या लेखात आपण काही मुलभूत जलरंगाच्या वॉशेस आणि तंत्राबद्दल चर्चा करुया
जलरंगात शिकवला जाणारा आणि महत्वाचा वॉश म्हणजे फ्लॅट वॉश , नावाप्रमाणेच रंगात काहीही बदल न करता येकसंध येका रंगाचा वॉश.
आपल्याला हवा तो रंग पॅलेट मधे काढुन त्याच्यात पाणी ब्रशने पाणी अॅड करत जायचे , साधारण पणे पहील्या वॉश साठी २५ ते ३०% रंग आणि बाकीचे पाणी असा रंग तयार करावा. ( रंग , कागद या प्रंमाणे यात फरक पडेल)
आपल्याला जेव्हढा कागद कव्हर करायचाय तेव्ह्ढा किंवा त्याहुन जास्त रंग तयार असावा कारण पॅलेट मधला रंग संपला तर पुन्हा बनवताना तशीच कंसिस्टन्सी राहील असे नाही.
वॉटरकलर करताना आपला पॅड/बोर्ड साधारण १५ ते २० अंशात पकडावा जेणे करुन रंग खालच्या दिशेने वाहिल पण ओघळणार नाही.
मोठा (१२ नं राऊंड्/किंव फ्लॅट ) ब्रश रंगाने पुर्ण लोड करुन आडवा रंगाचा पट्टा कागदावर लावावा
त्याच्या खाली डावी कडून थोडा ओव्हरलॅप करुन दुसरा , तिसरा असे पट्टे मारत हवात्या भागापुरता वॉष पुर्ण करावा. ब्रश मधे कायम रंग असला पाहीजे नाहीतर रंगात वेरीएशन येइल, येका भागत पट्टा पुर्ण झाल तर परत परत तीथे रंग लेपन करु नये
ग्रेडेड वॉश- जर रंगात हळू हळु पाणी वाढवीत नेले तर रंग गडद ते फिका असे ग्रेडेशन मीळते. हा झाला ग्रेडेड वॉश. रंगलेपनाची पद्धत फ्लॅट वॉश प्रमाणेच
रिव्हर्स ग्रेडेड वॉश , यात पाण्या ऐवजी रंगाचे प्रमाण वाढवीत न्यायचे
variegated वॉश यात दोन रंगांची सरमीसळ करावी लागते
पहिल्यांदा कागदावर दोन रंगांचे पट्टे मधे थोडी जागा ठेऊन मारायचे (फ्लॅट वॉश प्रंमाणे) आणि नंतर ब्रश धुउन, साफ ओल्या ब्रशने हे पट्टे येक् मेकात मिसळायचे. हे मिसळताना कागद /बोर्ड आण्खी तिरका /वर्ची बाजू खाली/खालची बा़जू वर असा हालवावा, याने दोन्ही पट्टे व्यवस्थीत येक मेकात मिसळतात
हे वॉशेस मारताना जर पातळ रंग किंवा पाणी पड्ले तर ते वॉशेस खराब होतात , याला कॉलिप्फ्लॉवर इफेक्ट असे म्हणतात. काही चित्रात टेक्चर तयार करायला याचा वापर होतो , मात्र इतरवेळी हे टाळावयास हवे
कलर लिफ्टींग - रंग थोडा ओला असतानाच साफ ब्रश पाण्यात बुडउन स्पंज किंवा कापडाने टीपून घ्यावा. त्या ओल्या ब्रशने आपण हवा तिथला रंग काढू शकतो. रंग खुप ओला असताना कलर लिफ्ट कराय्ला गेल्यास कॉलीप्लॉवर तयार व्हायची शक्यता असते म्हणुन थोडा रंग सुकू द्यावा, मात्र पुर्ण सुकल्यावर रंग लिफ्ट करणे कठीण असते खास करून रंग staining असेल तर.
कलर लिफ्ट करताना कागद खराब हॉनार नाहि इतपतच ब्रशचा भार द्यावा
सॉफ्ट्नींग - रंग लेपन केल्यावर त्याच्या बाहेरील भागाच्या कडा ओळ्या ब्रशने सॉफ्ट करण्याच्या या तंत्राचा बराच वापर होतो.
