आधुनिक सीता - २२

Submitted by वेल on 20 November, 2013 - 12:22

भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297

*****************************************************

मला वाटले होते मी टॅब पाठवल्या पाठवल्या रफिक माझ्याशी बोलायला येईल. पण तो आलाच नाही. त्याला ओळखण्यात माझी काहीतरी चूक होत होती.

दुसर्‍या दिवशी मी योगासने करून नुकती उठत होते, माझे सकाळची आवरूनही झाले नव्हते तेव्हा. रफिकने बाहेरून दाराची कडी काढल्याचे मी ऐकले. मी मनाशी काहीतरी ठरवले. मनाला सांगितले सरीताच्या शरीराचा प्रियकर आता रफिक हाच आहे आहे. विचित्र वाटतय ना? मी अगदी स्वतःला हेच सांगितलं कारण माझ्या मनाचा कण आणि कण सागरने व्यापलेला होता. आता वेळ होती मन आणि शरीराला वेगळं करण्याची. रफिक आत आला आणि त्याने दार बंद करण्यापूर्वीच मी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याक्षणी न ठरवताच मला हुंदका फुटला.

"का रडते आहेस् आता, भीती वाटतेय का माझी? माझ्या बोलण्याची?"
"वाईट वाटतय की मी पूर्ण प्रयत्न करते आहे भूतकाळ विसरायचा आणि तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस."
"विश्वास असाच ठेवता येत नसतो, त्याकरता काहीतरी करावं लागतं."
त्याच्यापासून थोडं लांब जात त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारलं "काय करू बोल ना?"
"माझ्यावर प्रेम कर.."
"तू आवडतोस रे मला, मला माहित नाही मी तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे का नाही, पण प्रेम हे सहवासाने निर्माण होतं ना? सहवास वाढू दे, प्रेम निर्माण होईल रे."
"माझ्यात संयम नाही आहे.. अजिबात नाही, कधीच नव्हता. आणी मला जे हव असतं ते मला मिळालं नाही की मी माझा उरत नाही."
"तुला जे हवय ते मी देणारे रे तुला."
"मला जे हवं असतं ते आणी मला जेव्हा हवं असतं तेव्हा"
असं म्हटल्यावर मला काही सुचेना. मी त्याला हाताला धरून माझ्या बाजूला बसवलं. त्याच्या डोळ्यात एकटक बघत राहिले. काय होतं त्या डोळ्यात. त्या डोळ्यात होतं लहान मुलाचं सच्चेपण, लहान मुलाचा हट्ट, प्रेमाची भूक .. असं काय होतं त्याच्या आयुष्यात की त्याच्या डोळ्यात सच्चेपण आणि प्रेमाची भूक एकाच वेळी असावी.
माझ्या मनात गलबललं, काहीतरी कमतरता होती त्याच्या आयुष्यात ... माझ्या आयुष्यात आता ह्याचं असणं हेच सत्य होतं. मी डोळे बंद केले, मनाचे दरवाजे बंद केले आणि त्याचं चुंबन घ्यायला पुढे सरसावले. मी किती वेळ त्याचं चुंबन घेत होते मलाच माहित नाही. सागरने माझं पहिलं चुंबन घेतलं तेव्हा मी जितकी अ‍ॅग्रेसिव्ह नव्हते तेवढी अ‍ॅग्रेसिव्ह होऊन मी रफिकचं चुंबन घेतलं. त्या चुंबनात प्रेम होतं की नाही माहित नाही, वासना तर नक्कीच नव्हती पण त्याक्षणी रफिक समाधानी झाला पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात होतं.

मी त्याच्यापासून लांब झाले तेव्हाही त्याचे डोळे मिटलेलेच होते. एक तर रफिक खूप चांगला अभिनेता होता किंवा खरंच कुठेतरी मी त्याच्या मनाला स्पर्श केला होता. काही क्षणांनी त्याने डोळे उघडले आणि तो काहीही न बोलता त्या खोलीतून निघून गेला, जाताना त्याने तो दरवाजाही बंद नव्हता केला. मी त्या खोलीतून बाहेर पडायला हवं का? कमीतकमी घर कसं आहे हे पाहायला तरी? पण मी तिथेच बसून राहिले, थोड्या वेळाने फातिमा त्या खोलीत आली, तिने माझ्याकडे पाहिलं आणि दरवाजा बंद करून घेतला. रफिकने बाहेर जाऊन सांगितलं की काय? काय चाललय माझ्या आयुष्यात? मी म्हणजे वापरून आणि वापरल्या नंतर वापरली म्हणून शो करण्याचे साधन आहे का?

