Submitted by बेफ़िकीर on 28 January, 2014 - 00:56
पोचले आहे कुठे हे दैव भटके आपले
आपले झालेत परके आणि परके आपले
चांगल्या कित्येक गोष्टी शिंपडे आभाळ हे
छप्पराचा दोष नाही नेत्र गळके आपले
गाजलेले शिल्प होणे साधले नाही कधी
गाजले जे काढले मी रोज टवके आपले
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
काय आहे राहिले माझ्यातुझ्यामध्ये तसे
पण तरी उडतात वारंवार खटके आपले
एकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले
एकमेकांशी कधी ना शब्द साधा बोललो
केवढे फोफावले पण वाद लटके आपले
लोक सारे 'बेफिकिर' दिसतात वरकरणी भले
आतुनी जळतात बघुनी शील मळके आपले
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा ! अप्रतीम... निवडक १०
व्वा ! अप्रतीम...
निवडक १० मध्ये...
सर... खूप आवडली ही गझल
सर... खूप आवडली ही गझल सुद्धा!!!
>>
गाजलेले शिल्प होणे साधले नाही कधी
गाजले जे काढले मी रोज टवके आपले
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
काय आहे राहिले माझ्यातुझ्यामध्ये
तसेपण तरी उडतात वारंवार खटके
आपलेएकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले >>
व्वा !!!
मक्ता भन्नाट ! गझल अतिशय
मक्ता भन्नाट !
गझल अतिशय आवड्ली.
धन्यवाद !!
मस्त!!!
मस्त!!!
काय आहे राहिले
काय आहे राहिले माझ्यातुझ्यामध्ये तसे
पण तरी उडतात वारंवार खटके आपले >>> व्वा ! छानच.
एकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले >>> मस्त.
मक्ता सर्वात खास.
हलकेच्या शेरासाठी
हलकेच्या शेरासाठी सलाम..
.
सुप्पर गझल.
गाजलेले शिल्प होणे साधले नाही
गाजलेले शिल्प होणे साधले नाही कधी
गाजले जे काढले मी रोज टवके आपले
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
सुरेख!
बेफिकीर, गझल आवडली. पण
बेफिकीर,
गझल आवडली. पण प्रतिसाद काय द्यावा कळत नाहीये.
ओळ ओळखीची भासे तरी अनोळखी वाटे गझल ही
आणू तरी कुठून हिजसाठी प्रतिसाद नेमके आपले
आ.न.,
-गा.पै.
टवके, हलके व मळके हे 3 फारच
टवके, हलके व मळके हे 3 फारच आवडले.
>>चांगल्या कित्येक गोष्टी
>>चांगल्या कित्येक गोष्टी शिंपडे आभाळ हे
छप्पराचा दोष नाही नेत्र गळके आपले
व्वा !!!
apratim... kevaL apratim,
apratim... kevaL apratim, bephikeer (some problem with my explorer , can't type in Marathi
)
खुपच सुरेख !! बिशेषतः हे दोन
खुपच सुरेख !!
बिशेषतः हे दोन शेर फारच आवडले
काय आहे राहिले माझ्यातुझ्यामध्ये तसे
पण तरी उडतात वारंवार खटके आपले
एकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले >>>> हा म्हणजे कहर आहे !!
वर आलेल्या इतक्या चांगल्या
वर आलेल्या इतक्या चांगल्या प्रतिसादांचा आदर ठेवून इतकेच म्हणेन की
एकंदरीत, मला वैयक्तिकपणे ही गझल तुमच्या नेहमीच्या गझलांपेक्षा थोडीसी डावी वाटली.
एकट्याने झुंजल्याच्या कौतुकासाठी तरी
लागते कोणीतरी माणूस खमके आपले
आणि
गाजलेले शिल्प होणे साधले नाही कधी
गाजले जे काढले मी रोज टवके आपले
वरील दोन्ही शेर सुरेखच झाले आहेत.
बाकी,
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
लोक सारे 'बेफिकिर' दिसतात वरकरणी भले
आतुनी जळतात बघुनी शील मळके आपले
==>
वरील दोन शेरांमधले खयाल सुंदर आहेत पण
'गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी' या मिसऱ्यात 'हा' हे अक्षर value addition करत नाहीये त्यामुळे भरीचे वाटतेय असे माझे मत आहे.
'मळके' वाल्या शेरात दोन वृत्ताच्या सुटी ( आतुनी, बघुनी ) झाल्यामुळे मजा थोडी कमी होत आहे.
थोडे मोकळेपणाने लिहीले ,गैरसमज नसावा.
शुभेच्छा.
