हा मागच्या वर्षी केलेला -
ह्याचे स्टेप बाय स्टेप फोटो नाही घेतले गेले :(. पंचकोनाला षटकोन चिकटवला आहे
हँडमेड कागदाचा केलेला आकाश कंदील -
पेपरटेल्स - हातकागद संस्था , शिवाजीनगर,पुणे ह्या संस्थेत आकाश कंदीलांचे प्रदर्शन लागले होते. तिकडे हा आकाश कंदील मनात भरला. त्यांच्याकडूनचं कागद घेतले.
साहीत्य -
२ शीटस वेगवेगळ्या रंगाचे हँडमेड कागद
२ शीटस पातळ कागद (आतून लावायला ज्यातून लाईट पास होईल असा)
कात्री
स्टेपलर
पट्टी
कर्कटक
कृती -
१. एकूण २४ गोल आणि २० त्रिकोण लागतात.
गोल - समभुज त्रिकोणाच्या ३ बिंदूतून जाणारे वर्तुळ काढायचे आहे. त्रिकोणाच्या कडांवर फोल्ड करायचे आहे.
त्रिकोण - त्याचं मापाचा समभुज त्रिकोण काढून प्रत्येक बाजूच्या शेजारी थोडी जागा ठेवून कापायचं आहे - ही जागा दोन पिस स्टेपलरने जोडताना उपयोगी पडेल.
२. मी १०.५ सेमी. मापाचा समभुज त्रिकोण काढला. त्याच्या प्रत्येक कोनाचे दुभाजक काढले, ते जिथे मिळाले तिथून काढलेले वर्तुळ ३ ही शिरोबिंदूतून पास झाले. ह्या टेंपलेट चे २४ गोल कापले.
३. पुन्हा एकदा १०.५ सेमी. चा त्रिकोण काढून त्याच्या प्रत्येक बाजू शेजारी थोडी जागा सोडली आणि त्या टेंपलेट चे २० पिसेस कापले.
४. असेंब्ली -
४ त्रिकोणांचा एक असे ५ युनिटस तयार होतील.
३ गोलांचा एक असे ८ युनिटस तयार होतील.
हे तयार केलेले युनिटस -
****** असेंबल करायच्या आधी मुख्य काम म्हणजे त्या त्रिकोण आणि गोलात काही डिझाईन काढून ते कापणे.( हे काम पूर्णपणे नवर्याने केले त्यामुळे मी आधी लिहायचं विसरून गेले ;)) . त्यानंतर त्या डिझाईन वर पातळ कागद चिकटवला.
आता मुख्य जोडाजोडी -
४ त्रिकोणांचं जे एक युनिट आहे त्याच्या प्रत्येक टोकाला एक असे ४ गोलांचे (३ गोलांचा एक असे जे युनिटस बनवले आहेत ते) युनिटस स्टेपलरने जोडायचे.
आता त्या प्रत्येक गोलाच्या युनिटच्या मधे त्रिकोणाच युनिट बनवलं आहे ते फिट करायचं आहे.
आता प्रत्येक त्रिकोणाच्या मधे उरलेले गोल बसवायचे आहेत.
हा झाला आकाश कंदील तयार -
झक्कास!
झक्कास!
खुपच सुन्दर! मागच्या दिवाळीला
खुपच सुन्दर!
मागच्या दिवाळीला ऑफिसात केलेला आकाशकंदिल
सुरेख!
सुरेख!
नविन कंदिलही मस्त. किती
नविन कंदिलही मस्त. किती पंचकोन आणि किती षटकोन? यात कडा आत गेल्यात तर जोडाजोडी कशी केली?
जुन्यात सगळेच वर्तुळाकार घेऊन चालणार नाही का?
भारीच की..... हातकागद संस्थेस
भारीच की.....
हातकागद संस्थेस एकदा भेट दिलीच पाहिजे.... क्राफ्ट करता मस्त पेपर मिळतील तिथे..
तिथली वेळ काय असते?
Khup Chan!
Khup Chan!
Pages