खवली मासे हे जास्तकरून खाडी व खाडीलगतच्या शेतांमध्ये सापडतात. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये ह्यांची रेलचेल जास्त असते. ह्यांचे शरीर चकचकीत खवल्यांनी भरलेले असते म्हणून ह्यांना खवली म्हणत असावेत. आत मधला काटा बारीक काट्यांचा असतो जसा मांदेली, मोदकांमध्ये वगैरे असतो तसाच. बोईटा एवढेही खवली मासे असतात. खालील फोटोतील खवली मासे हे लहान साइझचे आहेत. पण हे लहान खवली मासे चविला अप्रतिम असतात. अगदी मोठ्या मोठ्या नामवंत चविष्ट माश्यांची चव झाकून टाकतात इतके टेस्टी.
मासे लहान असल्याने साफ करणे जरा कष्टाचे काम असते. विळीवर न काढता सरळ नखांनी उलट्या बाजूने काढून टाकायची. नरम असल्याने सहज निघतात. डोके ठेवायचे. फक्त डोक्याच्या खाली ली साईडने थोडी चिर पाडून पोटातली घाण काढून घ्यायची व साफ केलेले मासे तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे.
हे मासे शिजवण्यासाठी भांड्यात तेल गरम करून घ्या. त्यावर लसुण पाकळ्या परतवा. आता ह्यावर हिंग, हळद, मसाला घालून पटापट परतवून (मसाला जळू नये म्हणून) त्यावर मासे टाका. लगेच गरजेनुसार मिठ घाला. गॅसची फ्लेम अगदी मिडीयम किंवा मंदच ठेवा. अगदी हलक्या हाताने हे मासे ठवळा. आता ह्यावर झाकण ठेऊन मंद आचेवरच वाफेवर शिजवत ठेवा. मधुन एकदा परत हलक्या हाताने ढवळा किंवा भांडे झाकणासकट फडक्यात उचलून वरखाली करून ढवळा म्हणजे माश्यांचा चुरा होणार नाही. १० मिनीटांत शिजतात मंद आचेवर शिजतात. चव अगदी खल्लास.
चिंच टाकण्याची गरज नसते.
मोठे खवली मासे नुसते तळता येतात.
डोके काढायचे नाही त्याला चांगली चव असते व ती मसाल्यात मुरते.
सही दिसते आहे..ह्यांनाच
सही दिसते आहे..ह्यांनाच मुऱ्या म्हणतात का?
नाही दिविजा मुऱ्या काळ्या
नाही दिविजा मुऱ्या काळ्या कलरच्या व खुप छोटी
असतात
जागू, एक लिहूनच टाक मत्स्य
जागू, एक लिहूनच टाक मत्स्य संस्कृती वर लेख.
गेला बाजार 'मासे आणि मी' असा लिही
कोब्रा हेड करी इज अ डेलिकसी
कोब्रा हेड करी इज अ डेलिकसी !!!!!!!!! >> यक्क
मिलिंदा नक्कीच. दक्षे
मिलिंदा नक्कीच.
दक्षे
मुर्या वेगळ्या.
आणि लिहिणारच असशील तर एका
आणि लिहिणारच असशील तर एका आठवड्यात लिही म्हणजे अंकात देता येईल
कोणत्या नावाचा मासा कसा दिसतो
कोणत्या नावाचा मासा कसा दिसतो ते बघायला मी येतोच..
जिताडा कसा असतो?
.
.
मिलिंदा अंकासाठी दुसरा लेख
मिलिंदा अंकासाठी दुसरा लेख लिहीणे चालू आहे.
झकासराव जिताडा आहे माझ्या माश्यांच्या लिस्ट मध्ये.
छान छान. लिहा. चालू द्या..
छान छान. लिहा. चालू द्या.. पळू द्या पाहिजे तर
यातले काटे काढुन खायचे कि
यातले काटे काढुन खायचे कि अख्खा मासा तसाच खायचा ?
Kate kadhunch khaayache.
Kate kadhunch khaayache.
मोरपंखी काटे काढायचे.
मोरपंखी काटे काढायचे.
जागू, शेतकं म्हणजे हेच का? पण
जागू, शेतकं म्हणजे हेच का? पण मी पाहिलेल्या शेतकांवर्,कल्ल्याशेजारी व शेपटीकडे एक काळा ठिपका होता.मी खाल्ले नाहीत.पण आई म्हणायची चविष्ट मासे आहेत.