थोड्या वेळाने रफिक परत आला. मी फक्त त्याच्याकडे एकटक पाहात होते. त्याच्या हातात काहीतरी होतं - त्याच्यापाठीमागे लपवलेलं . त्याने हात पुढे घेतला. त्याच्या हातात एक सुंदर नक्षीकाम केलेली डबी होती. त्याने ती माझ्या हातात दिली. मला खूणेनेच उघड म्हणून सांगितलं. मी ती डबी उघडली, त्यात खूप सुंदर असं संगमरवरी गुलाबाचं फूल होतं. ते इतकं सुबक सुंदर होतं की नकळत माझा चेहरा आनंदला. "खूप छान" मी म्हटलं.
"आहे ना खूप छान, मी सुनितासाठी घेतलं होतं, इथे परत येताना, पण त्यानंतर मी तिला भेटलोच नाही. सुनिताने माझ्यावर जिवापाड प्रेम केलं. मी खूप हट्टी खूप अ‍ॅग्रेसिव्ह होतो, अनेकदा तिचा अपमान केलाय, तिला शारिरिक दुखापत सुद्धा केलिये एकदा. पण तरीही तिच्या स्पर्शात मला जे प्रेम जाणवायचं ते मला आज तुझ्या स्पर्शात जाणवलं. ते खरं आहे की नाही ह्याचा मी विचार करत नाही. पण तू माझ्या जवळ असताना माझ्या मनात पहिला विचार आला तो ह्या गुलाबाचा म्हणून हे तुला माझ्याकडून"

मी ती डबी हातात घेतली आणि रफिकच्या जवळ गेले, त्याने त्याचा हात माझ्या खांद्यावरून टाकून मला जवळ घेतलं आणि एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला बागेत जवळ ओढून कसा बसेल तसा तो मला जवळ घेऊन बसला. मला त्याही परिस्थितीत हसू फुटलं,
"का हसते आहेस?" त्याने थोड्या रागातच विचारलं.
"मला ना कॉलेजात असल्यासारखं वाटतय. हे सगळं मी केलं नव्हतं ना कॉलेजात म्हणून छान वाटलं."
"छान वाटलं ना, मग त्याबदल्यात अजून एक .." त्याने माझ्याकडे पाहून ओठाचा चंबू केला. मला परत हसू फुटलं.
"अगदी माझ्यासारखा दिसतो आहेस, मी रुसते, लाडात येते ना तेव्हा अशीच दिसते."
"विषय बदलू नकोस."असं म्हणत त्याने पुन्हा एकदा मला स्वतःजवळ ओढून एक दीर्घ चुंबन घेतलं. पण त्यात कालच्या सारखा वखवखलेपणा नव्हता. तो स्वतःहून बाजूला झाल्यावर मी त्याला विचारलं, "आता मी माझं आवरून घेऊ का, माझा नाश्तासुद्धा व्हायचा आहे."
"तू आवरताना मी इथे थांबलो तर चालणार नाही का?"
"चहाटळपणा करू नकोस इतक्यात, मला आवरून घेऊदे, मग आपण एकत्र नाश्ता करू, अर्थात तुला वेळ असेल आणि चालणार असेल तर"
रफिक हसत हसत बाहेर गेला. मी आवरून घेतलं, जे चाललं आहे त्याबद्दल काही विचार करायचा नाही, जे होतय ते होऊ द्यायचं हे मी स्वतःला सांगत होते. स्वत:शी हेही मान्य केलं शरीरातून मनाला बाहेर काढणं तसं कठीण नाही.