आता मी येक जादू करणार आहे , सगळ्याना त्यांच्या बालपणात ट्रांस्पोर्ट करणार आहे
आपण सगळयांनी लहानपणी घर, आकाश, डोंगर, रस्ता , पक्षी (४ , ४ आकड्यांचे) असे लँड्स्केप काढले असेल.
तेच लँडस्केप आपण या बेसि़क ट्क्नीक्सनी काढणार आहोत.
प्रथम खालील स्केच साधारण क्वार्टर साईझ हँड्मेड पेपर वर काढुन घ्या
पॅलेट मधे , कोबाल्ट ब्लू, लाल, गँबोज किंवा लेमन यलो, ऑकर यलो असे रंग काढुन घ्या/ हे रंग नसतील तर दुसरे त्याच्याशी मिळते जुळते रंग घ्या
त्यानंतर घर वगळून क्षितिजा पर्यंत कोबाल्ट ब्लू चा फ्लॅट वॉश द्या.( १२ नं ब्रश)
तो वॉश ओला असतानाच gamboge yellow ने पुढचा पट्टा मारा.
पुढे ब्लू आणि gamboge yellow येकत्र करुन तयार होणार्या हिरव्या रंगाचा वॉश कंटीन्य करा .अशाने चित्राचा बहुतेज भाग रंगउन होईल.
आता घराचा भाग (छप्पर सोडुन ) ऑकर यलोने रंगवा , अजुन आपला पहैलाच वॉश असल्याने सगळ्या रंगाची कंसिस्टन्सी ३० टक्के रंग+ ७० % पाणी अशीच ठेवा
आता आकाशाचा निळा रंग सउकला असेल. पॅलेट मधे निळा+ थोडा लाल मिक्स करुन जांभळा रंग १२ नंबर ब्रशनेच डोंगराकडे लाउन घ्या.
रत्यावरचा हिरवा रंग थोडा लिफ्ट करुन घ्या
घराचे छ्प्पर यलो+लाल रंगात रंगवा
पॅलेट मधे तयार हिरव्या रंगात थोडा नीळा अॅड करा, हे थोडे दाट झालेले रंग घेऊन घरा मागे फॉलिएज रंगवा
फॉलिएज / डोंगराचा थोडा खालचा भाग सॉफ्ट करा
हे चित्र सुकु द्या.
त्यानंतर चार नंबर राऊंड ब्रशने लाल,निळा+ हिरवा असे मिश्र्ण करुन लिनिअर ,कॅलिग्राफी स्ट्रोक्स्ने रस्ता , घराचा दरवाजा ,कुंपण इत्यादी काढुन तसेच ४ वाले पक्षि रंगवुन चित्र संपवा. कूठेही चित्रात बारीक काम किंवा कोरत बसु नका.
साधारण तिन टप्प्यत आप्ण हे चित्र केलेय, कुठेही फार डीटेल्स न टाकता वॉटर्कलर्रस च्या प्रॉप्रटीजचा वापर करुन हे चित्र सहज करता येते.
हे चित्र तुमच्या मित्र मैत्रिणीना देऊन त्यानाही त्यांच्या लहानपणात घेउन जायची जादु तुम्ही करु शकता.
या आठवड्यात अशा वॉशेस तसेच सोप्या चित्राचा सराव करा
या आधिचे लेख
जलरंग तोंडओळख , तयारी http://www.maayboli.com/node/47445
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
पुढिल लेख
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815
धन्यवाद सर्वांचे..... गजानन न
धन्यवाद सर्वांचे.....
गजानन न सन्कुल मास्त होतय...
बॉक्स बोर्डवर काढून बघितलं.
बॉक्स बोर्डवर काढून बघितलं. कागद लूज पडला नाही. मास्किंग टेप आणायला विसरले त्यामुळे नुसताच पेपर पॅडवर ठेवून काढलं.
अश्विनी के , वा मस्त !
अश्विनी के , वा मस्त !
छान झालय अश्विनी के..... मूड
छान झालय अश्विनी के.....
मूड मस्त जमलाय... झोपडी तेवढी पडेल अस वटतय......
गजानन, अश्विनी मस्तच
गजानन, अश्विनी मस्तच
हा लेखही मस्तच... अश्या
हा लेखही मस्तच... अश्या प्रकारे शाळेत कुणी शिकवलीच नाही चित्रकला.
