’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

Submitted by अभय आर्वीकर on 10 November, 2013 - 13:07

“माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन

      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग, स्वभापचे प्रांताध्यक्ष  माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पी.टी.आयचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रताप वैदीक, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, अनिल धनवट, माजी मंत्री रमेश गजबे, अ‍ॅड दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाला जेष्ठ संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांची प्रस्तावना लाभली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे, प्रदीप निफ़ाडकर, स्वामी निश्चलानंद, किमंतू ओंबळे, प्रमोद देव यांचे अभिप्राय लाभले आहे. पुणे येथील शब्दांजली प्रकाशनने हा गझलसंग्रह प्रकाशित केला असून www.pustakjatra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आलेला आहे.

गझलसंग्रह  :    माझी गझल निराळी
पृष्ठे            : ८८
किंमत        : ७०/-
कवी           : गंगाधर मुटे "अभय"
प्रकाशक     : राज जैन
                शब्दांजली प्रकाशन,
                नर्‍हे गाव, पुणे

-------------------------------------------------------------

माझी गझल निराळी

-------------------------------------------------------------
गझलसंग्रह

-------------------------------------------------------------
Mazi gajal nirali

-------------------------------------------------------------
दिनांक : १६-०९-२०१४
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३
माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा
स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर

             महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
         पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्‍या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.

Mazi Gazal Nirali
 
माझी गझल निराळी येथे वाचा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनःपूर्वक अभिनंदन! मुखपृष्ठ आणि पांचाळेंचा अभिप्रायही मस्त आहे.

(येथे वाद किंवा चर्चा मुळीच अभिप्रेत नाही, ही एक शुभवार्ता आहे, पण गझल ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे असे इंप्रेशन मुळात आहेच कुठे? पांचाळेंनी पहिल्या तीन वाक्यातच अभिप्रायाचा सूर इतका शार्प का करावा काही समजले नाही).

गझल हे वर्गावर्गात दुही वगैरे माजण्याचे एक निमित्त असल्यासारखे का वाटते काहींना हे लक्षात येत नाही.

<<<मनःपूर्वक अभिनंदन! मुखपृष्ठ आणि पांचाळेंचा अभिप्रायही मस्त आहे.>>> + १००१

पांचाळेंचा अभिप्राय मलाही नाही आवडला फारसा तो विशिष्ठ वर्गाची मक्तेदारीवाला मुद्दा खटकण्याजोगाच आहे पण त्याही पेक्षा त्यातला पुढचा भाग ...थाळी.. माळी ..निराळी ..अरे काय हे ??
.अनावश्यक अन् काहीच्या काही ...
उलट अभिप्रायाबद्दल किती गांभीर्य आहे त्याना हे ह्यामुळे कळून चुकते आहे
हा मुद्दा मी वेळ मिळाल्यास त्यानाच प्रत्यक्ष मॅसेज करून फेसबूक्वर कळवावा म्हणतो!!!!!

अभिनंदन, मुटे. Happy

बेफी, मी अगदी तेच लिहायला आले! थाळी काय, माळी काय, कैच्याकैच लिहिलंय पांचाळेंनी.

थाळी काय, माळी काय, कैच्याकैच लिहिलंय पांचाळेंनी.<<<

पण Swati Tai,

I don't know who is Panchale.

कोणीतरी मला म्हणाले की स्वर्गवासी श्री सुरेश भटसाहेब त्यांना एका 'विशिष्ट' शब्दाने बोलावत.

अभिनंदन आणि शुभेच्छा !!
भीमराव पांचाळेंनी बहुधा अभिप्रायात मुटेजींच्याच गझलांचा संदर्भ वापरला असावा.

मुटेजी अभिनंदन. पुस्तकाच्या देखणेपणाची कल्पना येतेय. राजकडून मागवेनच.
ब्लर्ब काही आवडला नाही, म्हणजे कंटेंट.
एनीवेज पुन्हा अभिनंदन.

Pages