'बेफाम सुटलेल्या ह्याला कुणीतरी लगाम घालायला हवा' म्हणून कुणीतरी सरसावलंय,
पण त्याआधीच खूप धावलोय, आता थोडं आरामात चालायला हवं असं घोडोबांनाच वाटतंय...
म्हणून हिरवाईचा आनंद घेत, हलकेच लव्हाळ्यांना कुरवाळत,
ओळखीच्या कुरणांशी हसत खेळत गप्पा करत, चालतायेत घोडोबा...
पाठीवरती कुठलं ओझं नव्हतं तोवर,
जगभर हुंदडतांना आलेले अनुभव आठवत वाटचाल चांगली होतेय खरी,
पण कुणाला तरी ते सांगायलाही हवेत म्हणून सोबती शोधायला,
पावलापावलावर भिरभिरत्या नजरेने जगाकडे, पाहतायेत घोडोबा...
आपला जन्म कशासाठी ह्याचं अजुनही उत्तर न मिळाल्यामुळे,
आपण आता थांबणं योग्य की नाही याचा विचार एकीकडे,
पण मग या जन्मी आपण कोणासाठी जगावं, त्याचा शोध घेत एकीकडे,
आतमध्ये झुरत आणि वरवर बरे राहत, जगतायेत घोडोबा...
कर्तृत्व की उत्तूंग यश की काय ते, याचा सध्याच्या पोझिशनशी मेळ घालत,
कुणीतरी आपल्याला ते म्हणावं अशी अपेक्षा करत,
पुढच्या वाटचालीसाठी डोळ्यांवर झापड लावून चालत,
पंचवीशीचा हिशोब मनाशी लावत, सत्याला सामोरे जातायेत घोडोबा...
अपेक्षांचे ओझे नको म्हणतांना, कुणालाही न दुखावता केलेली ही दौड,
पुढे कशी केव्हा थांबेल, आणि होणार नाही फरफट आयुष्याची,
याची काळजी करत, आणि पंचवीशीला 'गद्धे'च का म्हणतात?
यावर खंत व्यक्त करत, पुढे निघालेत घोडोबा...
बेस्ट ऑफ लक तुम्हाला!
बेस्ट ऑफ लक तुम्हाला!
बेस्ट ऑफ लक तुम्हाला!