गजानन, तुझं चित्र मस्त. 'फिअर फाईल्स' / 'होनी अनहोनी' / 'डर' - अश्या नावाच्या एखाद्या मालिकेच्या टायटल मॉण्टाजला पर्फेक्ट फिट होईल. रंगसंगतीमुळे रात्रीची वेळ, सुनसानपणा, आसपास चिटपाखरू नसणे, भीतीदायक शांतता - असा इफेक्ट आलाय.
आशू, गवताचं शेडिंग मस्त जमलंय. डोंगरांवर उजवीकडे नंतर ब्रश का मारलायस?
झोपडी तेवढी पडेल अस
झोपडी तेवढी पडेल अस वटतय......>>>
डोंगरांवर उजवीकडे नंतर ब्रश का मारलायस? >>> अगं तिथलं फॉलिएज आणि डोंगरात काही फरकच दिसेना. त्यामुळे तिथल्या डोंगरातला रंग उचलला. उचलताना काहीतरी लोच्या झालाय.
छान चित्रे आहेत सगळ्यांची..
छान चित्रे आहेत सगळ्यांची..
उचलताना काहीतरी लोच्या झालाय>>
असा लोच्या माझ्या चित्रात जागोजागी झालाय
म्ह्णून इथे चित्र टाकायचं धाडसंच होत नाहिये
अंजली, बिन्धास्त टाक.
अंजली, बिन्धास्त टाक. पाटीलसरांकडून ते लोच्ये कसे टाळायचे ते कळेल ना!
आपण सरांपुढे चॅलेंज उभं करणार आहोत ह्याची त्यांना कल्पना असेलच 
अश्विनी
अश्विनी
अंजली i am with you.. ....
अंजली i am with you.. .... माझा पण same problem ..water color +handmade paper हे combination इतके कठीण आहे हे माहित नव्हते.खूप सराव चालू आहे ..आई ला कळत नव्हते काय चालले आहे...
बर्याच प्रयत्नां नंतर water color मी काढलेले पहिले स्केच...
हायला! माझ्या आत्ता लक्षात
हायला! माझ्या आत्ता लक्षात आलं की मी उडणारे कावळेच नाही काढले!
अंतरा, छान आहे की! तुझ्या घराबाहेर उतरत्या छपराआड गेलेला एक दिवा असावा असं वाटतंय त्या खिडकीच्या वर.
एकच चित्र किती जणांनी वेगवेगळ्याप्रकारे रंगवलंय
धन्यवाद अश्विनी...पेपर च्या
धन्यवाद अश्विनी...पेपर च्या दोन्ही बाजू वर पेंटींग करता येते का हे माहित नव्हते. ४/५ क्वार्टर साइझ पेपर वर सराव केला.त्यानंतर काढलेले दुसरे स्केच आहे. पहिले सुपर फ्लॉप ..आता पण पोस्ट केलेले स्केच लहान पेपर वर काढले आहे आणि त्या मध्ये पण चूका आहेत असे वाटते आहे..water color शाळे( सातवी) नंतर आता वापरते आहे .कलर मिक्सिंग ,कलर लिफ्टिंग ,कलर सॉफ्ट करणे अवघड वाटते आहे. पण ह्या जलरंग कार्यशाळे मुळे बरेच शिकायला मिळते आहे.धन्यवाद मायबोली.कॉम ,पाटील सर..
ए छान आलंय की अंतरा चित्र
ए छान आलंय की अंतरा चित्र तुझं! मलाही तसंच वाटतंय की लहान पेपरवर अगोदर सराव करुन मग मोठ्या पेपरवर काढले तर अंदाज येईल.
गजानन - चांदोबाचे चित्र
गजानन - चांदोबाचे चित्र चांगले झालेय , खासकरुन चंद्रकोर व्यवस्थीत पांढरी सोडलीय, झाडाचे स्ट्रोक्स ही छान.
सन्कुल- व्यवस्थीत आहे चित्र, झाडे दोन सुटी न दाखवता थोडी ओवरलॅप , थोडी चंद्रावरुन येती त्र अधिक चांगले दिसले असते.
अश्विनी के/अंतरा - वॉशेस छान येतायेत , बाकी हळु हळु शिकुया.