माझं आवरून होईपर्यंत फातिमा नाश्ता घेऊन आली, चमचे, दोन डिशेस आणि बोल, एक जग आणि एक गोल बंद डबा होता तिच्यासोबत. मागोमाग रफिक आला. तो उत्साहाने उतू जात होता. रफिक आत आल्यावर त्याने विचारलं
"नाश्त्याला काय आहे माहित आहे का?"
"काय"
"ओळख"
तो एवढा उत्साहात विचारत होता, म्हणजे नक्की पुरणपोळी."पुरणपोळी?" मी विचारलं
"कररेक्ट" आणि तो तोंडभरून हसला.
"तू मला ज्या दिवशी प्रेमाचा प्रतिसाद देशील त्यादिवशी पुरणपोळीच खायची असे मी ठरवले होते. फ्रीजमध्ये ठेवली होती. खास पुण्याहून मागवली आहे. तुला आवडते ना? मला ना एक दिवस तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे, माहित नाही तो दिवस कधी येईल." रफिक उत्साहाने बडबड करत होता. आणि मी पुरणपोळी डिशमध्ये घेऊन, जगमधलं दूध बोलमध्ये ओतून घेऊन त्याच्यासमोर डीश धरली. त्याचा चेहरा पुन्हा आनंदाने उजळला.

क्रमशः

http://www.maayboli.com/node/46658

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वल्लरीच, मस्त आहे हा भाग. सरीता हे पात्र अतिशय हूशारीने रंगवलय तूम्ही. सूट्केचा हाच एक मार्ग आहे तिच्यासाठी. ह्या मधे खलनायक अरब आहे कारण कथा मिडल ईस्ट मधे घडते आहे पण हिच कथा भारतात घडली असती तर खलनायक कोणत्या ही धर्माच असू शकला असता.

navin bhagachi vat pahat ahot
ustukta vadhat rahate
plz navin bhag yeu dya lavakr

भाग ६ मध्ये रफिकची बायको सकिना अस नमूद केल आहे .. मग फितिमा पण बायकोच का? रफिकला किती बायका आहेत .. माझ थोड confusion झाल आहे .. कुणी clear करेल का?

राधा_धिटुकली >>>>>

अहो तो रफिक आहे कि नाही.....सकिना, फातिमा अश्या किती ही असु शकतात बायका त्याला Lol
दिवे घ्या ईथे.................

डोक्यात भुंगा फिरत राहिला पाहिजे वाचकांच्या.>> नंदिनी इश्टाईल Wink

रामायणातला काळ वेगळा होता, हा वेगळा आहे........................आणि गोड शेवट तर कोणाच्या दृष्टीने? प्रत्येक दृष्टी ही वेळ आणि ठिकाणसापेक्ष असते .. - लॉ ऑफ रिलेटिव्हिटि. !!!!>> बस्स यू आर ऑन द राईट ट्रॅक!!!

आणि हो भाग प्लीजच मोठे टाक... आत्ता कुठे रंग चढतोय म्हणावं तर... Sad

वल्लरिच thanks ! बाकी कथा एकदम SOLID .. येऊ द्या लवकर लवकर ... खुप उत्सुकता वाढत आहे ..

येऊ द्या लवकर लवकर ... खुप उत्सुकता वाढत आहे ..+++++१
भाग प्लीजच मोठे टाक... आत्ता कुठे रंग चढतोय म्हणावं तर... अरेरे++++++++++१

तुम्ही सगळे खूप संयमाने मला विचारताय पुढच्या भागाचं काय झालं. माझ्याकडे सांगाडा तयार आहे. पण डोक्यात कुठे तरी ब्लॉक तयार झालाय. कथा सादर करता येत नाही आहे. शक्य तेवढ्या लवकर कथा टाकायचा प्रयत्न करते. शेवटी सगळी त्या परमेश्वराची इच्छा.

शेवटी सगळी त्या परमेश्वराची इच्छा.....................................
OMG OMG OMG...........................
हे वाक्य तुमच्या कडुन अपेक्षित नाही बरे का !!!!

वल्लरी,
सावकाश भाग टाकला तरी चालेल, मात्र मोठाच टाका. किमान आत्ताचे २ भाग एकत्र होतील एवढातरी भाग असावा. एवढेसे वाचून लिंक रहात नाही.

Pages