Submitted by अ. अ. जोशी on 5 November, 2013 - 10:55
लावा कोणी कुणा चुना रे...
पण जगण्यावर हसू नका रे...
सोडा लज्जा जशी, जिथे.. पण..
माणुसकीची तरी धरा रे...
मारा, झोडा, शिव्याच द्या.. अन्
तुमची मी..., एकदा म्हणा रे...
क्षण क्षण जातो निघून सटकन
उरला तो राहिला तुझा रे..
उडवा, मनसोक्त चिखल उडवा
दर्पणही एकदा बघा रे...
कोणी जगते, कुणी जगविते
असते जगती अमर व्यथा रे
भातुकलीचाच खेळ जीवन
हे कळले तर किती मजा रे...
सर्कस आहे प्रपंच म्हणजे
बिनजाळीचा जसा झुला रे...
जगती कोठेच सूख नाही
दुःख तरी मग कुठे मुला रे..?
मावळतीचा रवी 'अजय' बघ..
क्षितिजी सांगे, असे उरा रे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भातुकलीचाच खेळ जीवन हे कळले
भातुकलीचाच खेळ जीवन
हे कळले तर किती मजा रे...
सर्कस आहे प्रपंच म्हणजे
बिनजाळीचा जसा झुला रे...<<<
वा वा
बाकी 'सूख' वगैरे खटकले.
उरला तो राहिला तुझा रे..<<< ही ओळही छान!
प्रपंच म्हणजे सर्कस आहे - वगैरे करून जरा सुलभ करता येईलच. असो!
एकुण उपदेशात्मक शेर सोडले तर छान गझल!
>>>(द्रुत गझल)<<<
>>>(द्रुत गझल)<<<
बेफिकीर, धन्यवाद.. सूख
बेफिकीर,
धन्यवाद..
सूख खटकण्याचे कारण कळले नाही...
त्याचप्रमाणे, उपदेशात्मक शेर हा शब्दप्रयोग उपहासात्मक का वापरला आहे हेही कळले नाही.
धन्यवाद.
सूख खटकण्याचे कारण कळले
सूख खटकण्याचे कारण कळले नाही...
त्याचप्रमाणे, उपदेशात्मक शेर हा शब्दप्रयोग उपहासात्मक का वापरला आहे हेही कळले नाही.<<<
उपदेशात्मक हा शब्द उपाहासात्मक आहे हा निष्कर्ष तुम्हीच काढताय ना? मला तर ते सरळ सरळ उपदेशात्मक वाटत आहेत. असे असे वागा, असे असे नको! त्यात काय उपहास? तुम्हीच तर हे शेरात म्हणताय!
>>>लावा कोणी कुणा चुना रे...
पण जगण्यावर हसू नका रे...
सोडा लज्जा जशी, जिथे.. पण..
माणुसकीची तरी धरा रे...
मारा, झोडा, शिव्याच द्या.. अन्
तुमची मी..., एकदा म्हणा रे...<<<
हा उपदेश नाही तर काय अगतिकता आहे का?
सुख खटकले तर प्रॉब्लेम होतो, सूख खटकले तर नाहीच.
तेच!! मीही हेच विचारायला
तेच!! मीही हेच विचारायला आलेलो........द्रुत गझल ?????
बाकी मी प्रतिसादही कॉपी करतो असे कोणी म्हणू नये म्हणून आवडलेले शेर ओळी सांगत नाही आहे
बाकी ;
तुमची मी..., एकदा म्हणा रे...<<< दुसरी ओळ कन्फ्यूजिंग ! शेर समजला नाही
उडवा, मनसोक्त चिखल उडवा<< द्रुत च्या नादात वृत्त गडबडलेले दिसते आहे :)..म्हणजे लय तरी नक्कीच बिघडलेली आहे मात्रा मी मोजत नाही कारण मला जाम कंटाळा येतो
हं !!आता ती ओळ लयीत कशी
हं !!आता ती ओळ लयीत कशी वाचायची हे समजले आहे जरासाच ताण पडत अहे आता मघाशी अगदीच जमत नव्हते
असो
गजल आवडली. <<<द्रुत गझल>>>
गजल आवडली.