सगळ्यांबरोबर माझीही उजळणी होतेय , हा माझा फायदाच.
चित्र/वॉशेस निट येण्यासाठी
१) सुरुवात छोट्या कागदापासुन करा, मोठाले वॉशेस कंट्रोल करणे कठीण होते
२) भरपुर रंग तयार करा, रंग कमी पडला तर , पुन्हा बनवेपर्यंत आधिचा पट्टा सुकु शकतो, रंगाच्या कंसिस्टनसी मधे फरक पडु शकतो
३)येकाच भागावर पुन्हा पुन्हा काम करु नका, येकाच ब्रश स्ट्रोक मधे जास्तीत जास्त भाग रंगवायचा प्रयत्न करा.
४) येखाद्या जागी थोडीशी चुक झाली तर परत जाऊन करेक्ट कर्त बसलात तर वॉश बिघडाय्चे चान्सेस जास्त , त्यापेक्षा छोटिशी चुक असेल तर दुर्लक्ष करा
आणि खुप प्रॅक्टिस करा.
धन्यवाद सर
धन्यवाद सर
अश्विनी के - ते "सर" प्लिज
अश्विनी के - ते "सर" प्लिज नको.
आणि येक छोटिशी टीप , जर भारतीय हँड्मेड कागद खुप पाणी पीत असेल तर फेविकॉलचा अगदी पातळ हात मारुन बघा. सुकल्यावर चांगले काम होते त्यावर
अजय, धन्यवाद. चित्र
अजय, धन्यवाद. चित्र रंगवण्यापूर्वी तुम्ही दिलेल्या सूचनांची उजळणी केल्यावर बराच फायदा होतो.
फेव्हिकॉलवर रंग बसतो हे माहीत नव्हते. कागदावर फेकॉचा पातळ हात कसा मारतात यावर थोडे सविस्तर सांगाल का, प्लीज? सध्यातरी कागदाने भरपूर पाणी पिणे हे माझ्या पथ्यावर पडते आहे (फायद्याचेच ठरते आहे). त्यामुळे सध्या फेकॉची गरज पडेल असे वाटत नाही. पण हो, या पेपरला मी अगदी पहिल्या प्रयत्नाच्या वेळेलाच सलाम ठोकला! किती पाणी सहन करतो पठ्ठ्या! न कुरकुरता...
मृण्मयी, चिनूक्स, अन्विता, सौरभ, इंद्रा, ललिता, धन्यवाद.
छान आहेत सगळ्यांची चित्रे.
छान आहेत सगळ्यांची चित्रे. माझे सामान यायला अजून एक आठवडा लागेल.
एक बाळ्बोध प्रश्न - हॅन्डमेड
एक बाळ्बोध प्रश्न - हॅन्डमेड पेपर च्या दोन्ही बाजू वापरता येतात का ?..
अंतरा, मला तरी त्याच्या
अंतरा, मला तरी त्याच्या दोन्ही बाजू सारख्याच वाटतात. :प
माझ्या कडे मॅट पॅड आहे. पेपर
माझ्या कडे मॅट पॅड आहे. पेपर च्या दोन्ही साइड वरचे texture वेगळे वाटते आहे.
गजानन - फेविकॉल खुप पातळ
गजानन - फेविकॉल खुप पातळ म्हणजे जवळ जवळ पाण्यासारखा करुन मारावा लागतो. हे या पेपरवर sizing ( याला मराठी शब्द काय आहे?) म्हणुन काम करते. तुमचा वॉश ठीक येतोय म्हणजे पेपर आहे तसाच चालेल.
अंतरा - सोप्पे उत्तर , दोनही बाजु चालतील
अधीक डीटेल्ड उत्तर - पेपरची जी बाजु जास्त दाणेदार /रफ ती बाजू वॉटरकलरसाठी चांगली. जर ब्रँडेड पेपर असेल तर ज्या बाजुला पेपरचे नाव एम्बॉस असते , वाचता येते ती योग्य बाजु.
काही पेपरची उदा . Canson Vidalon ची येकच बाजुला ग्रेन्स असतात त्यावर येका बाजुला वॉटरकलर जमते.
