठी यायला हवी होती ना?
निर्मल- कोर ठिक आहे मात्र
निर्मल- कोर ठिक आहे मात्र रंगाचे पट्टे व्यवस्थीत ब्लेन्ड व्हायला हवे होते.
धन्स मंडळी. नंदिनी मास्टर
धन्स मंडळी.
बरं सांगायचं म्हणजे तुमच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन आज आम्ही पाच सहा माबोकर मिळून ठाण्याला छोटीशी जलरंग कार्यशाळा भरवली. फारच सुंदर उत्साह होता सगळ्यांचा.. मुख्य म्हणजे तुम्ही जो सगळ्यांना आत्मविश्वास दिला तो सगळ्यांच्या चेहर्यावर दिसत होता.
अर्थात या कार्यशाळेचे सगळे श्रेय तुमचेच... सविस्तर वृ येतोच आहे. .. तुम्हाला बोलवायचे होते पण तुम्ही बाहेरगावी आहात असे समजलेले.. पुढे मागे कधी तुमच्या मार्गदर्शनाखाली अशी प्रत्यक्ष कार्यशाळा भरवता येईल का?
नंदिनी मास्टर वगैरे काही नाही गं.. माझ्या चित्रात पर्स्पेक्टिव्हपासून काही चुका झाल्यात... चित्र पूर्ण होत गेले तसे कळत गेल्या.. बेसिक वॉश तेव्हढे बर्यापैकी जमलेत. आता खूप सराव करायचाय.
अजय, डेमो वगैरे खूप पुढची गोष्ट आहे हो.
निलू - आज मी मुंबईत आहे मात्र
निलू - आज मी मुंबईत आहे मात्र आज येणे शक्य झाले नसते, पुन्हा कधी गटग झाला तर बोलवा. मला वाटते की अजुन काही लेसन्स झाले तर सगळ्यानी येखाद्या स्पॉटवर भेटुन काम करायला हरकत नाही.
वृत्तांत येउद्या.
अजय, गजाननने वृत्तांत टाकला
अजय, गजाननने वृत्तांत टाकला आहे
http://www.maayboli.com/node/47826
नंदे... मास्टर कसचा... फार
नंदे... मास्टर कसचा... फार वर्षांनी रंगवण्यासाठी ब्रश हातात घेतला... आधी वॉटरकलर फक्त आणि फक्त एलिमेंटरी इंटरमिजियेट साठी नेचर काढण्यासाठीच वापरलाय. (अॅस्टर आणि जास्वंद.. एवढीच फुलं बरका त्यात)
पाटील.. समहाऊ.. निळा रंग तितकासा प्लेन बसत नाहीये.. त्याच कंसिस्टंसीने यलो बरोबर बसतो.. पण निळयात काहीतरी स्पॉट आल्यासारखे दिसत आहे.. असे का होत असेल??
हिम्सकूल- सगळ्या रंगांचे
हिम्सकूल- सगळ्या रंगांचे वॉशचे टेक्नीक सारखेच त्यामुळे फरक पडु नये, मात्र काही रंगाना ग्रॅन्युलेशन प्रॉपर्टी असते, म्हणजे यात काही थोडे जड पिगमेंटस असतात जे वेगळे होऊन रफ पेपरच्या खड्ड्यामधे सेटल होतात त्यामुळे येक पोत तयार होतो. cobalts, earths, ultramarine हे जनरली ग्रॅन्युलेट होतात.
कदाचीत हे कार्ण असू शकते.
हिम्या, जास्वंद मी पण रंगवली
हिम्या, जास्वंद मी पण रंगवली होती एलिमेंटरीसाठी. दुसरं फुल सदाफुली वापरलं होतं आम्ही.
प्रयत्न
प्रयत्न
:अ अओ :
:अ अओ :
आज फायनली पहिलं चित्रं रंगवून
आज फायनली पहिलं चित्रं रंगवून बघायला जमलं. आज वॉटर कलर पेपर न वापरता दुसरा एक हँडमेड पेपर वापरून बघितला. त्यावर रंग यवस्थित बसत नव्हता... बर्याच चुका पण केल्यात. पण कुठे चुक होतेय /काय चुक होतेय ते कळंतय. थोड्या वेळात अपलोड करेन चित्र. अजून एकदा तेच चित्र करून बघेन
नेहेमीच्या ऑइल आणि
नेहेमीच्या ऑइल आणि अॅक्रेलिकच्या कॅनव्हासवरच्या सवयीप्रमाणे कारण नसताना एकदा रंगवलं तरी परत पाणी वापरून किंवा रंग वापरून उगीचंच ब्रश फिरवला गेलाय बर्याच ठिकाणी. त्यामूळे काही ठिकाणी धब्बे पडलेत तर काही ठिकाणी रंगच दिसत नाहीये.
अल्पना, छान आलेय. कागदाने
अल्पना, छान आलेय.
कागदाने खूप फरक पडतो.
अजय, तुम्ही दिलेले
अजय, तुम्ही दिलेले डोंगररांगांचे चित्र माझे असे झाले.
वर एक ढग काढायचा प्रयत्न केलाय. आलीकडच्या रांगा गडद करण्यासाठी किंचित काळा मिसळत गेलो. पण त्याने वॉशमधला एकजीनसीपणा कमी होतोय असे वाटले.
झाडं खूप सुरेख आलीत.
झाडं खूप सुरेख आलीत.
