गटग

Submitted by वेल on 11 November, 2013 - 00:16
ठिकाण/पत्ता: 
बोरिवली पश्चिम स्टेशनजवळ, राधाकृष्ण हॉटेल,

उगाच भेटण्यासाठी ठरवलेले गटग

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
रविवार, November 17, 2013 - 07:30 to 09:31
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाशचित्रे - विनय आणि योकु. - टाका रे लवकर.

मुग्धानन्द - तुझा फोनू मझ्याकडे असता तर उठवलं असतं मी तुला.. मग तू मिसली नसतीस..

मिसलेल्यांसाठी आणि आलेल्यांसाठी आपण एक छोटी सहल आखूया का? बोरीवलीचे नॅशनल पार्क, येऊर हिल्स (मला इथले फारसे माहित नाही) किंवा ठाण्याची फुलपाखरांची ओवळेकर वाडी किंवा मार्वे बीच ..

ओवळेकर वाडीला गेलो तर तिथे फक्त सकाळी साडेआठ / नऊ ते बारा इतकाच वेळ बागडता येईल तेही फुलपाखरांमागे. मग तिथेच जवळ्पास कुठेतरी खादाडी आणि गप्पाटप्पा...

वृत्तान्त ... लिहिते, माझ्या इश्टाईल मध्ये लिहायला संध्याकाळ नक्कीच उजाडेल..

उपस्थित लोक्स - प्रमोद देव, विनय भिडे, आनंदमैत्री, योगेश कुलकर्णी, आशिता१३०५, अनुमधुरा आणि कु अनुमधुरा , ड्रीमगर्ल ड्रीमबॉय आणि ड्रीमबेबी आणि वल्लरीच श्री वल्लरीच आणि चि वल्लरीच ....

आलेल्यांनो मला तुमचे इमेल आय डी आणि फोनू संपर्कातून द्यावा की... मग मी ते इमेल आणि फोनू सगळ्यांकडे पाठवेन.

कालचा छोटासा गटग मस्त झाला. माझाही पहीलाच गटग आणि तो पण इतक्या जवळ... माबोकरांना पहील्यांदाच भेटता आलं खूप आनंद झाला.

माझा नवरा (माबोकर नाहीय) तसा गोगलगाय आहे. घर भलं आपण भलं. माझ्यासाठी म्हणून खास आलेला. फारसा एंजॉय नाही करता आला त्याला पिल्लूमुळे, पण आवडला ग्रूप त्यालाही. पिल्लूला देवकाका आणि अन्विता (कु. अनुमधुरा) खूप आवडले. Happy

सर्व उपस्थित माबोकरांचे खूप खूप आभार. खूप छान गेली कालची संध्याकाळ Happy बर्‍याच माबोकरांना भेटता नाही आलं... असो पुढच्या गटगला भेटता येइल बहुदा. Happy

वल्लरी सविस्तर वृत्तांत लिही ना... (तसा छोटासाच झाला गटग पण तरी वाचायला आवडेल) आणि विनय आणि योगेश फोटोज प्लीज...
रच्याकने: अनुमधुरा (गटगला उपस्थित) यांचा आय डी सापडला नाही माबोवर. कोणाला माहीत आहे का?

गटग दणक्यात झाल ...

यशस्वी संयोजनाबद्दल वल्लरीच ह्यांच अभिनंदन ...

योकु , देव काका , मैत्री आनि मी सोडलो तर सगळे नवीन मायबोलीकर होते ...

थोडा प्रकाश पाडून.... Happy
2013-11-17 19.31.15 (1).jpg
डावीकडून...आनंदमैत्री, मी,श्री वल्लरीच,विनय भिडे, योगेश कुलकर्णी,आशिता १३०५,अनुमधुरा आणि तिची मुलगी, वल्लरीच आणि तिचा मुलगा, ड्रीमगर्ल,तिचं पिल्लू आणि श्री ड्रीमगर्ल.

खरंच. कालची संध्याकाळ मस्त गेली एकदम. सगळ्या माबोकरांना भेटून खूप आनंद झाला. मायबोलीचं गटग आणि तेही बोरिवलीत त्यामुळे मिस करणं शक्यच नव्हतं. मायबोलीवर नवीन असले तरी वाचन गेली २-३ वर्षे चालू आहे त्यामुळे खूप उत्सुकता होती सगळ्यांना भेटायची.

(बर्‍याच माबोकरांना भेटता नाही आलं... असो पुढच्या गटगला भेटता येइल बहुदा.) @ ड्रीमगर्ल +१

@ वल्लरी - सहलीची कल्पना चांगली आहे. पण पिल्लू आणि इतरांचं वेळापत्रक सांभाळून जमलं तर नक्की येईन.

विनय भिडे आणि देवकाका - धन्यवाद फोटोकरता.

अरे वा.. छान झाले गटग. तपशीलवार वृत्तांत येऊ दे.

पण काही लोकांची कमाल आहे... जवळच्या लग्नाला टांग मारुन चक्क बोरिवलीतल्या गटगला हजेरी लावतात.

वल्लरीच..

अगं तू त्या राधाक्रुषणचा ईतका डीटेल पत्ता दिलेलास.. कमाल आहे तुझी... तसे मला ते माहीत आहे.. पण त्यावेळी डोक्यातुन गेलेलं... पण.. सगळ्या दिशांनी तिथे कसं पोचायचं ते सान्गीतलेलस.