<<<द्रुत गझल>>> अर्थ समजला नाही.
<<जगती कोठेच सूख नाही
दुःख तरी मग कुठे मुला रे..?>>
"सूख" खटकतेच! कुणीतरी --- अगदी संत रामदासस्वामींनीसुद्धा --- कधी सूट घेतली; म्हणून अपवादाला नियम म्हणायचे का? विशेषतः पर्याय उपलब्ध असेल; तर का वापरू नये? उदा. ही ओळ अशी लिहिली तर कशी वाटेल ते पहा--
"सुख जगती या नाही कोठे"
तीन चार वेगवेगळ्या तर्हेने ही ओळ लिहिता येईल.
सूख लिहिताना खटकतो बोलताना
सूख लिहिताना खटकतो बोलताना नाही मी आजवर पाहिलेली ९९ % माणसे सूख असाच उच्चार करताना पाहिली आहेत (९९% = थोडासा आपला अतिशयोक्ती अलंकार !! :))
गझल आवडली
गझल आवडली
सुख की सूख हा प्रश्नच आहे.
सुख की सूख हा प्रश्नच आहे. काढायला गेलो तर अनेक प्रश्न निघू शकतात. त्यामुळे असो.
सर्वांना धन्यवाद.
बेफिकीर,
तुम्ही वापरलेला उपदेशात्मक हा शब्द बरोबर नाही.
****
मारा, झोडा, शिव्याच द्या.. अन्
तुमची मी..., एकदा म्हणा रे... *****
यात उपदेश आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते बरोबर नाही.
असो. धन्यवाद.
शरद, द्रुत एवढ्यासाठी लिहीले
शरद,
द्रुत एवढ्यासाठी लिहीले की, आतापर्यंत माझी सर्वात कमी वेळेत लिहीलेली म्हणून.
आणि....
"सुख जगती या नाही कोठे ----
लगावली बदलते आहे येथे.
माझे मत ः केवळ ह्रस्व-दीर्घासाठी बदल करू नये असेच मला वाटते. पूर्वीही यावर अनेकदा चर्चा घडल्या आहेत.
भातुकलीचाच खेळ जीवन हे कळले
भातुकलीचाच खेळ जीवन
हे कळले तर किती मजा रे...
सर्कस आहे प्रपंच म्हणजे
बिनजाळीचा जसा झुला रे...
आवडले हे शेर .
धन्यवाद !
<<केवळ ह्रस्व-दीर्घासाठी बदल
<<केवळ ह्रस्व-दीर्घासाठी बदल करू नये असेच मला वाटते>>
तुमच्या मताचा मी सन्मान करतो. ह्रस्व-दीर्घापेक्षा जास्त महत्व तुम्ही लगावलीला देत आहात. हा वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे. पण त्यामुळे दुसरा एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो; तो म्हणजे गजल मात्रावृत्तात असावी की नसावी.
फक्त अक्षरगणवृत्तातच गजल असावी असे सुरेश भट प्रणित सर्व कवी म्हणतात. मी सुद्धा शक्यतो अक्षरगणवृत्तातच गजल लिहिण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेत तीन मात्रांचे बरेच शब्द असे आहेत; जे मात्रावृत्तासाठी चपखलपणे वापरता येतात, पण अक्षरगणवृत्तासाठी नाही. त्यामुळे मराठी भाषेत गजल रचताना अनावश्यक बंधने येतात. हिन्दी-उर्दूमध्ये सुद्धा ही बंधने पूर्वी येत असावीत; पण त्यांनी सोईस्कररित्या शब्दांचे बदलेले स्वरूप सर्वमान्य करून घेतले - उदा. खून च्या बदल्यात खूं, जान च्या बदल्यात जां, जुनून च्या बदल्यात जुनूं वगैरे. मराठीमध्ये असे बदल फारसे मान्य झालेले नाहीत (परत तो सुरेश भटांचाच प्रभाव असावा.)
