प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

Submitted by सावली on 26 January, 2014 - 12:07

प्रजासत्ताक दिन परेड - मरीन ड्राईव्ह

अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध कार्यक्रम. प्रचंड गर्दी असूनही व्यवस्थित सुरक्षा चेक करूनच प्रवेश मिळाला.
खुप क्रिएटीव फोटो नाहीत, जिथे जागा मिळाली तिथुन शक्य होईल तसे काढलेले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो, बघितले तरी अंगात जोश संचारतो.
(पिकासा वगैरे बाह्य सुविधा न वापरता) मायबोलीवरच इथे दिल्याबद्दल धन्यवाद Happy

धन्यवाद Happy
मी ट्रेननेच आणि एकटीच गेले होते.
सकाळी ६:३४ फास्ट ने. पावणे आठला चर्चगेट. निघताना मात्र रथ परेड संपायच्या आधीच निघाले. रथ बघण्यात इंटरेस्ट नव्हते आणि नंतरची गर्दी झेलायची इच्छाही नव्हती.
अरे जिप्सी, तुम्ही समोरच्या रस्त्यावर होतात! मी खुर्च्या ठेवल्या होत्या तिथे, सर्वात पहिल्या रांगेत चक्क जमिनीवर बसले होते. ( अगदी फुटभर जागेत बसुन होते)
येस!! मुंबईत परेड झाली आणि ती बघता आली याचाच कित्ती आनंद Happy

येस!! मुंबईत परेड झाली>>> माझ्या आठवणीप्रमाणे शिवाजी पार्कला पुर्वी परेड व्हायची/ झालेली आहे. आता ती २६ जानेवारी की १५ ऑगस्टला ते आठवत नाहीये. १५ ऑगस्टला पावसामुळे परेड होण्याची शक्यता कमीच... अर्थात्, दर वर्षी महाराष्ट्रदिनाला शि.पा.त परेड होते.

मी पण लहानपणी गिरगावात परेड पाहिल्याचं अंधुकसं आठवतंय. रस्त्याच्या कडेला उभं राहून समोरुन चाललेल्या परेडमधील केस वर जाळीत बांधलेल्या स्त्रिया (कुठल्या ग्रूपमधल्या होत्या माहित नाही) पाहून जोरात ओरडत हातवारे करत बाबांना म्हणाले होते, "त्या बघा कितीतरी इंदिरा गांधी!" Uhoh मला कुठे लपवू असं बाबांना झालं होतं बहुतेक, कारण लगेच त्यांनी मला घेऊन तिथून कलटी मारली होती.

परवा फेबुवर वाचलं मी की मरीन ड्राईव्हला परेड ठेवून गोंधळ केलाय त्यापेक्षा शिवाजी पार्कच बेस्ट होतं वगैरे वगैरे. काय होता खरा प्रकार सावली?

नाय नाय आडो, शि.पा.चं आवजाव घर तुम्हारा झालेलं आहे. कुठे काही नाही मिळालं की या शि.पा.त..

२६ जानेवारीच्या परेडसाठी मरीन ड्राईव्हच बेस्ट जागा होती. एकतर मोठे आणि सरळ रस्ते, प्रेक्षक व्यवस्थेसाठी मोठा फूटपाथ, लोकांना जाण्या-येण्यासाठी सोईस्कर (चर्चगेट-व्हिटी दोन्ही सुरुवातीची स्टेशनं म्हणून) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथून सगळ्या परेड विधान भवनात येऊन संपणार अशी व्यवस्था होती. त्यामुळे त्यांना राजकीय पाहुण्यांचीही सुयोग्य व्यवस्था करता आली.

शि. पा. चे माहीत नाही
पण म. ड्रा. परेड साठी बेस्ट जागा वाटली. कारणे तीच मंजूडीने लिहीलेली.
प्रत्येकाला सिक्यु. चेक करुन सोडायचे असल्याने बहुतेक रस्ते बंद होते, त्यामुळे मात्र काही लोकांचे हाल झाले. बहुतेक पहिल्यांदाच इथे परेड झाल्याने लोकांनाही रस्ते बंदचा अंदाज आला नव्हता शिवाय ऑथॉरिटीज न योग्य प्रकारे त्याची जाहिरात /माहीती प्रसारित केली नसावी.
रस्ते बंद तर गणपतीच्या काळातही होतात, तेव्हाचे प्लॅनिंग इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर चांगले करता येते आता.

ओके मंजूडी आणि सावली Proud ते लिहिणार्‍यातला एक जण प्रभादेवी भागातला आहे म्हणून असं म्हणतोय की काय असं वाटलं मला Wink

Pages