Submitted by डॉ अशोक on 21 November, 2013 - 13:17
*-------------------------------------*
हल्ली
*-------------------------------------*
तळे आसवांचे राखतो मी हल्ली
राखतो म्हणूनी, चाखतो मी हल्ली
*
पाहिली स्वप्ने जी, मिळून दोघांनी
राख ही त्यांचीच, फासतो मी हल्ली
*
प्रेतयात्रा मीच, काढली माझीच
फुले समाधीवर, वाहतो मी हल्ली
*
सवय बैठकीची, फक्त आहे तरी
भेटण्या मैलभर, चालतो मी हल्ली
*
दु:ख असते सदा, एकट्याचेच पण
गझलेतूनी ते, वाटतो मी हल्ली
*
डॉ. अशोक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काका तुमच्या रचनांमध्ये आपण
काका तुमच्या रचनांमध्ये आपण कोणत्या लयी जपता /हाताळता हे मला कधीच लक्षात आले नाही आजवर लयींशिवाय म्हणजे कॉमनली लोक ज्या निश्चित अशी लगावली असलेल्या लयी वापरतात त्यापेक्षा ..आणि/किंवा केवळ मात्रांचा हिशेब राखणार्या लयी वापरतात तश्या पद्धतीने आपण लिहिण्याचे आवर्जून टाळता की काय असे वाटते
असो
खयाल देखील नाहीत भावत आपले मला ..काहीएतरी चीजवस्तू असते ज्याला लोक गझलियत म्हणतात ती नाही दिसली याही वेळी
पण काही खयाल आवडले त्याही पेक्षा अधिक साधे व सोपे लिहिण्याकडे आपला कल जाणवतो तो आवडतो मला
धन्यवाद काका
लोभ असावा राग नको
वैभव..... प्रतिसादा बद्दल
वैभव.....
प्रतिसादा बद्दल धन्यवाद
लयी बद्दल म्हणाल तर ही कविता लयीत आहे हा माझा ठाम दावा आहे. मी स्वत: म्हणून पाहिल्या शिवाय कविता पोष्ट करत नाही.
ही गझल मात्रा-वृत्तात आहे. वीस (२०) मात्रा, दहा मात्रा नंतर यती. एका मिसरयात १९ मात्रा झाल्या आहेत ! मात्रा-वृत्तात फक्त मात्रांच्या संख्येचे बंधन असते, लगावली चे नाही हे आपणास माहित असेलच.
मी तुमची गझल पेश करायची शैली पाहिली आहे. त्या शैलीत कदाचित ही गझल म्हणता येत नसावी आणि त्यामुळे तुमचा आक्षेप मी समजू शकतो.
शेवटचा मुद्दा गझलियतचा. याबद्दल मतभेद आहेत. काहींना दोन मिसऱ्यात असलेला कॉन्टरास्ट म्हणजे गझलियत वाटते. अशा गझला मैफिलीत टाळ्या मिळवतात. काही गझला अंतर्मूख करतात. (त्या टाळ्या मिळवत नसतील ही कदाचित !) सुरेश भटांनी कॉन्ट्रास्ट गझले साठी आवश्यक नाही असे स्पष्ट म्हटले आहे. तरीही काहींना ते आवशय्क वाटते ! एक मात्र नक्की की गझल ही प्रथम चांगली कविता असावी.
या गझलेतला खयाल आपल्याला आवडला नाही असे आपण एके ठिकाणी लिहिता आणि शेवटच्या ओळीत काही खयाल आवडले असे ही लिहिता. तुम्हाला अभिप्रेत असलेला कॉन्ट्रास्ट हाच तर नाही ?
काका आपले खयाल भावत नाहीत असे
काका आपले खयाल भावत नाहीत असे म्हणताना सहसा/ मोस्टली/ आवडत नाहीत असे म्हणातचे आहे
आवडले असे म्हणताना या वेळी आवडले आहेत असे म्हणायचे आहे असा फरक दोनही स्टेटमेंट्स मध्ये आहे
वर्तमान काळ चालू वर्तमान काळ की अजून कुठलातरी काळ असतो त्यापैकी चा हा फरक आहे काका
आणि अहो काका तुम्ही जे
आणि अहो काका तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला लयीत वाचता येत आहे ती लय अक्षरछंदाची असण्याची दाट शक्यता आहे त्यातही एक दोन मिसर्यात ती पाळली गेली नाही आहे
असो मत्रा बरोबर असतीलही मी त्या मोजत नाही ,मला कंटाळा येतो पण मला जितके म्हणून लयज्ञान आहे त्यानुसार मात्रा असोत नसोत लय जुळत नाही आहे आणि जी जुळत आहे ती अक्षरछंदाची आहे
असो
दु:ख असते सदा, एकट्याचेच पण<<
दु:ख असते सदा, एकट्याचेच पण<< ही ओळ छान लयीत आहे >>>गालगागालगा गालगागालगा
बाकीच्याही त्या लयीत करता आल्या असत्या नक्कीच
मी हल्ली ऐवजी आज मी अशी रदीफ जास्त सुंदर ठरावी ...
