भस्म्या

Submitted by ठिपका on 25 November, 2013 - 01:07

मूळ कवीची क्षमा मागून...
(मूळ कविता - http://www.maayboli.com/node/46473 )

चिवडा कडबोळे अन् चकली
एक फराळ मी खाल्लेला
शिवाय चहा मारत आहे
ढेरी माझी वाढत आहे
पोट ना खाल्ले किती समजे
दुनिया त्यालाच अती समजे

पुष्कळ माश्या झाल्यावरती
फडके मारत टेबलवरती
द्रोणांमधला रस पाझरतो
जेव्हा पत्रावळ अंथरतो
त्याच पत्रावळी उसवल्या
चटण्या कोशिंबीरीही स्त्रवल्या

आहे ते खायची घाई आहे
अन्न पुरेसे नाही आहे
भोजन रोखा रेचन होते
रेचन रोखा भोजन होते
जो तो मजला टाळत आहे
मी पण दोन्ही पाळत आहे

आणखी थोडा भात लाव तू
वाढ मला तो चारी ठाव तू
सोबत असूदे लोणची पापड
गोडाविना तर जेवण अवघड
बदल जराही चवीत नसला
पक्वांनांना अर्थच कसला

ओहो बासुंदी सापडली
मठ्ठ्यासोबत जिलबी पडली
थांबायाचे कारण नाही
संपत जोवर जेवण नाही
अजून ना कंटाळा आला
ढेकरेत जीव गोळा झाला

किती खाऊनी आहार झाला
भीती नाही अपचनाची
एकच फेरी मग परसाला
आस नव्याने मग भोजनाची

मलाच भस्म्या झाला असावा
किंवा मीच भस्म्या असावे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क ह र Rofl