'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.
मला या खेळाला उपस्थित रहाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली ते केवळ आपली मायबोली या चित्रपटाची माध्यम प्रायोजक असल्याकारणाने व चिनूक्सामुळे
आजवर ज्यांच्याबद्दल केवळ ऐकले वाचलेच होते. ज्यांच्या 'पाणी', 'बाई' सारख्या लघूपटांपासून चालू झालेल्या कारकिर्दीचा मी दूरस्थ प्रेक्षक होतो, ज्यांच्या दोघी, वास्तुपुरुष सारख्या चित्रपटांचा चाहता होतो, त्या सुमित्रा भावे सुनिल सुखथनकर या जोडगोळीच्या नवाकोर्या संहिता या चित्रपटाच्या प्रदर्शन-निमित्ताने त्यांना जवळून बघण्याची संधी कोण बरे दवडेल. तसेच ज्या चित्रपटाने अनेकविध पारितोषके मिळवून प्रत्यक्ष प्रदर्शनापूर्वीच जनामनात उत्कंठा निर्माण केलेली होती त्या चित्रपटाच्या पुण्यातल्या पहिल्या खेळाला उपस्थित रहाण्यामागे अजून एक कारण म्हणजे मिलींद सोमण. (पण आमचे वेगळे आहे)
जरा अवांतर - मी सध्या मॅरॅथॉन मधे भाग घेण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. मध्यंतरी पुण्यात झालेल्या रन बियाँड मायसेल्फ नावाच्या चॅरिटी रन मिलींद सोमण अनवाणी पायांनी अर्ध मॅरॅथॉन धावला होता. त्याच स्पर्धेत मी माझी सर्वप्रथम लांब पल्ल्याची शर्यत म्हणजे १५ किमी अंतर धावलो; इथे बूट घालून धावतानासुद्धा नाकी नऊच काय पण दहा अकरा बारा येतात आणि हा माणूस अर्ध मॅरॅथॉन (२१ किमी) हे अंतर बर्यापैकी चांगल्या (काँपिटेटिव्ह) वेळेत पार करतो ही गोष्ट माझ्यासाठी त्याच्या रॅम्प, अॅड फिल्म्स, म्युझिक अल्बम किंवा चित्रपटातील भुमिकांपेक्षा फार फार मोलाची वाटते. (याचा अर्थ तुम्हाला असे वाटत असेल की मी त्याच्या ह्या कामांना किंवा ग्लॅमर क्षेत्राला कमी लेखतोय तर हो तुम्हाला नक्कीच कळलंय मला काय म्हणायच आहे ) पण त्या स्पर्धेच्या नंतर मीच इतका दमलेला होतो की त्याच्यापाशी जाऊन चार शब्द बोलायचे त्राणदेखिल माझ्यात उरले नव्हते, त्यामुळे हा दुग्धशर्करा योग (कोजागिरी जवळ आली आहे ना! नाहीतर मणी कांचन म्हणणार होतो) साधायचाच असे ठरवले.
खरेतर फोटो काढायचे असे काही आधीपासून ठरवले नव्हते; चिनुक्साला आयत्यावेळी विचारून मगच कॅमेरा नेलेला. शिवाय अशा प्रकारे फोटो काढण्याची माझी पहिलीच वेळ, त्यात काही फोटो हलले आहेत, फोटो म्हणून त्यांचे मुल्य स्मृतीस उजाळा यापरते काहीच नाही.त्यामुळे काही कमी जास्त झाले असल्यास सांभाळून घ्या.
तर मंडळी अशा रितीने, सहर्ष सादर करत आहे 'संहिता' चित्रपटाच्या पुण्यात झालेल्या, पहिल्या खेळापुर्वी घेतलेल्या काही प्रकाशचित्रांमधली ही निवडक प्रकाशचित्रे.
४. मिसो, पुर्वकल्पना नसताना दिसलेले डॉ. मोहन आगाशे आणि सुनिल सुखथनकर
५. सुमित्रा भावे आणि लालन सारंग
८. अनिल अवचटांसोबत माबोकर साजिरा आणि आनंदयात्री
१०. मिलींद सोमण बरोबर काशी, अरुंधती कुलकर्णी, केदार जाधव
प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होण्याआधी तेव्हा उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मितीशी सर्व संबधित घटकांची ओळख घडवून आणते वेळचे फोटो
११.