जसे
आसवांचे तळे राखतो आज मी
संचिताची फळे चाखतो आज मी
दु:ख असते सदा, एकट्याचेच पण
गझल मांडून ते , वाटतो आज मी
पाहिले स्वप्न जे काल तुझियासवे
राख त्याचीच ही फासतो आज मी
बैठकीची सवय फक्त आहे जरी
भेट तू ..मैलभर चालतो आज मी
मीच माझा जनाजा इथे काढला
फूल कबरीवरी वाहतो आज मी
काका मी तुम्हाला का सांगतोय सांगू का ..मला इतकेच सांगायचे आहे की केवळ एक गझल (आकृतीबंध )रचणे हे शायराचे उद्दिष्ट नसावे तर ती रचना अधिकाधिक सुंदर आल्हाददायक शक्य तेवढी तृटीविरहीत बिनचूक अशी करण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न करायलाच हवा ...!
गैरसमज नसावा
काँट्रास्ट शेरात असायलाच हवा असे माझे मुळीच मत नाही आणि मी तुम्हाला आधीच्या प्रतिसादातून त्याबद्दल असे काहीच सूचितही करत नव्हतो काका
गैरसमज नसावा
~आपला वैभव
मला वाटते..... कवीला आपल्या
मला वाटते..... कवीला आपल्या कवितेत लय जाणवून उपयोग नाही. ती लय दुसर्यालाही जाणवली पाहिजे. माझ्या आत्ताच्या 'ती आवडण्याला नव्हते काही कारण' ह्या गझलेत, मी लिहिली तेव्हा मला व्यवस्थित लय जाणवत होती. पण फेसबुकवर निलेश पंडित आणि शुभानन चिंचकर ह्या मान्यवरांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यानंतर श्री. चिंचकर ह्यांनी मला पूर्ण गझल, शब्दांची किंचित फेरफार करून दाखवली. ह्या नवीन गझलेची लय वेगळी होती, पण सहज सापडणारी होती. मी साहजिकच स्वीकृत केली. आता जी गझल दिसते आहे, ती नवी गझलच आहे.
मलाही ह्या रचनेत लय शोधता आली नाही.
मला असं वाटतं, आधी काही दिवस तरी गणवृत्तं हाताळावीत. मग काही दिवसांनी लय डोक्यात, मनात, नसांत शिरते आणि त्यानंतर तालाच्या हातात हात घालून शब्द चालत येतात. तेव्हा लय शोधावी लागत नाही, किंबहुना ती इतकी दिलखेचक असते की प्रयत्नपूर्वक विसरावी लागते........
प्रयत्नपूर्वक विसरावी
प्रयत्नपूर्वक विसरावी लागते....<<<+१
लोकांना वाटते लय पाळणे म्हणजे मात्रा मोजून त्यांचा हिशेब बरोबर बसवणे वगैरे पण गझल हे गणीतीय अंगाने कमी आणि सांगीतिक अंगाने अधिक जाणारे शास्त्र आहे
छानशी चाल लावणे ती सुरात गाणे ही कामे संगीतकाराची आहेत कवींनी गझलेतील प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्द अक्षर त्यातील व्यंजने (ठेका)आणि स्वर(सूर) ह्यातून निर्माण होणारी भवनांची आणि अर्थांची वलये आणि वजने ह्यावर आपले लक्ष केंद्रित करायला हवे !!!!!