असो. हा वादाचा विषय आहे. कधी सखोल चर्चा घडवून आणता येईल.
माझे वैयक्तिक मत असे आहे की शब्दांचे स्वरूप बदलण्यापेक्षा मात्रावृत्तात गजल मान्य करावी; कारण मराठीला मात्रावृत्ताची मोठी परंपरा आहे. माझी मात्रावृतातील एक आवडती गजल (खुळा रत्नपारखी) मी पुढे पोस्ट करत आहे. कशी वाटते ते सांगावे.
मराठी गझल मात्रावृत्तात
मराठी गझल मात्रावृत्तात लिहावी की नाही हा प्रश्न आता खूप मागे पडून गेलेला आहे असे वाटते. माझ्या मते,
मात्रा वृत्त - खयाल नैसर्गिकरीत्या मांडायला उत्तम परंतू गझलेच्या रचना सौंदर्याला बाधा आणणारे.
अक्षरगणवृत्त - कसलेल्या क्राफ्ट्समनशिपची मागणी करणारे. गझलेचे बाह्य सौंदर्य द्विगुणित करणारे.
शरद, ****************** फक्त
शरद,
******************
फक्त अक्षरगणवृत्तातच गजल असावी असे सुरेश भट प्रणित सर्व कवी म्हणतात. मी सुद्धा शक्यतो अक्षरगणवृत्तातच गजल लिहिण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेत तीन मात्रांचे बरेच शब्द असे आहेत; जे मात्रावृत्तासाठी चपखलपणे वापरता येतात, पण अक्षरगणवृत्तासाठी नाही. त्यामुळे मराठी भाषेत गजल रचताना अनावश्यक बंधने येतात. हिन्दी-उर्दूमध्ये सुद्धा ही बंधने पूर्वी येत असावीत; पण त्यांनी सोईस्कररित्या शब्दांचे बदलेले स्वरूप सर्वमान्य करून घेतले - उदा. खून च्या बदल्यात खूं, जान च्या बदल्यात जां, जुनून च्या बदल्यात जुनूं वगैरे. मराठीमध्ये असे बदल फारसे मान्य झालेले नाहीत (परत तो सुरेश भटांचाच प्रभाव असावा.)
असो. हा वादाचा विषय आहे. कधी सखोल चर्चा घडवून आणता येईल.
माझे वैयक्तिक मत असे आहे की शब्दांचे स्वरूप बदलण्यापेक्षा मात्रावृत्तात गजल मान्य करावी; कारण मराठीला मात्रावृत्ताची मोठी परंपरा आहे.
*****************
तुमचा अनावश्यक बंधने हा विचार बरोबर वाटला. त्याचप्रमाणे, तुमचे वैयक्तिक मतही माझ्या मतांशी जवळीक साधणारे आहे. माझ्यामते, मराठीमध्ये अनेक गोष्टींचा उगाचच बाऊ केला जातो. हिंदी किंवा उर्दू भाषेत लवचिकता आहेच यापेक्षा ती निर्माण केली गेली आहे असे मी मानतो. त्यामुळे एखादा विचार मांडायला सोपा जातो. मराठीतही मात्रावृत्त मान्य आहेच की... त्याला विरोध कोणाचाच नाही. फरक हा आहे की मराठी मन काही गोष्टी स्वीकारायला पटकन तयार होत नाही. माझ्यामते, सध्या जी वृत्ते मान्य आहेत त्यातही पुढे वाढू शकतीलच की.... ठोकळेबाज गझल करण्यापेक्षा काही विचार सांगणारी मात्रावृत्तातील गझल नक्कीच चांगली. मात्र, गझलेच्या नियमानुसार एकदा का आपण जमीन(लगावली) नक्की केली की प्रत्येक शेरांत ती बदलू नये. सुरूवातीलाच मात्रा वृत्त असेल तर हाही प्रश्न मिटला.
