Submitted by बेफ़िकीर on 23 January, 2014 - 01:03
मृत्यू येणारच आहे समजावत बसलो
मी देहाला सारे काही मानत बसलो
पंख मलाही होते हेही कळले नाही
पिंजर्यातल्या अवकाशाला चिवडत बसलो
एकटेच घेण्याची इच्छा मेल्यावरती
सोबतीस घेऊन स्वतःला पाजत बसलो
रस्ता जेथे वळला तेथे वळलो नाही
रस्त्याला अपुल्या बाजूला वळवत बसलो
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो
ज्यासोबत सर्वांनी विवाह केला होता
त्या जगण्याची रखेल मी कुरवाळत बसलो
चिंता वारेमाप वाढल्या माझ्या आता
फुका जगाला 'बेफिकीर' मी बनवत बसलो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> सारवली जी जमीन ती परक्याची
>>
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो
>>
हा शेर सर्वांत जास्त आवडला सर.
एकटेच घेण्याची इच्छा
एकटेच घेण्याची इच्छा मेल्यावरती
सोबतीस घेऊन स्वतःला पाजत बसलो
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो
चिंता वारेमाप वाढल्या माझ्या आता
फुका जगाला 'बेफिकीर' मी बनवत बसलो
व्वा.... क्या बात है!
गझल फार आवडली. सारवली जी जमीन
गझल फार आवडली.
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो
काय शेर आहे.
खूप आवडली
खूप आवडली
गझल चांगली आहे पण मला माफ करा
गझल चांगली आहे पण मला माफ करा आज जरा कमी आवडली
तसा कुठलाच शेर कमी चांगला नाही सगळेच चांगले शेर आहेत पण मी मघास्पासून जरा वेगळ्याच विचारात गुरफटलो आहे सर..मुद्दा तसा निव्वळ तांत्रिक आहे म्हटले तर बिनमहत्त्वाचाही आहेच पण तरीही काय वाटते आहे ते मनमोकळेपणे संगून पाहतो
मला ह्या रचनेत काही काफिये जमीनीची मस्त मजा देवून गेले काही फार कमी मजा देवून गेले समजावत मानत पाजत आणि कुरवाळत हे जास्त भिडले बाकीचे कमी !! ते बाकीचे मला वेगळ्याच जमीनीचे असल्यागत वाटत बसले आहेत
ह्याचे कारण असे की माझे लक्ष अलामत असलेल्या व्यंजनाच्या आधीच्या व्यंजनांवर रेंगाळत बसले आहे त्या जांगांवरही आ हा स्वर पाळला किमान दोन मात्रा इतके मोजमाप असलेले एकच अक्षर ....तर जमीनीची मजा अजून वाढेल का असे सारखे वाटत आहे
स्वाभ्यास म्हणून मी स्वतःपुरते काही बदल करून पाहिलेत ते मी इथे द्यावे म्हणतो,,
प्लीज गैरसमज नसावा ..गृहपाठाची वही आपल्याला तपासायला देत आहे असे मानावे प्लीज
_____________________________
मृत्यू येणारच आहे समजावत बसलो
मी देहाला सारे काही मानत बसलो
पंख मलाही होते हेही कळले नाही
पिंजर्यातल्या आकाशाला मागत बसलो
एकटेच घेण्याची इच्छा मेल्यावरती
सोबतीस घेऊन स्वतःला पाजत बसलो
रस्ता जेथे वळला तेथे वळलो नाही
आपल्याच हेक्यावरती मी चालत बसलो
सारवली जी जमीन ती परक्याची होती
घरातली माती माझ्या टवकारत बसलो
ज्याच्यासोबत लग्न लागले उभ्या जगाचे
त्या जगण्याची रखेल मी कुरवाळत बसलो
चिंता वारेमाप वाढल्या माझ्या आता
फुका जगाला "बेफिकीर मी!!" सांगत बसलो
_____________________________
आपल्या ऋणाईत
~वैभव
अरे वा! बेफिकिर मस्तच!
अरे वा! बेफिकिर मस्तच! माझ्यासारख्याला देखील ही गझल का काय ते आवडली.
फार च छान
फार च छान
सह्ही!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!
गृहपाठाची वही आपल्याला
गृहपाठाची वही आपल्याला तपासायला देत आहे
वैभव, हे सगळे काही विचारपूस मध्येही करता येतेच की.