मला असं वाटतं, आधी काही दिवस
मला असं वाटतं, आधी काही दिवस तरी गणवृत्तं हाताळावीत. मग काही दिवसांनी लय डोक्यात, मनात, नसांत शिरते आणि त्यानंतर तालाच्या हातात हात घालून शब्द चालत येतात. तेव्हा लय शोधावी लागत नाही, किंबहुना ती इतकी दिलखेचक असते की प्रयत्नपूर्वक विसरावी लागते.......+१०००
असो मुळात रचनेत असलेले अजून
असो मुळात रचनेत असलेले अजून एक नियमात न बसणारे असे काही जे आधीच सांगायला हवे होते पण मी दिलेल्या बदली रचनेमुळे मला आत्ता लक्षात आले की राखतो चाखतो असे मतल्यात आल्यावर पुढे आ अलामत आणि 'खतो' ही न बदलणारी अक्षरे हवी असतात .... त्यामुळे प्रस्तुत मतला उर्वरीत गझलेतील प्रत्येक शेरात पाळ्ल्यागे;लेल्या जमीनीचे प्रातिनिधित्व करत नाही आहे ..हे चालणार नाही ...अश्यावेळी मतल्यातील एकतरी काफिया खोलायला हवा ..मग बाकीचे आपोआप जमून येईल
हे मी आधीच न सांगता बाकीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा ...( वाद म्हणा हवं तर ...बरंबुवा वितंडवाद म्हणा ..चालेल
) करत बसलो त्याबद्दल क्षमस्व
या धाग्यावर आता मी सहसा
या धाग्यावर आता मी सहसा प्रतिसाद देण्याचे टाळेन सांगायला फार काही नाही ह्या रचनेवरून माझ्याकडे आता
मुळात गझल्बाबत फार चर्चा करावी असा दम नाही रचनेत पण आपल्या अशोक काकांची रचना आहे म्हणून हक्क मानून बोललो
चूक भूल द्यावी घ्यावी
वैभव, रसप आणि
वैभव, रसप आणि सुप्रिया
धन्यवाद ! आपल्या सूचना, अभिप्राय, मतप्रदर्शन यांचे स्वागतच आहे व ते माझ्या साठी मोलाचे आहे !
वैभव, रसप आणि सुप्रिया १.
वैभव, रसप आणि सुप्रिया
१. उपरोक्त अभिप्राया पैकी वैभव चा मतल्यात राखतो-चाखतो हा काफिया वापरल्यानंतर इतर शेरा मध्ये Xखतो असे काफिये यायला हवे होते हा आक्षेप एकदम मान्य !
*
२. लयीच्या बाबतीत ही गझल जशीच्या तशी माझ्या संगीतप्रेमी मित्राने संगीतबद्ध केली आहे. त्यावर थोडे काम बाकी आहे. त्यामुळे रसप आणि वैभवचा लयी बद्दलचा मुद्दा मला तेंव्हाही मान्य नव्हता आणि आताही नाही.
मी अता बोलणार आहे त्यामुळे मन
मी अता बोलणार आहे त्यामुळे मन दुखावले जाणार हे नक्की पण मला म्हणायचेय की ह्या रचनेला चांगली गझल मानून संगीत देणारा संगीतकार भेटला ह्याचे अचरज वाटते आहे इथे चांगल्या गझल इतक्या ढिगाने पडल्या असतानाही ह्या रचनेच्या नशीबात गाणे होणे आले ह्याचा हेवाच वाटतो
संगीतकारानाही गझल म्हणजे काय हे शिकवावे लागणार असल्याची परिस्थिती आज आली आहे हे मी प्रत्यक्ष एक कार्यक्रम ऐकून बोलतो आहे ...ज्या कार्यक्रमात भर मैफिलीतही मी सर्वांसमोर हा मुद्दा बोललो होतो त्या संगीत देणार्या बाई स्व्तःच गातही होत्या आणि मतल्यातली अलामत पुढे पाळली गेली नाही आणि शिवाय जी अलामत पुढे पाळली गेली तीही एक जागी भंगली होती असे मी म्हणताच बाई म्हणाली की कवियत्रीशी बोला मला त्यातले समजत नाही म्हणून ...लोकही मूर्ख त्या गाण्याला गझल मानून वाह वाह ,म्हणत होते
काकांच्व्ह्या रचनांना संगीतकार मिळतात ही आनंदाची बाब आहे तरीही माझा पुरेसा वकूब नसताना पात्रता नसतानाही .......गझलेचे दिवस फार वाईट आलेत !!!! इतकेच म्हणतो आणि थांबतो .
कुणाला काय राग यायचाय तो येवो मी खरे तेच बोलणार !!!!!!!!!!
काका, तुमचा एक घोर (गोड)
काका,
तुमचा एक घोर (गोड) गैरसमज झालेला दिसतो की चाल लागत आहे किंवा लावली आहे म्हणजे कवितेत लय आहे. चाल तर 'मेरा कुछ सामान..'लासुद्धा लावली होती आरडीने.. (आणि काय लावली होती.. अफलातून !) पण म्हणून ती कविता लयीत आहे, असं होत नाही. हे एक उदाहरण... अशी अनेक उदाहरणं देता येतील. तुम्ही अमान्य केल्याने सत्य बदलत नाही. ह्या कवितेत लय नाही आणि ती एक नव्हे हजार चाली लावल्या तरी येणार नाही.
