Submitted by वैवकु on 3 October, 2013 - 15:56
मला माझीच वाटे ती तिच्यावर शेर करताना
कशाने वाटते आहे तसे काहीच नसताना
तिने हरखून माझी विठ्ठलाची ओळ गुणगुणली
तिच्या प्रेमात पडलो मी तिच्या प्रेमात पडताना
तिच्या हृदयात भरल्या अत्तराचा गंध दरवळला
मनाची धाप मोहरली तिचे उच्छ्वास टिपताना
तिच्या ओठांतली गोडी मला चाखायची होती
तिने गाभूळल्या चिंचा हव्या आहेत म्हणताना
तिला सोडून जाताना दिले आभार दु:खांनी
सुखांनी फोडला टाहो तिने पलटून बघताना
पुढे येईल थोडी की लपुन राहील ती मागे
तिला रस्त्यात जर दिसलो तिच्या विरहात फिरताना
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वृत्तं छान संभाळलय, वैभव. पण
वृत्तं छान संभाळलय, वैभव.
पण अगदी खरं सांगायचं तर मला फक्तं वृत्तासाठी गझल लिहिल्यासारखं वाटतय.
उदा.
तिने हरखून माझी विठ्ठलाची ओळ गुणगुणली
तिच्या प्रेमात पडलो मी तिच्या प्रेमात पडताना
ज्या वाचकांना माहीत नाही की तुमच्या गझलांमधे विठ्ठल असतो... (तो असतो, ते आता गझला वाचून अन प्रतिसाद वाचून मायबोलीकरांना कळलय), त्यांनी ह्या शेराचा काय अर्थं लावायचा?
म्हणजे शेराला अर्थं नाही असं नाही. पण एकुणात...
".. अय्या विठ्ठलाची ओळ आली गझलेत" असं म्हणून कोण वाचिका अन का हरखेल? असा प्रश्नं कुणालाही पडेल.
मला खरच कळून घ्यायला आवडेल की, ह्या गझलमधे ह्या पद्धतीने विठ्ठल का आला आहे?
(माझी इतरांना विनंती आहे की, ह्याची टिंगल होऊ नये. मी अन वैभव सुद्धा इथे शिकतो आहोत असा माझा विश्वास आहे.)
धन्यवाद दाद शेर सोप्पा आहे ती
धन्यवाद दाद
ही गम्मतच मला खुणावत होती हा शेर करण्यासाठी !! ) एकीच्या प्रेमात पडता पडता मी दुसरीच्या प्रेमात पडलो
शेर सोप्पा आहे ती म्हणजे केवळ कुणी वाचिका नाही हे सांगणे आधी महत्त्वाचे ती माअझ्यासाठी कोणीतरी विशेष अशीच एक जण असणार आहे हे आधी लक्षात यावे
अशी ती ....तिने हरखून माझी विठ्ठलाची ओळ गुणगुणली ..... म्हणजे आधी वाचली असणार मग हरखून गेली असणार मग गुणगुणली असणार....म्हणजे कुठेतरी आत्वर तिला ती फील करता आली असणार ...हे उघडच आहे माझ्या मते ..आता मी तिच्या प्रेमात पडताना तिच्या प्रेमात पडलो आहे ओळीच्या प्रेमात पडताना प्रेयसीच्या प्रेमात (क्रम बदलूनही अर्थ लावता येतो आहे
एकूणात इथे तिने हरखून माझी विठ्ठलाची ओळ गुणगुणणे म्हणजे मनापासून तिला ती कुठेतरी भावलेली असणे आप्सूकच तिच्या ओठावर्ती ती येणे इतकीशी गोष्टही मला तिच्या प्रेमात पाडायला पुरेशी आहे असा एकंदर आशय अपेक्षित आहे
बाकी, ह्या गझलेबाबतच्या तुमच्या मताशी बराचसा सहमत आहे मीही
होत असतानाच कळते

ही गझल बेकार आहे
पुनश्च धन्यवाद दाद
वैभव, प्लीज.. बेकार नका म्हणू
वैभव, प्लीज.. बेकार नका म्हणू गझलला. वृत्त संभाळता येणंही चांगलच आहे. कसं आहे ना... दोन घागरी अल्लाद आणणारी कुणी एखाद्यादिवशी एक डोक्यावर, एक कमरेला अन एक हातात अशा तीन आणते. त्यादिवशी ती "नेहमीची नजाकतदार" नव्हती म्हणणं चूकच
अजूनही "विठ्ठलाची ओळ" मला खटकतेय. आणि तुम्ही त्याचं समाधानकारक उत्तर नाही दिलय. विठ्ठल इथे न आणता (विठ्ठल हा शब्द) हा शेर कसा बदलता येईल?
कशाने वाटते आहे तसे काहीच
कशाने वाटते आहे तसे काहीच नसताना>>>
मस्त ओळ, अगदी तरहीला द्यावी अशी.
बाकी गझलेबद्दल दाद ह्यांच्याशी सहमत.
बर्यापैकी आवडली.. शायराच्या
बर्यापैकी आवडली..
शायराच्या प्रत्येक गझलेतील सर्वच्या सर्व भाव सर्वांपर्यंत पोचतीलच असे नाही..
मी तुलना करीत नाही...पण ग्रेसांच्या कविता कितीजणांना कळतात? तरी त्यांना ग्रेट म्हटलेच जाते ना...
