Submitted by अ. अ. जोशी on 7 December, 2013 - 01:08
समजुन येता ज्ञाती नुसती
तळपत गेली पाती नुसती
कापसापरी देह पेटतो
क्षणात मिळते ख्याती...; नुसती..!
छळले होते दीर्घ सुखाने...
भरभर फिरता जाती नुसती
भेट पाहिजे होती बछड्या..!
पत्रें दिलीस हाती नुसती..?
हताश जीवन, उदास वाटा...
सरकत होती नाती नुसती
किती चोचले..! किती सोस हा..!!
शेवट उरते माती नुसती...
संबंधांची 'अजय' शिदोरी
भरेल अक्कलखाती नुसती
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली..
आवडली..

'नाती' आणि 'माती' हे सर्वात
'नाती' आणि 'माती' हे सर्वात विशेष वाटले.
मलाही नाती माती ह्च जास्त
मलाही नाती माती ह्च जास्त आवडले
सर्वात उत्तम आहे ती ही ओळ...भेट पाहिजे होती बछड्या ....एक नंबर ओळ पण खालची ओळ निव्वळ काफियानुसारी असल्याने एक चांगला शेर हाती लागता लागता राहून गेल्याचा खेद होत आहे
असो
धन्यवाद
मतला अनवट आहे. गझल आवडली.
मतला अनवट आहे.
गझल आवडली.
भेट पाहिजे होती
भेट पाहिजे होती बछड्या..!
पत्रें दिलीस हाती नुसती..?
हताश जीवन, उदास वाटा...
सरकत होती नाती नुसती
व्वा!
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
छानच आहे ..बछड्याचा शेर विशेष
छानच आहे ..बछड्याचा शेर विशेष !
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
वैवकु,
तुम्ही म्हणता तो शेर चांगलाच आहे. तुम्हाला समजला नसेल कदाचित. असो.
भेट पाहिजे होती
भेट पाहिजे होती बछड्या..!
पत्रें दिलीस हाती नुसती..?
हताश जीवन, उदास वाटा...
सरकत होती नाती नुसती
किती चोचले..! किती सोस हा..!!
शेवट उरते माती नुसती...
वा वा आवडलेच हे शेर !
छळले होते दीर्घ
छळले होते दीर्घ सुखाने...
भरभर फिरता जाती नुसती>>>>>>>>हा जमला नाही......म्हणजे अर्थ आणि रचना.....!
______________________________
बाकी मस्त!!
छान
छान
भेट पाहिजे होती
भेट पाहिजे होती बछड्या..!
पत्रें दिलीस हाती नुसती..?
हताश जीवन, उदास वाटा...
सरकत होती नाती नुसती
किती चोचले..! किती सोस हा..!!
शेवट उरते माती नुसती...
सुंदर….
सुरेख गझल.
शुभेच्छा.