<गझलेचे दिवस फार वाईट आलेत>
<गझलेचे दिवस फार वाईट आलेत> एवढ्या वाक्याशी शंभर टक्के सहमत. पण त्या सहमतीचा या गझलेशी किंवा वरच्या प्रतिसादांशी संबंध नाही.
उपरोक्त अभिप्रायातून मला आकलन
उपरोक्त अभिप्रायातून मला आकलन झालेले मुद्दे
१. फक्त गणवृत्तात लिहिलं तरच कवितेला लय येते, मात्रा वृत्ता लिहिलं तर नाही असं काही आहे कां? मग मुक्त छंदातल्या कवितेत ही लय असते असं म्हणतात त्याचं काय?
२. रसप लिहितात:"तुम्ही अमान्य केल्याने सत्य बदलत नाही. ह्या कवितेत लय नाही आणि ती एक नव्हे हजार चाली लावल्या तरी येणार नाही" म्हणजे रसप नी मान्य केलं तर आणि तरच त्यात लय आहे अन्यथा नाही ! त्यांनी घोशीत केलं तर ते सत्य अन्यथा नाही !! व्वा ! खासा न्याय आहे !! मेरा कुछ सामान ह्या रचनेत देखिल एक अंगभूत लय आहे म्हणून तर त्याला संगीत देता आलं अन्यथा ते शक्यच झालं नसतं. त्यामुळे रसप तुम्ही मान्य करा अगर न करा माझ्या मते माझ्या या रचनेत एक लय आहे आणि मी माझ्या या मताशी ठाम आहे. तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा !
३. वैभव कुलकर्णी लिहितात: "ह्या रचनेला चांगली गझल मानून संगीत देणारा संगीतकार भेटला ह्याचे अचरज वाटते आहे ...!" ज्यांनी संगीत दिलं त्यांना ती कविता चाल देण्या योग्य वाटली म्हणून दिली. त्यात ती गझल आहे की नाही हा प्रश्नच निदान संगीतकाराला तरी आला नाही. त्यामुळे गझलेला वाईट दिवस आले म्हणून गळा काढायचे काहीच कारण नाही ! माझ्या सारख्या सामान्य कविच्या कवितेला कुणी चाल लावली म्ह्णून धोक्यात यावी इतकी मराठी गझल लेचीपेची नक्कीच नाही ! वैभव तुम्ही निवांत रहा, आणि अभिप्राय देत रहा. मात्र आश्चर्य न वाटता वैभवला अचरज वाट्ले याचे मात्र मला फार म्ह्णजे फारच आश्चर्य वाटले !! आपल्या मताशी प्रामाणिक रहाणाऱ्यांचा (मग ते माझ्या विरोधी असलं तरी) मला राग येत नाही. शिवाय निंदकाचे घर शेजारी असण्याचे फायदे मी जाणून आहे !
उपरोक्त अभिप्रायातून मला आकलन
उपरोक्त अभिप्रायातून मला आकलन झालेले मुद्दे आणि त्यातून हातात आलेले काही द्न्यानाचे कण.....
१. एखाद्या रचनेचे गाणे झाले तर त्यात लय अ्सतेच असं नाही.
२. लय नसलेल्या एखाद्या रचनेचे गाणे होऊ शकते.
३. एखाद्या रचनेला संगीतकाराने संगीत दिलं तर त्याच्या गझलेच्या द्न्यानाबद्दल शंका घेता येऊ शकते. इतकंच नव्हे तर त्यामुळे मराठी गझलेचं भवितव्य धोक्यात येण्याजोगी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
४. मराठीत आश्चर्य न वाटता अचरज वाटू शकते.
५. मात्रावृत्त ह्या प्रकाराच्या गझलेच्या वाटेला निदान नवोदितांनी तरी जाऊ नये
भरत मयेकर | 25 November, 2013
भरत मयेकर | 25 November, 2013 - 10:16 नवीन
<गझलेचे दिवस फार वाईट आलेत> एवढ्या वाक्याशी शंभर टक्के सहमत. पण त्या सहमतीचा या गझलेशी किंवा वरच्या प्रतिसादांशी संबंध नाही.
<<<
गझलेचे दिवस वाईट आले आहेत या वाक्याशी आताशा कोण सहमत होईल ह्याचा नेम राहिलेला नाही.
