Submitted by राहुल नरवणे. on 15 October, 2013 - 05:59
माझीया मना, बोलणा असा ...
असा कसा तू, तुझा रंग कसा ?
कोणता आकार, वेश कसा,
माझीया मना बोलणा असा. . . !
रंग भक्तिचा, आकार मूर्तीचा,
मूर्त, अमूर्त, निर्गुण, कि निराकार.
साधा, भोळा, कि कपटी सैतान,
आध्यत्मिक मी असा.
मग तुझा रंग कसा … ?
माझीया मना बोलणा असा. . . !
माझा रंग प्रेमाचा …. असा,
तिच्यासाठी हसणारा, रडणारा,
झुरणारा, मरणारा, अन मारणारा ही,
बिलगणारा, कवटाळणारा,
मदमस्त होऊन तिला मंदधुंद करणारा,
…. असा प्रेमळ 'मी'.
मग तेव्हा तू कसा … ?
माझीया मना बोलणा असा. . . !
उदास, भकास, मलिन मी,
तुसडा, भगवा अन उजाड मी,
कळकट, मळकट, अन मरून
… अपंग, गतप्राण . .
मग तेव्हा तू कुठं . . ?
अन कसा . . ?
माझीया मना बोलणा असा. . . !
मी एकटा एकटचं मन …
मग तरी इतके रंग अन इतके आकार …
इतक व्यापक 'मन'.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users