घुसमट

Submitted by रसप on 8 October, 2013 - 00:41

तळमळणार्‍या, घुसमटलेल्या अनेक रात्री उश्यास घेउन
आठवणींची चादर ओढुन
कधी कधी मी विचार करतो
काय नेमके तुटले आहे?
काय हरवले, काय खोलवर रुतले आहे ?

तू नसताना विचार येती पूर्णत्वाला
उत्तर कळते
स्वच्छ मोकळ्या नभासारखे क्षणभर वाटे

आणि स्वतःशी बोलू बघता -
शब्द फिरवती पाठ असे की,
त्यांच्या लेखी माझी किंमत नसेच काही !

पुन्हा एकदा सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर मला मिळू दे
तोड अबोला, मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!!

....रसप....
७ ऑक्टोबर २०१३

किंवा

तळमळणार्‍या,
घुसमटलेल्या
अनेक रात्री
उश्यास घेउन
आठवणींची
चादर ओढुन
कधी कधी मी
विचार करतो
काय नेमके
तुटले आहे?
काय हरवले,
काय खोलवर
रुतले आहे ?

तू नसताना
विचार येती
पूर्णत्वाला
उत्तर कळते
स्वच्छ मोकळ्या
नभासारखे
क्षणभर वाटे

आणि स्वतःशी
बोलू बघता -
शब्द फिरवती
पाठ असे की,
त्यांच्या लेखी
माझी किंमत
नसेच काही !

पुन्हा एकदा
सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर
मला मिळू दे
तोड अबोला,
मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!!

....रसप....
७ ऑक्टोबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/10/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द फिरवती पाठ असे की,
त्यांच्या लेखी माझी किंमत नसेच काही ! ... खूप आवडले

पुन्हा एकदा सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर मला मिळू दे
तोड अबोला, मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!

एकसे बढकर एक अभिव्यक्ती मित्रा... मस्त कविता

घुसमट थोडक्यात पण छान व्यक्त झालेय.

-------------------------------------------------------------

दुसरा फॉर्म गेल्या काही दिवसात तुझ्याकडून अनेकदा वापरला गेल्यामुळेही असू शकेल, पण पहिला फॉर्म अधिक चांगला वाटला.