टाकाऊतून टिकाऊ कल्पक-कला : मेणबत्ती

Submitted by मामी on 26 December, 2013 - 04:55

चहाचा मग आतून जरा काळा दिसायला लागला म्हणून तो बाजूला पडला होता. पूर्णपणे पांढरा असल्याने बाहेरून रंगवून त्याचा पेनस्टँड वगैरे करावा म्हणून जपून ठेवला होता.

माझ्या कडे असलेल्या कँडलजार मधील सुगंधित मेणबत्ती पेटायला त्रास होत होता कारण वात छोटी आणि आजूबाजूला मेण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरं त्याचा सुगंध इतका मस्त आहे की ते मेण तसंच टाकून द्यायला जीवावर येत होतं.

आज अचानक या दोन गोष्टींची सांगड घालून डिझायनर मेणबत्ती बनवता येऊ शकेल हे लक्षात आलं.

प्रथमतः त्या कँडल जार मधील अतिरिक्त मेण चमच्याने काढून घेतलं. त्यामुळे आता त्यातील वात दिसायला लागली आणि तोही पुन्हा वापरण्याजोगा झाला.

मग फुलपुडीचा दोरा मिळवला. थर्माकोलचे रंगित गोळे होतेच घरी, ते घेतले.

जारमधून काढलेलं मेण त्या चहाच्या कपात टाकून मायक्रोवेव मध्ये वितळवलं. एकदम नाही. सतत बाहेर काढून चाचपणी केली कारण पहिल्यांदाच मेण मायक्रोवेव मध्ये वितळवत होते.

त्या वितळलेल्या मेणात फुलपुडीचा दोरा चारपदरी करून बुडवून बाहेर काढून सरळ करून सुकवला. दोन मिनिटांत सुकतो. मग तो एका चापात अडकवून तो चाप मेण वितळवलेल्या कपावर ठेवला. फक्त वरचा भाग सोडता बाकीचा दोरा त्या मेणात मधोमध उभा राहिला. ( अ‍ॅक्च्युअली मेणबत्ती करताना फोटो काढले नाहीत. त्यामुळे खालचे फोटो नंतर पुन्हा दुसरा कप घेऊन वगैरे काढले आहेत. त्यामुळे त्या दोर्‍यावरही मेण नाही आणि कपातही मेण नाहीये. )

वरून ते थर्माकोलचे रंगित गोळे टाकले. हलके असल्याने ते तरंगत राहिले. तो कप मग फ्रीज मध्ये ठेवला.
दहा मिनिटांत मेणबत्ती तयार.

मग ही मेणबत्ती बाहेरून अ‍ॅक्रिलिक रंगांत रंगवली. तीन वेगवेगळे सीन्स रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही मग वेर केलेले रंगकाम मस्त आहे. खूप आवडले.
मामी, त्या ओरिजनल ग्लासातलेच मेण वितळवून त्यातच मोठी वात करून लावता आली असती तर. मला वाटते तो ग्लास पारदर्षक असल्यामुळे त्यात थर्माकोलचे रंगित गोळे टाकल्यास बाजूने दिसलेही असते.

धन्यवाद लोक्स. Happy

तुम्ही मगवर केलेले रंगकाम मस्त आहे. खूप आवडले. >>> धन्स सामी. इथे फोटोत इतक्या जवळून इतकं छान दिसत नाहीये. पण प्रत्यक्षात खरंच चांगलं वाटतंय. जरा वेगळ्या स्टाईलमध्ये रंगवायचा प्रयत्न केला आहे. Happy

मामी, त्या ओरिजनल ग्लासातलेच मेण वितळवून त्यातच मोठी वात करून लावता आली असती तर. मला वाटते तो ग्लास पारदर्षक असल्यामुळे त्यात थर्माकोलचे रंगित गोळे टाकल्यास बाजूने दिसलेही असते. >>> तो ओरिजनल जार माझ्या अत्यंत आवडीचा आहे त्यामुळे त्यावर काही प्रयोग करण्याची इच्छा नव्हती. Happy

मामी,
तो ओरिजिनल जार गरम पाण्यात ठेवा.
"वॉटर बाथ" अशी कन्सेप्ट आहे ती. त्या कडांवर लागलेले मेण वितळून खाली येईल अन अधिक चांगला दिसेल.
मायक्रोवेव्हपेक्षा चांगली व सोपी आयडिआ आहे ती.

-सल्ला दिल्याबद्दल क्षमस्व!

फक्त स्टायरोफोमचे बॉल फायर कॅच करतील ना? >>> +१
मलाही पहिल्यांदा हेच वाटले. पण आयडिया मस्त आहे. कदाचित थर्माकोलच्या तुकड्यांऐवजी दुसरे काहीतरी डेकोरेटिव्ह सामान वापरता येईल.

