संहिता, एक इशरी चित्रपट
No meaningful aspects of the movie were hurt in the making of this review.
नाही, शिर्षकातून व वगळला नाही, Eschery, Escher च्या जगासारखा असे मला म्हणायचे आहे. अॉप्टीकलच नाही तर मेंटल इल्युजन्सनी परिपुर्ण. एक गोष्ट - त्यातील भावार्थाचे वेगवेगळे इंटरप्रीटेशन्स, कथेत गोष्ट लिहिणारे, तसेच त्या गोष्टीला वेगळ्या माध्यमात रुपांतरीत करणारे. हे लोक स्वत:ला त्या पात्रांमधे न पाहणारे, पण दर्शकांना ते तत्सम दिसणारे, भासणारे, जाणवणारे - थेट पॅरॅलल्स असलेले, आणि नसणारे. स्वत:ला पात्रांमध्ये न पाहताही पात्रांकडून बोध घेणारे. अतीशय झेनी आणि सर्रीयल. पण त्याचवेळी मजबूत, सशक्त, तरल, नाजूक आणि प्रत्यक्ष. काही ठिकाणी प्रेडिक्टेबल, पण ते ही आशा तऱ्हेनी की त्या प्रेडिक्टीबिलिटीतुन सत्य/obvious जाणवल्याचा आनंद व्हावा. कथेचा शेवट प्रत्येकाच्या दृश्र्टीने योग्य हवा असल्यास प्रत्येकाला स्वत:ला ओळखता येणे आवश्यक आहे. वरवर कॉंप्रमाईज वाटणाऱ्या गोष्टींमधून द्विगुणीत होणारा आनंद. सम-हिताचा …
इशरने अनेक सेल्फ पोर्ट्रेटस (इचेस) बनवले, तसे पाहता प्रत्येक कृतीत कर्त्याचा हातच नाही तर इतिहासही दिसतो. संहिता म्हंटल्यावर तर तसे असणारच. तुम्ही तुमची संहिता लिहिणार की कर्ता-करवीता (so called) तुमची लिहिणार, की तुम्ही समर्थपणे इतरांची लिहिणार? की तुमची आणि आमची सेमच असते?
काही सिंबॉलीक डिव्हायसेस प्रत्यक्षात तसे नसतात (उदा. मंकी इन द मिडल) , पण शेवटी ते सिंबॉलीकच. काही ठिकाणी जास्तच क्लोजप्स आहेत, पण ते ठिकाय. साहेबांना ती गोष्ट का आवडली ते तितकेसे कळत नाही - त्यांची गोष्ट अॅंटी-पॅरॅलल वाटली. जीयामध्ये झालेला बदल. अशा तुरळक गोष्टी वगळता सगळे मस्त जमले आहे.
ज्याप्रमाणे प्रत्यक्षात न दिसता काही कलाकार कथानकास हातभार लावतात (उदा. अमन) त्याचप्रमाणे किंचीत झळकून हातभार लावणारे मायबोलीकर भावले. आणखी एका चांगल्या चित्रपटाचा पुरस्कार केल्याबद्दल मायबोलीला kudos. कलाकारांचे प्रत्यक्षात अभिनंदन करता आले आणि काही इतर मायबोलीकरांना ओझरते का होईना भेटता आले याचा आनंद झाला.
मोबाईल फोनचा कॅमेरा वापरून काढलेले (अर्थात लो-क्वालिटीचे) फोटो काढणाऱ्यांचे फोटो नंतर टाकण्यात येतील.
इतक्या थोडक्यात इतका आशय
इतक्या थोडक्यात इतका आशय असलेलं लिहिलंस. सही.
साहेबांची स्वतःची, आणि शिवाय साहेबांना आवडलेली गोष्टही न्यारीच असू शकेल अरे. ती आपल्यासमोर आलीच नाही..
कडक अस्चीग , साजिरा.. >> फोटो
कडक अस्चीग , साजिरा..
>> फोटो काढणाऱ्यांचे फोटो नंतर टाकण्यात येतील.>> हेही
अस्चिग, तू नक्की काहीतरी
अस्चिग, तू नक्की काहीतरी वेगळे लिहिशील असे वाटले होते. मला चित्रपटाचा झेनी आणि सर्रीयल अस्पेक्ट जाम आवडला... ज्याला जसा हवा तसा... जसा पाहू तसा..! आरशातलं स्वतःचं बिंब कसं दिसत आहे हे आपल्या नजरेवर अवलंबून.
तू शुभारंभाच्या खेळाला आला आहेस हेच मला चित्रपटाच्या मध्यंतरात समजले!
सही लिहिलं आहेस अश्चिग
सही लिहिलं आहेस अश्चिग टोटली वेगळं.