आमच्या बागेतील हिवाळी फुले ...

Submitted by पुरंदरे शशांक on 11 December, 2013 - 09:22

आमच्या बागेतील हिवाळी फुले ...

पुण्यातील हिवाळा असूनही ही फुले फुलली आहेत सध्या ..

१] गुळवेल
IMG_4726.JPG

२] ब्लीडींग हार्ट -
IMG_4735.JPG

३] Cuphea hyssopifolia (Mexican Heather, Mexican false heather, false heather, Hawaiian heather)
IMG_4736.JPG

४] टणटणी -
IMG_4740.JPG

५] बिगोनिआ -
IMG_4750.JPG

६] Blood Berry, Pigeon Berry, coral berry, Baby Pepper, rouge plant
Botanical name: Rivina humilis Family: Phytolaccaceae (Pokeweed family)
IMG_4757.JPG

७] तुळस -
IMG_4758.JPG

बाकी मग जास्वंद, इक्झोरा, पावडर पफ, जट्रोफा, मुसेंडा वगैरे नेहेमीची आहेतच....

आणि वॉकिंग आयरिसही फुलले आहे आणि Spathiphyllum (पांढरे टोपडे असलेले कणीस) ला एक कणीस आले आहे....

८] वॉकिंग आयरिस (अगदी मंद सुगंध अस्तो - सकाळचे काही वेळच फुललेले असते)

IMG_4844.JPGIMG_4856.JPGIMG_4859.JPGIMG_4870.JPGIMG_4861.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! शशांक जी..... पान उगडतानाच फुलांचा जणू दरवळच पसरला. "गुळवेल" हे नाव प्रथमच वाचले. याचे बोटॅनिकल टर्म नेम समजेल ? म्हणजे त्या अनुषंगाने विकीवर काहीसी माहिती पाहावी वाटते.

हा खजिना पाहाण्यासाठी यायला हवे....केव्हातरी.

आणि वॉकिंग आयरिसही फुलले आहे आणि Spathiphyllum (पांढरे टोपडे असलेले कणीस) ला एक कणीस आले आहे....

>> मग त्याचेही फोटो टाका ना इथे प्लीज.

रच्याकने, तुळशीची फुलं अशी दिसतात? आय मीन निळी? Uhoh

आणी मधल्या काही फुलांच्या फोटोंना नावं नाहीयेत. ती कोणी सांगेल का कोणती फुले आहेत ते?

मस्त फोटो.. बागेचे जरा लाँग शॉट्स ही येऊ द्या ना....

बाहेरही फुले फुलायला लागलीत. मी दोन ठिकाणी बहावा पाहिला.

"गुळवेल" हे नाव प्रथमच वाचले. याचे बोटॅनिकल टर्म नेम समजेल ?
Tinospora cordifolia

हा खजिना पाहाण्यासाठी यायला हवे....केव्हातरी. >>>>> जरुर सर, केव्हाही यावे..... मी तर वाट बघतोय तुमची....

सर्वांचे मनापासून आभार्स ....

शशांकजी, खरंच long शॉट हवाय बागेचा. मस्त प्रचि.
रच्याकने , ''ब्लीडींग हार्ट '' माझ्याकडेही आहे, त्याचं नाव तुमच्यामुळे कळलं Happy

वॉव, मस्तच बहर! ब्लीडींग हार्टचे रोप असते का?

६ नंबरचे झाड आहे त्याचे काही नाव, वैशिष्ट्य असते का? माझ्याकडे पण खूप फुलले आहे. पक्षी मजेत त्याचा फराळ करतात म्हणून मुद्दाम ठेवले आहे.

६ नंबरचे झाड आहे त्याचे काही नाव, वैशिष्ट्य असते का? माझ्याकडे पण खूप फुलले आहे. पक्षी मजेत त्याचा फराळ करतात म्हणून मुद्दाम ठेवले आहे. >>>> इतके दिवस शोधत होतो नाव, ते आता मिळाले...

पक्ष्यांना खाण्यासाठी याची फळे ठीक आहेत पण माणसाला विषारी आहेत (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Blood%20Berry.html)

शोभनाताई - बाग पहायला या, काही कारणाशिवाय या - पण जरुर या.... स्टँडिंग इन्विटेशन...

आणि वॉकिंग आयरिसही फुलले आहे आणि Spathiphyllum (पांढरे टोपडे असलेले कणीस) ला एक कणीस आले आहे....>> मग त्याचेही फोटो टाका ना इथे प्लीज. >>>> टाकतोय, टाकतोय ..

सर्वांचे मनापासून आभार...

मस्त.

सर्वांचे मनापासून आभार....

वॉकिंग आयरिसचे फोटो टाकले आहेत.

ब्लीडींग हार्टचे रोप असते का? नर्सरीत मिळेल? >>>> हो नर्सरीत मिळते याचे रोप.

mast fule aahet.