आपल्या कामासाठी /प्रॅक्टीस साठी दोन्ही बाजु वापरुयात
अजय हा खालील ढगाचा इफेक्ट कसा
अजय हा खालील ढगाचा इफेक्ट कसा काढता येइल ?
सन्कुल - वेट अँड वेट टेक्निक
सन्कुल - वेट अँड वेट टेक्निक ने करता येते , सॉफ्टनिंग ने करता येते. पुढच्या लेखात कव्हर करणार आहे
Thank you...
Thank you...
या लेखातली शेवटची दोन चित्र /
या लेखातली शेवटची दोन चित्र / एक्झरसाईज.




स्केच
वॉटर कलर शक्यतो बॅक टु फ्रंट आणि लाईट टु डार्क असे रंगवत जायचे म्हणुन सगळ्यात मागचा (दुरचा) आकाशाचा भाग कोबाल्ट ब्लू ने ग्रेडेड वॉश मधे रंगवला.
हा वॉश पुर्ण सुकल्य्वावर उजविकडच्या इमारतीचा भाग ब्लु+थोडासा लाल+ थोडा बर्न्ट सिएना अशा मिश्रणाने रंगवला. प्रत्य्के स्तेप मधे आपण चित्र पुर्ण सुकू दएणार आहोत . घरी काम करत असताना लवकर वॉशेस सुकवायचे असतील तर हेअर ड्रायर वापरता येतो.
ऑकर यलोनी अगदी उजवी कडचा इमारतीचा भाग रंगवला. त्याल जोडुन खाली बर्न्ट सिएज्ञा ने जमिनिकडचा भाग बहरुन काढला
निळा रंग ( अल्ट्रामरीन) आणि लाल किंवा थॉदा ऑरेंज घेउन पातळसा रंग बनवला त्याने येक हाति घरावरची आणि जमिनीवरची सावली रंगवली. सावलीवर्चह्या भागवर परत परत न रंगवता येक हाती काम करणे म्हत्वाचे
शेवटी वरच्या सावलीचया रंगात अजुन रंग वाढउण थोडे दाट मिश्रण बनउन डावी कडे घराचा थोडा भाग /खांब असे काढुन चित्राला डेप्थ देउन चित्र संपवले.
ज्याना वरचे चित्र करायला अजुन कॉन्फिडन्स नाही त्यांनी खालचे चित्र करायला हरकत नाही. हा वॉशेसचा उत्तम सराव होऊ शकतो.




कागदावर कोबाळ्ट ब्लु ने आकाश ग्रेडेड वॉशने रंगवले
हा रंग सुकल्यावर अजुन थॉदा ब्ले रंग अॅड करुइन येक पर्वत रांग ग्रेडेड वॉश मधे रंगवली.
अशा रीतीने येक येक रंग सुकु देत थोडा कोबाल्ट /अल्ट्रामरीन अॅड करत अजुन दोन पर्वत रांगा केल्या. या सगळ्यासाठी १२ नं राऊंड ब्रश चालेल.
हे सुकल्य्वार शेवटी अजुन दाट रंग बनउन झाडं रंगवली. झाडाची खोडं बारीक ब्रशने खालुन वर अशा रेषा खेचुन केली.
haapy painting
ल्वकरच पुढच्या लेखात अजुन कही टेक्निक्स बद्दाल चर्चा करुया.
वॉव, धन्यवाद अजय ! दोन्हीही
वॉव,
धन्यवाद अजय ! दोन्हीही चित्रं करून बघायची उत्सुकता लागली आहे.
4"x6" Fluid water color
4"x6" Fluid water color paper.
I tried using 180gsm Indian Handmade paper but something is not right. I will give it another try tomorrow.
लिंबोणीच्या झाडामागे -

डोंगर रांगा -

अजय, दोन्हीचित्रात काहीतरी गंडलेय काय ते कळत नाहीये.
CalAA-kaar - बहुतेक तुम्हाला
CalAA-kaar - बहुतेक तुम्हाला रंगाचे प्रमाण वाढवावे लागेल . पहिल्या वॉश मधे २५ ते ३०% रंग आणि बाकी पाणी हे प्रमाण असे लिहले असले तरी पेपर किती पाणी /रंग अॅब्जॉर्ब करतो त्या प्रंआणे हे थोडे कमी अधीक होते.
Pages