कधी कधी अस होत ना?
हजार चिंता भेडसावत असतात, मनात एक प्रकारची हुरहूर दाटून आलेली असते
अन अचानक आपल मन काही बाही कल्पना करायला लागत, त्या कल्पनांमध्ये रमताना , काही काळ संकटांचा आपल्याला चक्क विसर पडतो...
कोणी याला दिवस्वप्न म्हणून उडवून लावतात, पण याचमुळे आपले काही क्षण सुखद होतात हे मात्र नक्की..पटतय ना???????
तर याच दिवास्वप्ना बद्दल.......
हे उनातले इंद्रधनु दाविलेस मला
मनातल्या भावांचे सौख्य भासले जणू.
रंगारी बनूनी तू सजवलेल्या स्वप्नानी
बंधनाचे जोखड उखडून काढले.
साम्राज्यशाही होती आजवरी
संकटांची या इवल्या देही.
आणि या उनाड वार्याच्या चाहुलीने
हिटलर शाही लुप्त झाली.
इंद्रधंनूच्या सप्तरंगी मौजेसंगे
वादळाची भेट घेतली
त्याच्या मस्तीच्या तालावर
नृत्य मयूराची छटा अनुभवली.
नशा जणू ही मदिरेची
पण पावित्र्य अजूनही गाभारयाचे.
इंद्रधंनूच्या सुरेख रंगामध्ये
भिजली तालिम आयुष्याची.