१२.
१५. आणि.... (last but definitely not least) प्रा...नाही नाही प्राण नाही, आपला चिनूक्स
आणि शेवटचा म्हणताना अजून काही प्रचि.
देविका
आणि खास लोकाग्रहास्तव मायबोलीकर असलेले समूह प्रचित्रे
आणि परत एकदा, Last but not least मोहन आगाशे आणि.......चिनूक्स
मस्तच.... सगळ्या
मस्तच....
सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो?
तो पण टाक ना असेल तुझ्याकडे तर..
हर्पेन ! प्रथमखेळ पूर्वसमय !
हर्पेन ! प्रथमखेळ पूर्वसमय ! मारलंत शीर्षकापासूनच .प्रचि, क्लोज-अप्स अगदी मस्त आलेत.
चिनूक्स , काशी, केदार,अरुंधती, साजिरा , आनंदयात्री ..माबोकरांना नावानिशी पाहून छान वाटलं . चैतन्य म्हणतोय तसे अजून असतील तर टाका ना फोटो.
मस्त
मस्त
छान फोटो. सुमित्रा भावेंची
छान फोटो.
सुमित्रा भावेंची साडी काय सुरेख आहे!!
क्लास! मायबोलीचा बोर्ड
क्लास! मायबोलीचा बोर्ड मस्त!
काशी आणि अरु !!! काशीचा चेहरा कसल्ला चमकतोय! सह्ही (झारा, बघतेयस ना??? )
डॉ. मोहन आगाशेंना देऊळच्या प्रिमियरला पाहिलं होतं तेव्हा एकदम खानदानी पोषाख होता. हा पोषाखही मस्त दिसतोय त्यांना.
मुंबईत एकदम साधे आलेले कलाकार एकदम ट्रेन्डी दिसतायत पुण्यात. राजेश्वरी नाही का आली?
चिन्मय खूप दमलेला दिसतोय.
मस्त फोटोग्राफ्स हर्पेन.
मस्त फोटोग्राफ्स हर्पेन.
आता तू मिलिंद सोमणच्या पादत्राणांबद्दल त्याच्याशी जे काही बोलत होतास त्यामागची पार्श्वभूमी समजली!!
मस्तच फोटो इथे सविस्तर
मस्तच फोटो
इथे सविस्तर फोटोवृत्तांत टाकल्याबद्दल धन्यवाद
केश्वे.. अश्विनी नावाच्या व
केश्वे.. अश्विनी नावाच्या व के पासुन अड्णाव अस्लेल्यांना जास्त फायदा झाला ना प्रिमिअरचा
अगदीच
अगदीच
क्या बात है खासच आलेत सगळे
क्या बात है खासच आलेत सगळे फोटो
देविका इथे कालच्यापेक्षा छान दिसतेय आणि सोमण तर देवा रे देवा!!
किती प्रसन्न भाव आहेत सर्वांच्याच चेह-यावर... हर्पेन, टू गुड!
मस्त आहेत सगळे फोटो . सगळ्या
मस्त आहेत सगळे फोटो .
सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो?
तो पण टाक ना असेल तुझ्याकडे तर. >> +१
देविका आणि मिसो सुपर्ब! एकदम
देविका आणि मिसो सुपर्ब! एकदम क्लास फोटो!
सर्व माबोकर मस्त!
काशी, तुझ्या चेहर्यावरचा
काशी, तुझ्या चेहर्यावरचा आनंद लपत नाहीये अजिब्बात! केश्विला अनुमोदन!
अर्रे वा, इतक्या सार्या
अर्रे वा, इतक्या सार्या प्रतिक्रिया,
धन्यवाद मंडळी,
"सगळ्या मायबोलीकरांचा आणि संहिताच्या टीमचाही एक घेतला होता ना फोटो" - ह्या फोटोत माझ्याकडे कोणी कोणी बघत नाहिये (आयाच्या कॅमेर्यात असणार हा फोटो) माझ्याकडचा फोटो तिरक्या कोनातला आहे, तरी हा आणि अजून काही फोटो आहेत ते नंतर टाकतो, जमले तर आजच रात्री नाहीतर रवीवारी दुपारनंतर...
