Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 January, 2014 - 13:46
मैया काठी
आत खोलवर
गूढ एकांती
शांत गंभीर
भल्या पहाटे
पिठूर चांदण्यात
दोन माता
गार गोट्यांत
बसल्या होत्या
पूजा करीत
निर्भय धीर
शांत आश्वस्त
चार दिवे
त्यांनी सोडले
हळूच लहरत
जवळ आले
गार बोचरा
वारा आणि
दुधाळ पाणी
खळखळ गाणी
उष्ण अश्या
प्रेमळ प्रवाही
देहास सोडून
दिले मीही
मी मैया त्या
चार ज्योती
चंद्रप्रभा अन
पाण्यावरती
कितीवेळ मग
माहित नाही
चंद्र उतरला
माझ्या देही
कुठे असे मी
वाहून गेलो
कोण असे मी
पाणी झालो
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगळी शैली निवडलीत जरा पण
वेगळी शैली निवडलीत जरा
पण अप्रतीम नजारा उभा केलात
काही कडवी खासच आवडलीत ५ ८ आणि ९
धन्यवाद
वाह, अग्दी रेवामैयाच्या कुशीत
वाह, अग्दी रेवामैयाच्या कुशीत पहुडल्याचा अनुभव दिलात ......
फारच दिव्य भाव प्रगट झालेत .....
वाह!
वाह!
धन्यवाद वैभव शशांक,अश्विनी
धन्यवाद वैभव शशांक,अश्विनी ...या मनीचे त्या मनी गेले हाच आनंद
किती सुरेख अनुभुती!!
किती सुरेख अनुभुती!!
पुन्हा धन्यवाद
पुन्हा धन्यवाद