आता माझ्या -सूख- या शब्दाबद्दल..... माझ्यामते जर विचार चांगला असेल आणि वृत्तात बसत असेल तिथे ह्रस्व - दीर्घ क्षम्य असावे असे वाटते.
कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी ह्रस्व माझाच मी दीर्घतो
असा शेर मी 3-4 वर्षांपूर्वी लिहिला होता त्याची या निमित्ताने आठवण झाली.
धन्यवाद....
१. 'रे' ही रदीफ घेतली नाही
१. 'रे' ही रदीफ घेतली नाही तरीही ही गझल रचता येईल. रे मुळे व्हॅल्यू अॅडिशन झाल्यासारखे जाणवत नाही. तसेच, हा निर्णय शेवटी कवीचा, असे म्हणणेही 'याबाबतीत' तितकेसे योग्य नाही कारण अनावश्यक बाबी टाळणे किंवा गझलेत ठेवणे हा काही काव्यसृजनाशी निगडित असलेला भाग नाही ज्यात कवीला स्वातंत्र्य हवेच वगैरे असावे.
२. ओळी सुलभ करता येणे शक्य आहे. खाली एक उदाहरण घेतले आहे.
>>>सोडा लज्जा जशी, जिथे.. पण<<<
या ओळीचा अर्थ बहुधा असा असावा की 'जेव्हा हवी तेव्हा, जिथे हवी तिथे लाज सोडून वागा, पण....'
आता 'जशी, जिथे... पण' यात हा सगळा अर्थ कसाबसा बसवल्याचे ठळकपणे जाणवले. 'जिथे तिथे पण' तसेच 'हवी तिथे पण' असेही काही सहज सुलभ उपाय होते. सुलभता नसलीकी अडखळायला होते आणि रसभंग होतो. ओळी प्रवाही व सहज येणे गझलेत महत्वाचे वाटते. ही सुलभतेची वानवा खालीलसारख्या अनेक ओळींमध्ये खटकत आहे, हे लिहावे लागले याबद्दल क्षमस्व!
मारा, झोडा, शिव्याच द्या.. अन् (येथे अन् ऐवजी 'पण' आवश्यक वाटत नाही आहे का कोणालाच?)
तुमची मी..., एकदा म्हणा रे...
उडवा, मनसोक्त चिखल उडवा
दर्पणही एकदा बघा रे...
जगती कोठेच सूख नाही
दुःख तरी मग कुठे मुला रे..?
(या शेरात 'मुला' या काफियाचा संदर्भ माझ्यातरी लक्षात आला नाही. शिवाय, आधीच्या एका शेरात जगती हा शब्द आल्याने पुन्हा जगती वाचताना असे वाटले की त्या ऐवजी 'जगात'ही चालले असते. तसेही, जगात हे कगतीपेक्षा अधिक बोलके व सुलभ तसेच प्रचलीत आहे).
मला वाटते की ओळींचा प्रवाहीपणा व सहजता हे मुद्दे निघत असताना अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, मराठी कवींनी अनेक गोष्टी न स्वीकारणे वगैरे मुद्दे चर्चिण्यात तितकासा अर्थ नाही.