मी कोणालाच ओळ्खत नाही म्हणुन कसं जायचं.. असं वाटत होतं.. तरी यायचं ठरवलेलं.. पण.. नाहीच जमलं... अता पुढच्या वेळी नक्की.

अरे मस्त आलेत फोटोज... धन्यवाद फोटोसाठी...

खादाडी विशेष नव्हती... खवय्ये लोक्स नव्हते आणि व्हेज मध्ये काय जास्त... पंगत किंवा बीबीसी असतं तर सांगितलं असतं... तसंही जिप्सीच्या लग्नाचं सुग्रास जेवण हादडलेले थोडे सुस्तावलेले ( Light 1 ) Happy
पुढच्या गटगला बाकीच्या टांगारूंनी नक्की जमा मग खादाडी नी गप्पांचा खमंग वृत्तांत टाकता येइल.

वल्लरी पिकनिकची आयडीया मस्तच. बघुया कसं जमतेय ते... थोड्या दिवसांनी प्लॅन करूया... लगेचच पुढच्या रविवारी जमेल असं वाटत नाहीये Sad

प्रदीपा,
(मी कोणालाच ओळ्खत नाही म्हणुन कसं जायचं.. असं वाटत होतं.. ) हे असं मलाही जाण्यापूर्वी वाटत होतं पण शेवटी हिम्मत केलीच. राधाकृष्ण मध्ये पोचल्यावर ह्याच कंपूसमोर उभी राहून वेटरना विचारत होते पण तिथे दोन ग्रुप हजर असल्याने नक्की कोणाला जावून विचारावं हे कळतच नव्हतं. मग थोडासा विचार करून गेले टेबलजवळ आणि विचारलं "मायबोली? "
आणि त्यानंतर मग खूप मज्जा केली.
(पुढच्या गटगला बाकीच्या टांगारूंनी नक्की जमा मग खादाडी नी गप्पांचा खमंग वृत्तांत टाकता येइल.) - अनुमोदन.

पण काही लोकांची कमाल आहे... जवळच्या लग्नाला टांग मारुन चक्क बोरिवलीतल्या गटगला हजेरी लावतात. >> इंद्रा.. त्या कमालेचा शोध CID च्या दयाकडे द्यायला हवा... Proud

नविन आयडीकर्स वृत्तांत लिहा पटापट.. असे थोडकं थोडकं नको.. बाकी 'पंगत'मध्ये गटग लवकर होउन जाउदे.. !

प्रदीपा - मी पण कोणालाच ओळखत नव्हते. पण तरी भेटायचं होतं माबोच्या कुटुंबाचा डायरेक्ट हिस्सा व्हायचं होतं. म्हणून. आणि कसं यायचं तू विचारलंस म्हटलं कोण कुठून येणार माहित नाही, कोणीही कुठूनही येऊ दे, पोहोचले पाहिजेत.

ड्रीमगर्ल - सहल अगदी लगेच नाही, दोन तीन आठवड्यांनी. २२ डिसेंबर चालेल का?

इंद्रधनुष्या, पंगत मध्ये गटग - अरे कधी पण. चल ह्याच शनिवारी करूया... पंगत म्हटलं की सगळेच येतील बघा. ह्याला आपण गटग न म्हणता, नुसती खादाडी म्हणूया. काय?

व्हेजसुद्धा टेस्टी असतं, मला वाटतं आरके मध्ये खाऊन सगळ्यांना तसं वाटलं असेल - व्हेज पिझ्झा, क्लब सँडविच, टोस्ट, व्हेज सँडविच, मैसूर सादा डोसा आणि मेदूवडा सांबार असा खादाडीचा बेत होता, माझं मन सगळ्ञांना भेटूनच भरून गेलं होतं त्यामुळे आम्ही काय काय बोललो आठवत नाहीये.
आनंदमैत्री - उशिरा आले त्यामुळे त्याना आयडी ओळख करावी लागली. पण न ओळखल्याबद्दल काही पेनल्टी नव्हती...
योकु - एकटाच एकटा तेव्हा त्याला दुकटे बनवायचे कसे प्लान चालू आहेत ह्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली..
माबोच्या मुंबई ग्रूपच्या ऑफिशियल फोटोग्राफरला मिस करून झाले. (ऑफिशियल फोटोग्राफर - बरोबर ना?)
बोरिवलीतल्या शाळांबद्दल चर्चा झाली.
मराठी शाळा वि इंग्रजी शाळा हीदेखील चर्चा झाली. (ही फार महत्वाची चर्चा होती, माझ्या मते .. पण तरी नुसती तोंड पाटिलकी .. माझी तरी, कारण मीसुद्धा मुलाला मराठी शाळेत घातलं नाहीये ना)
विनय आपल्या बायकोला किती घाबरतो हे त्याने सगळ्यांना दाखवून दिले. (बायको आली नव्हती ना ...)
गटगचा समारोप झाल्यावर देवकाका आणो श्री वल्लरीच यांनी चहाचा आस्वाद घेतला, योकु, आनंद - तुम्हाला टुक टुक माकड, तुम्हाला चहा हवा होता पण तुम्ही पळून गेलास ना लवकर.

Pages