Submitted by आनंदयात्री on 31 January, 2014 - 01:24
तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते
कितीही व्यापुनी जागा, रिकामेपण तुला येते
जरी आशा-निराशेला भिकार्याचे जिणे देतो
तरीही सोबती कुणि ना कुणी कायम पुन्हा येते
म्हणालो, 'हे असे का'? - तर म्हणाले, "मागणी आहे"!
अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते?
भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते
कुणी जगतात अस्सल तर कुणी मरतात निष्ठेने
तशी बहुतेक सार्यांना हजेरीची कला येते
ऋतूही कोरडे सारे, दिशाही ओस पडलेल्या
अशा निष्प्राण जगण्याला विरक्तीची नशा येते
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/01/blog-post_31.html)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भराभर श्वास घेण्याने गरज तर
भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते>>> मस्तच
मस्त मतला . >>म्हणालो, 'हे
मस्त मतला .
>>म्हणालो, 'हे असे का'? - तर म्हणाले, "मागणी आहे"!
अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते?..>>
खूप सुंदर .
तुझ्या आकाश होण्याच्या
तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते

>>
आवडलं हे जास्तच!
ऋतूही कोरडे सारे, दिशाही ओस पडलेल्या
अशा निष्प्राण जगण्याला विरक्तीची नशा येते
>>>वाह!
तुझ्या आकाश होण्याच्या
तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते
कितीही व्यापुनी जागा, रिकामेपण तुला येते<<< व्वा! (यात्री, ह्या दोन ओळींचा क्रम बदलला तर मतला अधिक प्रभावी होईल का? विचारावेसे वाटले. आहे तसाही आवडलाच आहे).
भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते
कुणी जगतात अस्सल तर कुणी मरतात निष्ठेने
तशी बहुतेक सार्यांना हजेरीची कला येते<<< वा वा
आह!! सगळे शेर आह् आहेत
आह!! सगळे शेर आह् आहेत एकदम
मस्त
धन्यवाद ह्या गझलेसाठी
>> भराभर श्वास घेण्याने गरज
>>
भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते
<<
वा!
गझल ग्रेटच
गझल ग्रेटच
गझल मस्तच. मतला आणि 'रुबाबाची
गझल मस्तच.
मतला आणि 'रुबाबाची मजा..' खूप आवडले.
विरक्तीची नशा..
विरक्तीची नशा.. मस्त!
ओळींच्या क्रमाच्या बाबतीत बेफी+१
नचिकेत, १०० % आवडली. रुबाब,
नचिकेत,
१०० % आवडली. रुबाब, नशा भन्नाट्च!
जयन्ता५२
गझल अतिशय सुरेख आहे.. पण मतला
गझल अतिशय सुरेख आहे.. पण मतला सर्वोत्तम वाटला.
क्लासिक शेर आहे तो. पुन्हा पुन्हा वाचतो आहे.
वा वा अख्गी गजल आवडली
वा वा अख्गी गजल आवडली नचिकेत
<<म्हणालो, 'हे असे का'? - तर म्हणाले, "मागणी आहे"!
अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते?>>
किती सहज आहे... मजा आया
बेफिजींच्या पोस्ट शी सहमत
बेफिजींच्या पोस्ट शी सहमत
सर्वांचे आभार! पहिला शेर
सर्वांचे आभार!
पहिला शेर मलाही खूप आवडलाय... बेफि, तुमची सूचना छानच आहे... अजून ठरलं नाहीये त्यावर माझं काही