वृत्ताच्या सुटी<<<जरा
वृत्ताच्या सुटी<<<जरा गोंधळलोच! बाकीच्या ओळींचे जे वृत्त आहे तेच आहे इथेही मग वृताच्या सुटी असे फाटक साहेब का म्हणताय्त कळेना
मग लक्षात आले की कदाचित अश्या शब्दाना कालबाह्य शब्द ठरवण्याचा जो मतप्रवाह सध्या रूढ होवू पाहत आहे त्या प्रभावातून आलेले हे वक्तव्य असेल म्हणून आतून आणि बघून हे शब्द वृत्तात बसणार नाहीत म्हणून आतुनी आणि बघुनी असे करणे म्हणजे वृत्ताची सूट घेणे असा अर्थ असावा
...काहीतरीच आपले ! उगाचच कुणीतरी काहीच्या काही काढलेला मतप्रवाह !!
गझलेत नेमकी भाषा असावी कशी ह्या बाबत अजून लोकांच्या मनात संभ्रम असल्याचे आणि नसतील त्याच्या मनात निर्माण करणारा मतप्रवाह !!
मला हे लोक भाषा आणि तिचा कवितिक वापर ह्या बाबतीत कच्ची मडकी वाटतात अगदी !
माझे दोन शेर असे होते
तुला कुठे सोडवायला सांगतोय कोडे
सहज म्हणालो जगायला हिंट दे जराशी
कुणी म्हणाले की सांगतोय हा शब्द अन्यूज्युअल आहे प्रमाण भाषेनुसार नाही म्हणे
तर..
हरेक व्यक्ती मलाच पत्ता विचारिताहे
मला कुठे वाट माहिताहे तुझ्या घराची
कुणी म्हणाले विचारिताहे आणि माहिताहे हे शब्द कालबाह्य आहेत वगैरे वगैरे
लोकाना नेमकी कुठली भाषा कालबाह्य वाटते कुठली अन्यूज्युअल आणि का ..कश्यामुळे ..ह्याला काही ठोस पाया आहे काय
शब्द कालबाह्य अन्यूजुअल नसतात आपण ते वापरतच नाही आपण ते वापरायला उघाचच नकार देतो आणि हे सुंदर सुंदर आणि नेमके शब्द भाषेतून कधी तडीपार होतात कळत नाही ....मला फार वाईट वाटते !!!.
.दोष शब्दांचा नसतो वापरणार्यांचा असतो
आतुनी आणि बघुनी हे चुकीचे शब्द नाहीत हे खास कवितीक शब्द आहेत मराठीतले आणि अश्याप्रकारे वापरली की अतीशय गोड बनतात क्रियापदे आणि कवितेचा गोडवाही वाढवतात
तद्वत ..जातोय येतोय दिलाय घेतलाय अशी रूपेही तितकीच सुंदर आहेत
(माझ्या माहितीप्रमाणे बंगाली व उर्दू अश्या काही भारतीय भाषांत कवितेची अशी खास वेगळी भाषा आहे म्हणजे भाषा वापरण्याची पद्धत खास शब्द वगैरे कवितेसाठीची खास आणि बोलाचालीसाठीची वेगळी असे आहे असो..आपण मराठी लोकांनी ज्ञानेश्वर पचवला नाही..नीट चावलागिळलाच नाही तिथे इतरांची काय कथा म्हणा !!!) )
गरज इतकेच पाहण्याची आहे की एकंदर गझलेच्या भाषेचा बाज /शब्दकळा असे शब्द वापरायला अनुरूप आहे की नाही इतकेच !
बेफीजींनी आजवर अनेक शेरांत असे शब्द आतुनी बाहेरुनी वगैरे वापरलेत आणि फार उत्तमपणे ..सहजपणे ..कुठलीही जुळवाजुळव तर अजिबातच जाणवली नाही मलातरी
उलट मलातर वाटते की बेफीजींच्या शब्दशैलीचा हा एक सिग्नेचर पार्ट आहे असे शब्द आले की शेर बेफीजींचा असावा हे ओळखू येण्या इतपत ..आणि इतरांनी वापारले तर बेफीजींचा हा प्रभाव असावा असे मानण्या इतपत !!
असो
मला काय !!
तो 'हा' हा शब्दही भरीचा नाहीयेय्च
पण हेही असो!
मला काय !!!!
मी आपला माझा एक शेर आठवू पाहिला
अशी कशी भूमिका वठवतोस विठ्ठला तू
निवांतुनी वाट पाहणे विश्व संपण्याची
वाह च्यायला काय शब्द सुचला होता "निवांतुनी" !! किती कर्णमधूर आहे हा !!
असो मी चलतो .....
_________________________________
फाटक साहेब आपल्याला काही म्हणत नाही आहे त्या मतप्रवाहाला म्हणतोय ..प्लीज गैरसमज नसावा
धन्यवाद
धन्यवाद
bahot khoob
bahot khoob
गंध वार्याने तुझा हा आणला
गंध वार्याने तुझा हा आणला माझ्या घरी
शेवटी नाते निघाले फार हलके आपले
छान..
पण बेफिजींच्या नेहमीच्या गझलेपेक्षा थोडी कमी वाटते.
आतुनी जळतात बघुनी शील मळके
आतुनी जळतात बघुनी शील मळके आपले ! वाह !