भुईची पुकार

Submitted by drbalaji on 4 October, 2013 - 08:15

जमीनीला पोखरुन ठाकलय इथल्या उंदरानी
पोकळ बनवलय या भुईलाच ईथल्या घुशींनी
उछ्चाद मांडलाय जागो जागी
फडशा पाडतात ही जनावरं
बिजांचा रूजण्यापुर्वीच
आता कदाचित मातीत
बीज पेरतच नाही कुणी
सारीकडेच वाढत चाललंय
तनकट विषारी वेली
विशाल वांझाट वृक्ष
अन् त्याचच महाकाय जंगल
त्या जंगलात वाढताएत भयानक जनावरं
स्वतःच्या पोटाची आग विझवण्यासाठी
स्वतःच्या पिल्लाचा फडशा पाडणारी
दररोज होताएत युध्द
जंगलाचा राजा ठरवण्यासाठी
पेटताएत प्रचंड वनवे
मैलोनमैल पसरणारे
आता वनव्याची धग सहन होत नाही भुईलाही
ती पुकारतेय पुन्हा माणसाला
त्याच्या माणुसकीसोबत
या जंगलावर राज्य करायला
तिच्या तील कस सरण्या पुर्वीच
या वनव्यात जळूण खाक होण्या पुर्वीच

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users