द्वंद्व

Submitted by बागेश्री on 15 January, 2014 - 22:39

अविरत धडपड करून
मी चढून येते आतून,
बघते जग बाहेरचे
चेहर्‍याच्या बाल्कनीतून..

दोन डोळ्यांच्या खोबण्यात
मी घट्ट दडून असलेली,
बाहेरच्या जगातले
संभ्रम जोखत बसलेली

कधी तुला वाटते मी
पाहू नये काहीही,
मला आत ढकलण्याची
करतेस मग तू घाई..
तू डोळे मिटता गच्च
पापण्यांचा सुटतो हात,
मी खोल ढासळत जाते
कोसळते आत आत

झटकते पुन्हा स्वतःला
जग बघायचे हे आहे
मी चढेन पुन्हा पुन्हा
पडझड नेमाची आहे...
हे द्वंद्व तुझे नि माझे
सरणार एकदा आहे
त्याच खोबण्यांतून मी
जाणार निसटून आहे...

-बागेश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एक सुंदर दृष्टांत ................. मस्त !! हे असं म्हणजे फक्त बगेश्री........ !!

तुमचं एक वेगळंच विश्व आहे संवेदनांचं. कोवळं सोवळं नितळ निरागस. आत्मशोधाची प्रकट अनुभूती देणारं. असीम..... !!

बागु ब्रॅण्ड!!!!!!!!!<<< मी बागु ब्रँडी असे वाचले चुकून !:)
कविता मस्तच नेहमीप्रमाणे