असो, आपण जे काही बदल सुचवले ते चांगले असले तरी ते विचारपूर्वक कोणताही कसलेला गझलकार करू शकतो.
सुमार शेराचा शेर करणारा बदल असेल तर बदलाची आवश्यकता असणे वेगळी गोष्ट.
आपल्यात देवपूरकरांचा हा गुण येऊ नये ही सदइच्छा ठेवतो.
समीर
सारवली जी जमीन ती परक्याची
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो>>>मस्तच
स ला म !! प्रत्येक शेर
स ला म !!
प्रत्येक शेर भिड्ला .
धन्यवाद !!
पहिले दोन शेर खूप आवडले.
पहिले दोन शेर खूप आवडले.
सारवली जी जमीन सुध्दा छान आहे
बदल सुचवण्यासंदर्भात समीर यांच्याशी सहमत
वैवकु, १. या संकेतस्थळावर
वैवकु,
१. या संकेतस्थळावर सारेच गझलकार तोलामोलाचे आहेत. कोणी गृहपाठ दाखवणारा विद्यार्थी नाही वा कोणी छडी उगारू पाहणारा शिक्षक नाही. दिलखुलासपणे मते मांडण्याचा अधिकारही स्थळाने सर्वांना दिलेला आहे हा अनुभव आपल्यालाही आहेच.
२. दुसर्याच्या शेरात बदल सुचवणे हे आपण सहसा करत नाहीच. मीही ते इतरांच्या बाबतीत फारतर तांत्रिक बाबींपुरते किंवा अगदीच काही वेगळे सुचले तर करतो. तरीही मला असे वाटते की सगळीच गझल किंवा अनेक शेर बदलण्याचे सुचवणे हे जर्रासे नियंत्रीत झाले तर अधिक चांगले वाटावे.
कृ गै न. दुरुस्ती किंवा मसलत करण्याइतकी कमजोर गझल असेल तर तसे केलेले अधिक योग्य ठरते.
आपल्या सुचवण्यांबाबतः आवडलेल्या व न आवडलेल्या अश्या दोन्ही बाबी कारणांसहित लिहायचा प्रयत्न करतो.
पंख मलाही होते हेही कळले नाही
पिंजर्यातल्या आकाशाला मागत बसलो<<<
येथे आपण चिवडत बसलो ऐवजी मागत बसलो असे केले आहेत. बहुधा आपल्याला 'मी पिंजर्यातल्या अवकाशाकडे पंखांची मागणी करत बसलो' असे म्हणायचे असावे. मला तसे म्हणायचे नव्हते. चिवडणे ह्यातून 'एक तीच तीच कृती निव्वळ निर्बुद्धपणाने किंवा नकारात्मक मनोवृत्तीने' केली जाण्याची जी छटा आहे ती अधिक गहिरेपण आणते असे वाटते. पंख मागत बसलो हे खूप थेट व मला अभिप्रेत नसलेले असे आहे.
रस्ता जेथे वळला तेथे वळलो नाही
आपल्याच हेक्यावरती मी चालत बसलो<<<
येथे आपण माझ्या 'रस्त्याला आपल्या बाजूला वळवण्या'च्या इच्छेऐवजी 'स्वतःच्याच हेक्याने वागणे' असे सुचवले आहेत. येथे पूर्ण मुद्दा बदलत आहे. नुसतेच स्वतःच्या हेक्याने वागणे म्हणजे एकट्याने चालत राहणे! रस्त्याला आपल्याबाजूला वळवणे म्हणजे इतरांनाही आपल्याच मार्गाने चालावयाला लावण्याची जबरदस्ती (असफल जबरदस्ती) करत राहणे! आशा आहे की मूळ मुद्दाच बदलणे हे अयोग्य आहे हे आपल्याला पटेल.
सारवली जी जमीन ती परक्याची होती
घरातली माती माझ्या टवकारत बसलो<<<
टवकारणे हे क्रियापद सहसा 'कान टवकारणे' अश्या प्रकारे योजले जाते. तुम्ही बहुधा त्या शब्दाचा ध्वनीपरिणाम (साऊंड इफेक्ट) गृहीत धरून तो येथे योजला आहेत. म्हणजे सारवलेल्या मातीचे टवके पडतात / काढले जातात तसे काहीसे! ते व्याकरणदृष्ट्या योग्य ठरणार नाही. तसेही, माझ्या व तुमच्या शब्दरचनेत शब्दांचा क्रम व 'उकरत' ऐवजी 'टवकारत' हे (चुकीच्या अर्थाचे) क्रियापद सोडल्यास काही बदललेले दिसत नाही.