बाकी वैभवच्या कविता / गझला कळण्यासाठी वैभवच्या विचारात घुसणे आवश्यक आहे
धन्यवाद कणखरजी त्या ओळीबाबत
धन्यवाद कणखरजी त्या ओळीबाबत मलाही असेच वाटते
पोरे धन्स ...तुम्ही प्रतिसादाच्या शेवटी दिलेले वाक्य कोणत्याही कवीबाबत बरोबरच आहे
माझ्या लेखनाबाबत मलाही ते पटते पण वाचक अश्याप्रकारे माझ्या गझलेत सहजासहजी घुसू शकत नसतील तर त्यात माझी गझलच कमी पडत असावी हेच खरे
दाद पुनश्च धन्यवाद एकंदर तुम्हाला विठ्ठलच नकोय तर ....
विठ्ठल काडून टाकला तर मला तो शेरच करावासा वाटणार नाही तरी आपण मागणी करत आहात म्हणून तसे बदलण्याचा विचार करतो आहे सुचल्यास कळवीनच
तूर्तास ह्य सुचण्यावरून एक शेर आठवला...तो देतो
काही सुचेल तेंव्हा सांगेन वाटलेले
सुचलास विठ्ठला तू काहीच बोलवेना
नाजुक झालेत शेर आवडली गझल
नाजुक झालेत शेर
आवडली गझल संपूर्ण
पुलेशु.
पुढे येईल थोडी की लपुन राहील
पुढे येईल थोडी की लपुन राहील ती मागे
तिला रस्त्यात जर दिसलो तिच्या विरहात फिरताना
व्वा !
मला माझीच वाटे ती तिच्यावर शेर करताना>>हा मिसरा समजला नाही .
पुढे येईल थोडी की लपुन राहील
पुढे येईल थोडी की लपुन राहील ती मागे
तिला रस्त्यात जर दिसलो तिच्या विरहात फिरताना
व्वा !
मला माझीच वाटे ती तिच्यावर शेर करताना>>हा मिसरा समजला नाही .
वैभव, गझल आवडली . तिला सोडून
वैभव, गझल आवडली .
तिला सोडून जाताना दिले आभार दु:खांनी
सुखांनी फोडला टाहो तिने पलटून बघताना
खूपच कोरीव शब्द.
तिने हरखून माझी विठ्ठलाची ओळ गुणगुणली
तिच्या प्रेमात पडलो मी तिच्या प्रेमात पडताना
इथे दादचे म्हणणे पोचले .तसा तुमचा प्रतिवादही चुकीचा नाही पण 'विठ्ठल ' आणि तुम्ही, तसेच 'ती' आणि तुम्ही ही वेगवेगळी समीकरणे आहेत त्यांना एकत्र आणल्यास होणारी ओढाताण त्या शेरात झाली आहे.
सुप्रियातै धन्यवाद मला वातलेच
सुप्रियातै धन्यवाद मला वातलेच होते की तुम्हाला आवडेल म्हणून
खुरसाले धन्स सोपी आहे ती ओळ समजायला ...खालच्या ओळीतला अर्थ जोडून वाचून पहा मग समजायला अडचण येणार नाही असे व्यक्तिशः वाटते
धन्यवाद भारतीतीई
कोरीव शब्द म्हणजे काय ? हे न समजल्याने शेर चांगला झाला की नाही याबद्दल तुमचे नेमके मत समजले नाही
ओढाताण जाणवत आहे असे तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच तसे झाले असणार पण या पूर्वीही मी ही समीकरणे एकत्र मांडली आहेत त्यामुळे मला तरी असे करताना यावेळीही वावगे वाटले नाही
जसा माझा तुझा संकल्प हाये एक होण्याचा
तसा माझा इठ्याचा त्यो अधीपासोन होता गं
कसा रडलोय माझ्या विठ्ठलासाठी मला माहित
तिच्यासाठी तेसे धो धो रडावे वाटते आहे
ऐन्यातल्या छबीच्या डोळ्यात पाहिले मी
प्रतिमा उभी तिथे ती घनसावळीच आहे
बोलणार नाही आता त्या तुझ्या विठ्ठलाशी मी
रुक्मिणी सारखे माझे 'असलेपण' रुसले आहे
असो
सर्वांच्या मतांचा अधिकाधिक खोलवर विचार करत आहे
पुनश्च धन्यवाद
मनाची धाप मोहरली तिचे उछ्वास
मनाची धाप मोहरली तिचे उछ्वास टिपताना<<< सुंदर ओळ आहे
बोल्ड शब्द नेमका कसा लिहितात?
तिला सोडून जाताना दिले आभार दु:खांनी
सुखांनी फोडला टाहो तिने पलटून बघताना <<< खयाल आवडला.
आभार मानतात असे मला वाटते.
गझल अधिक सफाईदार होऊ शकली असती असे वाटले.
''उच्छवास '' असा करेक्ट
''उच्छवास '' असा करेक्ट शब्द आहे.
कोरीव म्हणताना एक रेखीव
कोरीव म्हणताना एक रेखीव प्रतिमा नेमकेपणाने उभे करणारे शब्द .'पलटून बघण्या'ची क्रिया एकाच वेळी विरहात पडत जाणारे अंतर अन असहायता व्यक्त करणारी. शेर अर्थातच आवडला.
विठ्ठलाच्या शेरातली ओढाताण तुमच्यासाठी नाही, समजून घेणार्यांसाठी आहे. तुम्ही दिलेले दाखले गझलेइतकेच सुंदर आहेत ,कवीने व्यक्त व्हावे, कुणासाठी काही बदलू नये .
धन्यवाद बेफीजी डो साहेब विशेष
धन्यवाद बेफीजी
डो साहेब विशेष आभार बदल करत आहे
धन्यवाद भारतीताई