Submitted by वैवकु on 14 January, 2014 - 19:47
इतक्या सगळ्या इच्छा नांदवणे तुला कसे जमते
मी ही इच्छा धरली की माझी ती इच्छा रुसते
मी तुझा फोन आल्याचे पाहुन उचलणार नसतो
पण व्यक्त व्हायची तुझ्या मनाची अगतिकता नडते
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा नव्हते
दुसर्यांच्या जन्मावरती हळ्हळ करणे सोडुन दे
तू चिंता कर की आपल्याच ताटात काय पडते
हल्ली मी माझ्या दु:खांसोबत युद्ध करत नाही
तू गेल्याचे दु:खच आई त्या सगळ्यांशी लढते
मी अयुष्याच्या तीरावर हा खेळ बघत बसलो
'त्या' पायांवरती आदळली की लाट कशी फुटते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लयीचा काहीतरी सॉलिड घोळ आहे
लयीचा काहीतरी सॉलिड घोळ आहे वैभव!
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा नव्हते
व्वा!
विजयरावांशी पूर्ण सहमत...
विजयरावांशी पूर्ण सहमत...
धन्यवाद ! मला असलेली माहिती
धन्यवाद !
मला असलेली माहिती अशी
वृत्त :मात्रावृत्त आहे नाव माहीत नाही
मात्रा : मोजल्या नाहीत (कंटाळा !!)
माझी वाचनाची लय : गागागागागागागागागा......गागागागागा
(९ गा ... ५गा )
इतक्या सगळ्या इच्छा नांदवणे.... तुला कसे जमते
मी ही इच्छा धरली की माझी ........ती इच्छा रुसते
मी तुझा फोन आल्याचे पाहुन ......उचलणार नसतो
पण व्यक्त व्हायची तुझ्या मनाची..... अगतिकता नडते
इतकेही लाभत आहे हेही... छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इत....केसुद्धा नव्हते..... (भंग :अओ:)
.
दुसर्यांच्या जन्मावरती हळ्हळ ....करणे सोडुन दे
तू चिंता कर की आपल्याच ता.....टात काय पडते ...... (भंग :अओ:)
हल्ली मी माझ्या दु:खांसोबत .....युद्ध करत नाही
तू गेल्याचे दु:खच आई .त्या ...सगळ्यांशी लढते
मी अयुष्याच्या तीरावर हा ......खेळ बघत बसलो
'त्या' पायांवरती आदळली की .....लाट कशी फुटते
('त्या पायांपाशी अडखळली की .....लाट कशी फुटते )
धन्यवाद दोघांचे
चूक भूल द्यवी घ्यावी
ओक्के वैभवा...लय
ओक्के वैभवा...लय सापडली...
अगतिकता,आईचा शेर ,मतला... खूप आवडले.
"इतके सुध्दा नव्हते" .....छान
"इतके सुध्दा नव्हते" .....छान आहे
"लाट कशी फुटते" हा खूप आवडला
गझल आवडली.
गझल आवडली.
धन्यवाद डॉ साहेब , लिमयेसाहेब
धन्यवाद डॉ साहेब , लिमयेसाहेब , आणि समीरजी
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा नव्हते
सुंदर…
बाकी गझलही छान आहे .
शुभेच्छा.
गझल आवडली. लय सापडायला मात्र
गझल आवडली.
लय सापडायला मात्र काही ओळी दोनतीनवेळा म्हणून बघाव्या लागतात इतकेच.
शेवटचे दोन शेर फारच आवडले.
शेवटचे दोन शेर फारच आवडले.
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा नव्हते
दुसर्यांच्या जन्मावरती हळ्हळ करणे सोडुन दे
तू चिंता कर की आपल्याच ताटात काय पडते >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.
लयीचा गोंधळ तुम्ही स्वतःच मान्य केला आहेत.
लयीचा गोंधळ तुम्ही स्वतःच
लयीचा गोंधळ तुम्ही स्वतःच मान्य केला आहेत.<<<<<
नाही!!!!!!.....(वेळ मिळाल्यावर सविस्तर सांगेन काका :))
वैभव & वैभव कंपनी ..मनःपूर्वक धन्स
मासरूळकर धन्स
लयीवर चर्चा झालेली दिसत आहेच.
लयीवर चर्चा झालेली दिसत आहेच. खयालांच्या बाबतीतः ही गझल मला विशेष भावली नाही याबद्दल क्षमस्व!
धन्यवाद बेफीजी
धन्यवाद बेफीजी
हल्ली मी माझ्या दु:खांसोबत
हल्ली मी माझ्या दु:खांसोबत युद्ध करत नाही
तू गेल्याचे दु:खच आई त्या सगळ्यांशी लढते
या ओळी वाचल्यावर असे वाटते ,
कशास उगा लयी खयाली चर्चेत रमतात लोक .
विसरुनी सौंदर्य रूपागुणांचे वस्त्रास भाळतात लोक
वैयक्तित मत ..
छान!!!
छान!!!
विक्रांतशी या ओळींसाठी सहमत.
विक्रांतशी या ओळींसाठी सहमत. आशय आणि अभिव्यक्तीमधली जुनीच ही लढाई .गझल आवड्लीच ..
विक्रांतजी ,हबा ,भारतीताई
विक्रांतजी ,हबा ,भारतीताई मनःपूर्वक आभार
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे
इतकेही लाभत आहे हेही छानच आहे की
आठव ती तगमग जेंव्हा हे इतकेसुद्धा नव्हते
आवडला...
बाकी गझल आवडली नाही....
बेफीकीर + १
(खूप दिवसांनी मा.बो. वर आलो आहे. आणि आपण एकदा मागे प्रतिसाद न देणा-यांचा उद्धार केल्याचे आठवते.. म्हणून खास आणि किमान आपल्या गझलेवर प्रतिसाद देत आहे वैभव शेठ.....
वाचलो बुवा नालायक होण्यापासून........