बेफिकीर, ***** १. 'रे' ही
बेफिकीर,
***** १. 'रे' ही रदीफ घेतली नाही तरीही ही गझल रचता येईल. रे मुळे व्हॅल्यू अॅडिशन झाल्यासारखे जाणवत नाही. तसेच, हा निर्णय शेवटी कवीचा, असे म्हणणेही 'याबाबतीत' तितकेसे योग्य नाही कारण अनावश्यक बाबी टाळणे किंवा गझलेत ठेवणे हा काही काव्यसृजनाशी निगडित असलेला भाग नाही ज्यात कवीला स्वातंत्र्य हवेच वगैरे असावे. ****
रे मुळे नेमका काय भाव निर्माण होतो हे कदाचित तुम्हाला समजले नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल त्यामुळे ते सांगण्यात मी वेळ वाया घालवू इच्छित नाही. निर्णय कवीचा असे कोणत्या अर्थाने मी नेहमी म्हणतो हेही तुम्हाला अजून कळलेले दिसत नाही. त्यामुळे तो विषय नकोच. अनावश्यक बाबी आणि काव्यसृजन वगैरे शब्द तुम्ही विनाकारण वापरू नयेत.
****** २. ओळी सुलभ करता येणे शक्य आहे. खाली एक उदाहरण घेतले आहे.
>>>सोडा लज्जा जशी, जिथे.. पण<<<
या ओळीचा अर्थ बहुधा असा असावा की 'जेव्हा हवी तेव्हा, जिथे हवी तिथे लाज सोडून वागा, पण....'
आता 'जशी, जिथे... पण' यात हा सगळा अर्थ कसाबसा बसवल्याचे ठळकपणे जाणवले. 'जिथे तिथे पण' तसेच 'हवी तिथे पण' असेही काही सहज सुलभ उपाय होते. सुलभता नसलीकी अडखळायला होते आणि रसभंग होतो. ओळी प्रवाही व सहज येणे गझलेत महत्वाचे वाटते. ही सुलभतेची वानवा खालीलसारख्या अनेक ओळींमध्ये खटकत आहे, हे लिहावे लागले याबद्दल क्षमस्व!
मारा, झोडा, शिव्याच द्या.. अन् (येथे अन् ऐवजी 'पण' आवश्यक वाटत नाही आहे का कोणालाच?)
तुमची मी..., एकदा म्हणा रे...
उडवा, मनसोक्त चिखल उडवा
दर्पणही एकदा बघा रे...
जगती कोठेच सूख नाही
दुःख तरी मग कुठे मुला रे..?
(या शेरात 'मुला' या काफियाचा संदर्भ माझ्यातरी लक्षात आला नाही. शिवाय, आधीच्या एका शेरात जगती हा शब्द आल्याने पुन्हा जगती वाचताना असे वाटले की त्या ऐवजी 'जगात'ही चालले असते. तसेही, जगात हे कगतीपेक्षा अधिक बोलके व सुलभ तसेच प्रचलीत आहे). *****
उपरोक्त प्रतिसादात काहीतरी काढायचे म्हणून सहज, सुलभता वगैरे शोधून काढले आहे इतकेच. बाकी मी तुमच्या या म्हणण्याला महत्व देत नाही.
मुला या काफियाचा संदर्भ तुमच्या लक्षात आला नाही म्हणता तर त्याबद्दल सांगतो...
आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना काही वेळा मुला अशी हाक मारतात. मुला हा उच्चार जरी लहान-थोर भेद करीत असला तरी जवळीक निर्माण करणारा आहे. ज्याला विचार सांगायचा आहे तो लहान पण जवळचा आहे असे मानून लिहीले आहे.
***** मला वाटते की ओळींचा प्रवाहीपणा व सहजता हे मुद्दे निघत असताना अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, मराठी कवींनी अनेक गोष्टी न स्वीकारणे वगैरे मुद्दे चर्चिण्यात तितकासा अर्थ नाही. *****
तुम्हाला ज्या गोष्टी चर्चिण्यात रस नसेल त्यात अर्थ नाही असे नव्हे.
तुम्हाला तुमचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ती मी मान्य करावी असे नक्कीच नव्हे. मात्र ती मते कशी व्यक्त करायची हा निर्णय शेवटी व्यक्त करणाऱ्याचाच....
(No subject)