अल्पना, घरं, कुंपणं आंणि वाट
अल्पना, घरं, कुंपणं आंणि वाट खूप मस्त!
जीडी, आवडलं चित्र.
फार भितभित चित्र अपलोड करते
फार भितभित चित्र अपलोड करते आहे. मला वॉटरकलर्सची अतोनात भिती आहे. सोप्पं वाटेपर्यंत चित्र बिघडतानाचा अनुभव खूप आहे. यातही असेच झाले! नेहेमी जमणारे ४ वाले पक्षीच जमले नाहीत इथे!
मार्करने काढायला हवे होते.
[म्हणजे बाकीचे जमले आहे असे नाही, तर निदान पक्षी जमतील अशी खात्री होती मला! ]
अजय, केवळ तुम्ही टप्प्याटप्प्याने मस्त समजवले आहे म्हणून हे करायचं धाडस करू शकले. मस्त वाटतेय!
कागद हँडमेड वगैरे नाहीये. साधा जरा जाड स्केचिंगसाठीचा आहे बहुधा.
बस्के सेम पिंच. मला पण
बस्के सेम पिंच. मला पण जलरंगांची खूप भिती वाटते. मी याआधी पुस्तकांमध्ये बघून जलरंगामध्ये चित्र रंगवायचे बरेच असफल प्रयत्न केले होते.
शेवटी ये अपने बस की बात नही म्हणत परत जलरंगांच्या वाटेला जायचं नाही असं ठरवलं होतं. इथे पाटलांनी खूपच सोप्या शब्दात आणि अगदी प्रत्येक पायरी दाखवत, होणार्या चुकांबद्दल आधीच सांगत शिकवल्यामूळे परत जलरंग हातात घेतेय.
हो गजानन, आज दुसरा कागद वापरणार आहे.
अल्पना, गजा, मस्तं बस्के,
अल्पना, गजा, मस्तं
बस्के, दुसरा योग्य कागद वापरल्यावर हेच चित्र अजून छान येईल बघ. मलाही कागदाचा प्रकार किती महत्वाचा असतो ते ह्या कार्यशाळेमुळेच कळलं. शाळेत साधे ड्रॉइंग पेपर्स दिले जात आणि कॉलेजात गेल्यावर कारणाकारणाने कॉलेजसाठी पोर्ट्रेट्स काढावी लागली ती डायरेक्ट कॅनव्हासवरच/माऊंट बोर्डवरच (त्याची पण काहीच माहिती नव्हती).
मायबोली, ह्या कार्यशाळेमुळे जी काही १ पैसा कला होती त्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळत आहे. अजयही वेळात वेळ काढून आमच्यासाठी मेहनत घेत आहेत, आमच्या बाळबोध, मठ्ठ प्रश्नांनाही प्रचंड सहनशील राहून उत्तरं देत आहेत.
मायबोली हॅपन्ड टू मी फॉर गूड, बेटर, बेस्ट
अल्पना- चांगले होतेय खास करुन
अल्पना- चांगले होतेय खास करुन आकाशाचा वॉश छान झालाय
बस्के , मस्त बोल्ड काम होतेय.
गजानन - काळा मिसळ्या ऐवजी तोच रंग गडद केलात तर जास्त चांगले. काळा या स्टेजला टाळा. बाकी झाडं उत्तम.
सर्वांच्या सहभागामुळे आणि प्रोत्साहनामुळे खुप छानं वाटते. धन्यवाद.
थँक्स अजय! केश्वि, हो का? आता
थँक्स अजय!
केश्वि, हो का? आता योग्य तो पेपर शोधावा लागणार.. मायकल्स मध्ये मिळेल का बरं? :|
हे झपाटलेपणच आहे!
बस्के, मिळून जाईल हे बघ.
बस्के, मिळून जाईल
हे बघ. http://www.michaels.com/on/demandware.store/Sites-Michaels-Site/default/...
अरे , थँक्यु! मी आर्ट
अरे , थँक्यु! मी आर्ट सेटमध्ये शोधत होते मघाशी..
अजय, ओके. धन्यवाद. सिंडरेला,
अजय, ओके. धन्यवाद. सिंडरेला, अश्विनी, शैलजा, धन्यवाद.
माझा सराव..
माझा सराव..

गजा आणि अंतराचे चित्र आवडले.
गजा आणि अंतराचे चित्र आवडले.
बस्कू. कमॉन. मस्त काढलं आहेस. पण अजून प्रॅक्टीस कर.
कार्यशाळा वाचायलासुद्धा फार मजा येतेय. मस्तच उपक्रम आहे!!!
आज अचानक आठवले, मिनोतीने
आज अचानक आठवले, मिनोतीने लिहीले आहे ते स्टोअर माझ्या घरासमोरच आहे. ब्लिक आर्ट सप्लाईज.. (काय अमेझिंग दुकान आहे!!) मग तिकडे जाऊन कागद,ब्रश, रंग आणले. परत एकदा चित्र काढले आहे. रंग उठावदार दिसतायत. (त्यामुळे चुकाही उठून दिसतायत.)
अगदी शेवटी रस्त्याने घात केला.
अंतरा, चित्रात त्रिमिती मस्त
अंतरा, चित्रात त्रिमिती मस्त आलीये. पुढे झुडपे, मागे घर त्याही मागे डोंगर हा परीणाम मस्त साधलाय. ढग पण आवडले.
Pages