अश्वत्थामा .....

Submitted by sherloc on 5 December, 2013 - 03:56

श्री. अतुल ठाकूर यांच्या आजच प्रकाशित केलेल्या याच विषयावरील लेखावरून मला माझ्या काही दिवसांपुर्वीच्या ओळी आठवल्या -
*********************************

तसा आपल्या प्रत्येकातच एक अश्वत्थामा असतो
भळभळती जख़म घेऊन भणंग भटकताना कधीमधी दिसतो

अंधारामध्ये निरपराधांवर वार काय त्याने एकट्यानेच केलेत
अज्ञानाच्या अंधारातले असे कित्येक निरपराध आपणही चिरडलेत

तरीही प्रत्येक नव्या जख़मेनंतर
छातीवर हात ठेऊन दु:खाचं दळण आपण किती वेळा दळलं
मन जे म्हणतात ते छातीत नाही, डोक्यात असतं
हे फक्त कृष्णाला कळलं

- शैलेंद्र साठे
*********************************

श्री. अतुल ठाकूर यांचा लेख ईथे वाचायला मिळेल - http://www.maayboli.com/node/46663

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल दुरदर्शनवर जिचे अ‍ॅसीड हल्यात डोळे गमावलेल्या युवतीची मुलाखत पहात होतो. ती एक बारबाला होती असुयेपोटी दुसर्‍या बारबालेने तिच्यावर अ‍ॅसीड फेकवले.

अश्वथामाच दुसर काय ?

शैलेन्द्र कविता किती पटली म्हणून सांगू.
साध्या शब्दात साध्या माणसाला अश्वत्थाम्याशी रिलेट करणं सोप्पं गेलं कवितेमुळे.
शेवटी सगळी माणसं आणि त्यांची मनं सारखीच. Happy

माझ्या आवडत्या १०त.

".....अज्ञानाच्या अंधारातले असे कित्येक निरपराध आपणही चिरडलेत....."

~ ही थेट कबुली मला फार भावली शैलेन्द्र. आजच्या युगात निदान इतपत कळण्यापुरते तरी ज्ञान प्रत्येकाला व्हावे की अश्चत्थामा ती भळभळती जखम घेऊन रात्रंदिन या पृथ्वीवर भटकत आहे....त्याला झोपही नाही असे शापीत जीवन जगतो आहे... त्याने ज्याना कंठस्नान घातले, त्याची भरपाई करीत आहे तो...... पण इतके होऊन, शिकूनसुद्धा आजही निरपराध जीव दिवसाढवळ्याही चिरडण्यात माणूस मागे नाही.

श्री.अतुल ठाकुर एक सिद्धहस्त लेखक आहेत....त्यांचे येथील आगमन मला फार सुखावले.

क्या बात है शैलेंद्र! मजा आ गया. तुम्ही कविता करता हे माहित नव्हतं.

अशोकराव थॅन्क्स. खरं तर आपल्या प्रतिसादांमधुन देखिल लिहावे कसे हे मी शिकत आहे Happy