ज्याच्यासोबत लग्न लागले उभ्या जगाचे
त्या जगण्याची रखेल मी कुरवाळत बसलो<<<
येथे मला एक गोष्ट आवडली व एक नाही आवडली. आवडले हे, की तुमची पहिली ओळ (ज्याच्यासोबत लग्न लागले उभ्या जगाचे) ही अधिक सुलभ (उच्चारास) झाली आहे. आवडले नाही ते हे, की माझ्या ओळीतील अर्थाची छटा ध्यानात न घेता तुम्ही बदल सुचवलात. माझी ओळ आहे 'ज्यासोबत सर्वांनी विवाह केला होता'! 'एखाद्याशी विवाह करणे' आणि 'एखाद्याशी लग्न लागणे' ह्यात फरक आहे. 'लग्न करणे' ह्यात लग्न करण्याची इच्छा आहे तर 'लग्न लागणे' ह्यात आपोआप किंवा परक्यामुळे लग्न लागण्याची छटा आहे. मला असे म्हणायचे आहे की ज्या जगण्याशी सगळ्यांनी स्वेच्छेने लग्न केले त्या जगण्याशी लग्न करण्याची मला 'इच्छा नव्हती' तर त्या जगण्याला रखेल मानण्याची माझी इच्छा होती.
अधिक विस्तृतपणे: लग्न केल्यानंतर जी जबाबदारी येते ती रखेलीच्या बाबतीत येतेच असे नाही किंबहुना येत नाही. थोडक्यात, सगळेजण आणि मी असे दोघांचेही आयुष्यावर प्रेम होतेच, पण बाकी सगळेजण आयुष्याला (स्वेच्छेने) पत्नीप्रमाणे नांदवत होते तर मी (काहीश्या निरिच्छेने, किंचित विलासी वृत्तीने व जबाबदारी घेण्याची तयारी न दाखवून) रखेलीप्रमाणे वागवत बसलो.
आशा आहे शब्दच्छटांमधील अचूकता आपण अॅप्रिशिएट कराल.
चिंता वारेमाप वाढल्या माझ्या आता
फुका जगाला "बेफिकीर मी!!" सांगत बसलो<<<
मक्त्यात आपण सुचवलेला बदल बघितल्यावर असे वाटत आहे की आपल्याला अर्थांच्या शक्यता जाणवल्याच नाहीत.
माझी दुसरी ओळ अशी आहे:
फुका जगाला 'बेफिकीर' मी बनवत बसलो
ह्यात ३ अर्थ आहेतः
१. मी उगीचच जगाला बेफिकीर (चिंतामुक्त / चिंताविरहित / निष्काळजी) बनवत बसलो. (म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजल्या). त्या ऐवजी मी तेच प्रयत्न माझ्यासाठी केले असते तर माझ्या चिंता तरी वाढल्या नसत्या.
२. दुसर्या अर्थात 'बेफिकीर' हा शब्द 'मी मला उद्देशून शेर केल्याप्रमाणे' योजलेला आहे. ह्यातील 'बनवत' या शब्दाचा अर्थ निर्माण करत बसलो. मी जर हे माझ्या आजूबाजूचे जग निर्माण करत बसलो नसतो तर माझ्या चिंता वारेमाप वाढल्याच नसत्या.
३. तिसर्याही अर्थात 'बेफिकीर' हा शब्द 'मी मला उद्देशून शेर केल्याप्रमाणेच' योजला आहे, पण ह्यात 'बनवत' या शब्दाचा अर्थ 'मूर्ख बनवत, वेडा बनवत, फसवत' अश्याप्रकारचा आहे. मी जगाला फसवत बसलो नसतो तर माझ्या चिंता इतक्या वाढल्याच नसत्या. (येथे फसवणे हे कश्याहीप्रकारचे फसवणे असू शकते व ते समजण्याचे स्वातंत्र्य रसिकाला आहे).
वैवकु,
सुचवण्या करणे, त्यावर चर्चा करणे हे नेहमीच रंगतदार ठरतेच. आपण सुचवण्या केल्यात हे आवडलेही. पण पुन्हा एकदा, वर म्हंटल्याप्रमाणे, गझल खूपच कमजोर झाली असेल तर अश्या सुचवण्या करणे शोभून दिसते.
तरी लोभ असू द्यावात.
-'बेफिकीर'!