आमचे येथे येत्या रवीवारी (२० ऑक्टोबर रोजी) सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याकारणाने (आयोजकांमधे मी पण आहे) जरा पुर्व तयारी करायची आहे तेव्हा कृपया धीर धरून सहकार्य करा.
तसेच रक्तदानासाठी येण्याचे करावे.
अधिक माहिती इथे मिळेल
http://jahirati.maayboli.com/node/914
कोण आहे रे ते पाहिजे तर फोटो नको टाकू पण रक्त नको मागू म्हणत आहे
काशी, फारच उच्चीचे ग्रह होते
काशी, फारच उच्चीचे ग्रह होते गं बाई तुझे काल!! हर्पेन, तो मिलिंदचा क्लोजप जखम करणारा घेतलायस.. त्याला स्वतःलाही आवडेल तो.
मिलींद सोमण...सहिच....
मिलींद सोमण...सहिच....
वा! छान लिखाण आणि फोटो तर
वा! छान लिखाण आणि फोटो तर मस्तच! माबोकर साक्षात समक्ष दिसताहेत..........नावानिशीवार!
मस्तच आलेत फोटो
मस्तच आलेत फोटो
मस्त आलेत फोटो, पुण्याला
मस्त आलेत फोटो, पुण्याला राजेश्वरी आली नव्हती का?
छान, हर्पेन मिलिंद सोमणचा
छान, हर्पेन मिलिंद सोमणचा क्लोजप खरंच किलर आहे.
मायबोलीकरांसोबतचे ग्रुप फोटो काढलेत तेही इथे टाक की.
काशीने ज्या पद्धतीने मिलिंदला तिच्यासोबतच्या फोटोसाठी सांगितलं, ते अचाट होतं. त्याचा व्हिडिओच काढायला हवा होता. क्षणभर मिलिंदलाच फोटोचं भयंकर टेम्प्टेशन आलं की काय, असं वाटण्याइतक्या लगबगीने त्याने सुंदर पोझ दिली! वरून आवर्जून 'बघू कसा आलाय फोटो' असंही.
ऐला, मी पण होतो की... माझा
ऐला, मी पण होतो की... माझा फोटो कुठे दिसत नाही ते
मी नसते एथे फार. पण सिनेमा
मी नसते एथे फार. पण सिनेमा आहे , हे कुठे कळते,कसे कळते. म्हण्जे येता येईल पुढच्या वेळेस..
छानेत फोटो.
छानेत फोटो.
चैतन्य, भारती, केदार, समूह
चैतन्य, भारती, केदार, समूह प्रचित्रे टाकली आहेत
केश्विनी, अन्जू - पुण्यातल्या चित्रपट प्रदर्शनासाठी राजेश्वरी आली नव्हती
saee, साजिरा, खर्र्च का
saee, साजिरा, खर्र्च का मिलींदचे फोटो इतके चांगले / किलर आलेत? पण यात माझा हात काही नाही, मिलींदचा आहे
मस्त फोटोज हर्पेन मिसो
मस्त फोटोज हर्पेन
मिसो सुपर्ब दिसतोय
मस्त फोटोज!! काशी किती हसशील
मस्त फोटोज!!
काशी किती हसशील अगं.. चेहरा उजळलाय नुस्ता!
माप्रा, इकडे लॉस एंजिलीसला आणा की एक प्रिमिअर.. आम्ही कसं अन कधी भेटायचं या लोकांना?
अकु आणि काशी लई भारी! मिसो ईज
अकु आणि काशी लई भारी! मिसो ईज लकी( प्र्त्येक वेळा सेलेब्रिटीच काय कौतुक! आमचे मायबोलिकर काय कमि सेलेब्रिटि आहेत ़कि काय?)
देविका चे स्नेप भारि! मिसो अजुनही भारिच्च दिसतो...
मीही टाकलेत फोटो..
मीही टाकलेत फोटो..
छान आहेत फोटो. ४ नंबरचा
छान आहेत फोटो.
४ नंबरचा आगाशेसायबांचा पण झकास आहे.
Pages