कष्ट भरपूर उचललेत हे दिसते आहेच पण माझ्या अज्ञानाला जिज्ञासा लागून राहिली आहे की ही जी कपात मेणबत्ती केलीये ती पेटवल्यावर हिची वात जळत जळत संपू पाहणार मग ह्यातला मेण वितळताना गळून पडू शकणार नाही म्हणून तो कपातच साठणार हे नक्की मग ह्या मेणबत्तीची वात /दृश्य भाग जितके दिवस जाळता येईल तितकेच मेणबत्तीला आयुष्य तो वरचा भाग दिसेनासा झाला की पुन्हा वितळवत बसावा लागणार पुन्हा नवा दोरा टाकून नवा कप ...
त्यापेक्षा अश्या कपांसारख्या काही वस्तू ..वेगवेगळे आकार उकार ..केवळ .साच्यासारख्या वापरून रीसायकल करता येइल की हा मेण म्हणजे तो कप ही वापरता येइल आणि डिसायनर मेणबत्तीही अशी काही आयडिया सुचतेय का बघाच

मला खरा प्रश्नन विचारयचा होतं की त्या बाउल का जारमध्ये ठीकय पारदर्शी असल्याने वात खाली सरकत गेली तरी उजेड बाहेर पडत राहणार त्या कपात्ल्या मेणबत्तीचा असा कितीकाळ उपयोग होणार म्हणून !!!

असो

कपावरील चित्रे लहान मुलांनी काढावीत अशी झाली आहेत

कपावरील चित्रे लहान मुलांनी काढावीत अशी झाली आहेत >>>> मीही हेच विचारणार होतो. पण मी चित्र काढली तर इतकी चांगलीही दिसणार नाही, हे नक्की. Happy

कल्लाकारी आवडली.

अरे सॉरी लोक्स. मीच विसरून गेले या धाग्याबद्दल.....

प्रतिसादांकरता धन्यवाद .

@ इब्लिस
तो ओरिजिनल जार गरम पाण्यात ठेवा.
"वॉटर बाथ" अशी कन्सेप्ट आहे ती. त्या कडांवर लागलेले मेण वितळून खाली येईल अन अधिक चांगला दिसेल.
मायक्रोवेव्हपेक्षा चांगली व सोपी आयडिआ आहे ती. >>> इब्लिस, जेव्हा त्या ओरिजिनल जार मधली मेणबत्ती पेटवीन तेव्हा आपोआप ते कडेचं मेण वितळेल.

******************************************************
@सीमा
मामी , छान झालाय नविन कप. फक्त स्टायरोफोमचे बॉल फायर कॅच करतील ना?

@धनश्री
फक्त स्टायरोफोमचे बॉल फायर कॅच करतील ना? >>> +१
मलाही पहिल्यांदा हेच वाटले. पण आयडिया मस्त आहे. कदाचित थर्माकोलच्या तुकड्यांऐवजी दुसरे काहीतरी डेकोरेटिव्ह सामान वापरता येईल.

@ मंजूडी
फक्त ही मेणबत्ती शोभेची म्हणून वापर. थर्माकोल घरात जाळू नका.

>>>>>>> सीमा, अगं बनवताना उत्साहाच्या भरात हे असले पॉइंटस अजिबात लक्षात आले नाहीत. ते लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
धनश्री, खरं तर मी वरून टाकायला ग्लिटर शोधत होते. त्या क्षणापर्यंत एक ग्लिटर घरात सतत समोर दिसत होतं. मी शोधतेय म्हटल्याक्षणी त्यानं दडी मारली. मग हे बॉल्स दिसले आणि ते वापरले. हे वापरताना हलके आहे आणि म्हणून तरंगतील इतकाच विचार केला होता. Happy
मंजूडी, सुचनेकरता धन्यवाद.
आता पेटवायच्या आधी हे बॉल्स काढूनच टाकते. खरंतर ही मेणबत्ती वापरायचं जीवावरच आलंय.

कष्ट भरपूर उचललेत हे दिसते आहेच पण माझ्या अज्ञानाला जिज्ञासा लागून राहिली आहे की ही जी कपात मेणबत्ती केलीये ती पेटवल्यावर हिची वात जळत जळत संपू पाहणार मग ह्यातला मेण वितळताना गळून पडू शकणार नाही म्हणून तो कपातच साठणार हे नक्की मग ह्या मेणबत्तीची वात /दृश्य भाग जितके दिवस जाळता येईल तितकेच मेणबत्तीला आयुष्य तो वरचा भाग दिसेनासा झाला की पुन्हा वितळवत बसावा लागणार पुन्हा नवा दोरा टाकून नवा कप ...

>>> चांगली आहे कल्पना. आणि त्यामागे तुम्ही इतका खोलात जाऊन विचार केलाय तर तुम्हीच करून इथे टाका.

त्यापेक्षा अश्या कपांसारख्या काही वस्तू ..वेगवेगळे आकार उकार ..केवळ .साच्यासारख्या वापरून रीसायकल करता येइल की हा मेण म्हणजे तो कप ही वापरता येइल आणि डिसायनर मेणबत्तीही अशी काही आयडिया सुचतेय का बघाच

>>>> ही पण कल्पना तुम्ही राबवा.

मला खरा प्रश्नन विचारयचा होतं की त्या बाउल का जारमध्ये ठीकय पारदर्शी असल्याने वात खाली सरकत गेली तरी उजेड बाहेर पडत राहणार त्या कपात्ल्या मेणबत्तीचा असा कितीकाळ उपयोग होणार म्हणून !!!
असो. >>>> यावर अजून विचार करा, उत्तर मिळेल.

कपावरील चित्रे लहान मुलांनी काढावीत अशी झाली आहेत. >>> प्रत्येक माणसात एक लहान मूल दडलेलं असतं.

मस्त केलय. बाकीचे प्रॅक्टिकल पॉईण्ट्स मला वाटतं उत्साहात विसरायला क्झाले. होतं असं. पण कल्पकता महत्वाची.. आप्ल्यला ह्यातलं १०% पण सुचत नाही

सुंदर.