फारच छान !
फारच छान !
बेफीन्चा प्रतिसाद नेहमीचह
बेफीन्चा प्रतिसाद नेहमीचह काहीतरी शिकवून जातो.
सुंदर गझल. आवडली. सारवली जी
सुंदर गझल. आवडली.
सारवली जी जमीन ती परक्याची होती
माझ्या घरातली माती मी उकरत बसलो >> हा शेर अतिशय आवडला.
बेफिकीर यांचा संयत व अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला. अर्थाच्या अनेक छटा छान उलगडून दाखवल्याने गझलेचा अर्थपूर्ण आस्वाद घेता आला.
मस्तच...
मस्तच...
सर्वांचे आभार मानायचे राहिले
सर्वांचे आभार मानायचे राहिले होते, सर्व प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
रखेल हा शब्द हिंदी आणि रखेली मराठी आहे ह्याची जाणीव आहे, पण रखेल हा शब्द वापरला इतकेच!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
प्रतिसाद आवडले शब्दांच्या
प्रतिसाद आवडले शब्दांच्या प्रयोजनतील नेमकेपणा आणि त्या त्या खयालंची साधली गेलेली सखोलता व्यवस्थीत लक्षात आली शिकण्यासारखे तर मला आपणा सर्वांकडून नेहमीच मिळत असते
पण काही मुद्दे....
मला शेरांचे आशय आणि शब्दांची प्रयोजने ह्याबाबत काहीही शंका नव्हत्याच
मी आधीच म्हणालो आहे की तसा कुठलाच शेर कमी चांगला नाही सगळेच चांगले शेर आहेत म्हणून ..म्हणजे मला काफिये वगळता ..अमुक शेरात हे असेच का तसे का नाही ह्याबाबत काहीही म्हणजे काहीही म्हणायचेच नाही आहे .
आणि हेही म्हणालोच आहे की मुद्दा तसा निव्वळ तांत्रिक आहे म्हटले तर बिनमहत्त्वाचाही आहेच
पण त्या तांत्रिक बाबी बद्दल मला कुणाच्याच प्रतिसादातून मिळायला हवे ते मार्गदर्शन मिळाले नाही
मी ही गझल नीट वाचली नाही किंवा शेरांची योजनाबद्धता लक्षात घेतली नाही हा गैरसमज होत आहे आणि त्याला कारणही हेच असावे बहुधा की मलाच माझे म्हणणे नीट मांडताच येत नसणे
असो
मी एक फरच लहान गझलकार असणे आणि मला गझलेतले फारसे कळत नसणे हेच खरे असावे
पण माझ्या मुद्याचे जोपर्यंत व्यवस्थीत निरसन होत नाही तोवर मी गप्प बसणार नाही
की..>>>माझे लक्ष अलामत असलेल्या व्यंजनाच्या आधीच्या व्यंजनांवर रेंगाळत बसले आहे त्या जांगांवरही आ हा स्वर पाळला किमान दोन मात्रा इतके मोजमाप असलेले एकच अक्षर ....तर जमीनीची मजा अजून वाढेल का <<<<
माझा मुद्दा कसा आणि का चुकीचा आहे हे कुणीतरी सिद्ध करून दाखवावे इतकेच हवे आहे
असो
मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर ह्या जगाचे वाचन असेल बहुधा
(शेर माझा नाही )
असो

समीरजी खरेच..कळते आहे पण वळत
समीरजी खरेच..कळते आहे पण वळत नाही आहे माझी हालत फारच खालावत चालली आहे देवपूरकर खूपच बरे बिचारे गझलवेडे तरी ठरले मी नुसताच वेडा ठरत चाललो आहे ...
मी जिथे जिथे जातो लोक मारती जोडे
विठ्ठला तुझ्यापायी केवढी कदर होते
.....
आणि हेही खरेच ....
काहून विठ्ठला बोलू मी अनुतापाची भाषा
मीहून मनाला येथे आणून सोडले आहे
'चिवडत', 'वळवत', 'उकरत' हे
'चिवडत', 'वळवत', 'उकरत' हे सर्वात छान वाटले.
धन्यवाद
धन्यवाद
मला गझलेतलं फारसं कळत नाही.
मला गझलेतलं फारसं कळत नाही. कुवतीनुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करते.
पण ही मात्र कळली नाही
वाह खुप आवडली....
वाह खुप आवडली....
आभार
आभार
मस्त, आवडली!
मस्त, आवडली!