डॉ. अशोक,
तुमच्या सदर रचनेत अणि तुमच्या प्रतिसादात काही दर्जात्मक साम्य आढळेल अशी आशा होती. असो!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46490
>>१. फक्त गणवृत्तात लिहिलं
>>१. फक्त गणवृत्तात लिहिलं तरच कवितेला लय येते, मात्रा वृत्ता लिहिलं तर नाही असं काही आहे कां? मग मुक्त छंदातल्या कवितेत ही लय असते असं म्हणतात त्याचं काय? <<
"मला असं वाटतं, आधी काही दिवस तरी गणवृत्तं हाताळावीत. मग काही दिवसांनी लय डोक्यात, मनात, नसांत शिरते आणि त्यानंतर तालाच्या हातात हात घालून शब्द चालत येतात. तेव्हा लय शोधावी लागत नाही" ह्या वाक्यावरून तुम्ही लावलेला अर्थ विस्मयचकित करणारा आहे. तुम्ही पुन्हा एकदा हे वाक्य वाचावे व नवा अर्थ शोधावा, असे वाटते.
>> २. रसप लिहितात:"तुम्ही अमान्य केल्याने सत्य बदलत नाही. ह्या कवितेत लय नाही आणि ती एक नव्हे हजार चाली लावल्या तरी येणार नाही" म्हणजे रसप नी मान्य केलं तर आणि तरच त्यात लय आहे अन्यथा नाही ! त्यांनी घोशीत केलं तर ते सत्य अन्यथा नाही !! व्वा ! खासा न्याय आहे !! <<
ज्या ठामपणाने तुम्ही "त्यामुळे रसप आणि वैभवचा लयी बद्दलचा मुद्दा मला तेंव्हाही मान्य नव्हता आणि आताही नाही." हे म्हणालात, त्याच ठामपणाने मीही म्हणालो. 'मी लयीचा महागुरू वगैरे आहे' असा काहीसा तुम्ही काढलेला इथला अर्थही जबराट आहे. एकंदरीत तुम्ही फारच पूर्वग्रहदूषित विचार करत आहात, असे दिसते.
>> मेरा कुछ सामान ह्या रचनेत देखिल एक अंगभूत लय आहे म्हणून तर त्याला संगीत देता आलं अन्यथा ते शक्यच झालं नसतं. त्यामुळे रसप तुम्ही मान्य करा अगर न करा माझ्या मते माझ्या या रचनेत एक लय आहे आणि मी माझ्या या मताशी ठाम आहे. तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा ! <<
काका, अंगभूत लय असणे आणि लयबद्धता ह्यात फरक आहे. गुणगुणणे आणि गाणे ह्यात आहे तसा.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
ह्या पाडगांवकरांच्या ओळी लयीत आहेत, पण लयबद्ध नाहीत. (ह्यात मात्राही समसमान नाहीत, माहितेय पण एक उदाहरण म्हणून चट्कन हेच आठवलं.)
काका,
तुमचं आणि माझं अनेकदा पटत नाही ह्याला कारण दोघांचा हटवादीपणा असावा. कुणाचा हट्ट बरोबर आहे हे काळ ठरवेलच, तोवर माझ्यासाठी माझाच बरोबर आणि तुमच्यासाठी तुमचा.
तुम अपने करोड पर, मैं अपने रोड पर
ऐश करेंगे !!
डॉ. अशोक, आपली ही रचना ज्या
डॉ. अशोक,
आपली ही रचना ज्या कुणी संगीतकाराने बांधली आहे त्याला विचारून खालील प्रश्नांची उकल करवता येईल काय?
१) रचना कुठल्या तालात बांधली आहे?(उदा. एकताल, तीनताल, रूपक, केहरवा, आडा चौताल, झपताल इ.इ.)
२) लय कुठली आहे?(उदा. मध्यलय, द्रुतलय किंवा विलंबित लय)
३) समेची जागा?
धन्यवाद!
रणजित..... आपली मतं पटत नाही
रणजित.....
आपली मतं पटत नाही हे खरं, पण तू तुझ्या मताशी प्रामाणिक राहून स्वत:चा मुद्दा मांडत रहातोस हे मला आवडतं आणि त्यामुळे जेंव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो तेंव्हा आपल्यातल्या वादाचा लवलेश ही नसतो हे तू मान्य करशील अशी आशा आहे ! मत-मतांतरं असतातच !
विजय पाटील..... आपल्या सूचनेची नोंद घेतली आहे.