मला शेतकं नाव माहीत नाही ग.
मला शेतकं नाव माहीत नाही ग.
नाही. ही शेतकं नाहीत. शेतकं
नाही. ही शेतकं नाहीत. शेतकं थोडी पसरट आणि मोठी असतात.
मी पाहिलेल्या शेतकांवर्,कल्ल्याशेजारी व शेपटीकडे एक काळा ठिपका होता.>> या ठिपक्यांनीच ओळखता येतात.
चविष्ट असतातच पण त्यांचे काटे थोडे वाकडे असतात त्यामुळे सांभाळून खायला लागतात.
ओह.माझे मत्स्यजीवन पापलेट्
ओह.माझे मत्स्यजीवन पापलेट्,कोलंबी,मांजाळी(मांदेली),वेरली,बोंबील्,मुडदुशा,टोळी(क्वचितच),तिसर्या,खुबे(कोकणात मिळणार्या तिसर्या) यापलिकडे गेले नाही.तुझे माशांबाबतचे ज्ञान अगाध आहे.
सलाम, नेहमीनुसार.
सलाम, नेहमीनुसार.
<< अगदी मोठ्या मोठ्या नामवंत चविष्ट माश्यांची चव झाकून टाकतात इतके टेस्टी.>> हें बर्याच छोट्या माशांच्याबाबतीत लागू होतं !
निधी,
निधी,
शेतकं म्हणजेच रत्नागिरीत शितकं म्हणतात ती का?
भाऊ खुप दिवसांनी दिसलात.
भाऊ खुप दिवसांनी दिसलात.
शेतकांचा फोटो आहे का? मला पहायचाय कसा दिसतो तो मासा.
सोनू., हो तीच शितकं.
सोनू., हो तीच शितकं. रत्नागिरीत बरीच माशांची नाव वेगळीच वापरतात असं लक्षात आलंय.
तुझे माशांबाबतचे ज्ञान अगाध
तुझे माशांबाबतचे ज्ञान अगाध आहे.>> अगदी
शेतकांचा फोटो आहे का? मला
शेतकांचा फोटो आहे का? मला पहायचाय कसा दिसतो तो मासा. >>
जागू,
त्या फॅन क्लब धाग्यातल्या डोबूल मधे खाडीचे मासे आहेत ते शितकं आहेत बहुदा.
निधी, कन्फर्म करा.
सोनू., त्या डोबुलमध्ये खाडीचे
सोनू., त्या डोबुलमध्ये खाडीचे दोन प्रकारचे मासे आहेत त्यातले खवलं असलेले त्यांना इकडे बहुतेक काळगुंडी म्हणतात. नि दुसरे उभ्या पट्ट्यावाले त्यांना गुरंगट/ गरंगट असं काहीतरी नाव आहे. पण शितकं नव्हेत. शितकं काळ्या ठिपके असणाऱ्या माशालाच म्हणतात.. म्हणजे आईने त्या माशाची ओळख करून देताना त्या दोन ठिपक्यांवरूनच ओळखायला शिकवलं होतं.
त्या फॅन क्लब धाग्यातल्या
त्या फॅन क्लब धाग्यातल्या डोबूल मधे खाडीचे मासे आहेत ते शितकं आहेत बहुदा.>>>> जागूचा धागा का? आताच त्या धाग्यावर फेरफटका मारून दमलेय.तो नसेल धागा तर लिंक द्या की.
https://goo.gl/images/XGwaTs
https://goo.gl/images/XGwaTs
हे ठिपके का?
देवकी, हो, तोच धागा.
हे काही बरोबर नाही... मी एक
हे काही बरोबर नाही... मी एक जेन्यअन प्रश्न विचारुन हा ४ वर्षा पुर्वीचा धागा वर काढला..
पण माझा प्रश्न राहीला बाजुल.. हे शेपटी कडे ठिपके आहेत.. तोंडा कडे ठिपके आहेत..काय चालय सगळ..!!!
जाउ दे मी मासे खायच बंद करतोय आता..
माझ्य प्रश्न : माश्या मध्ये जी हाडे (काटे) असतात ते वेगवेगळ्या आकाराचे असतात.. ते सगळे काढायचे का ? कोणते नाही काढायचे..
एकादे लाहान हाडे पोटात गेली तर काही प्रोब्लेम होतो का ( डॉ. कडे जावे लागेल इ.)
कोण म्हणत तळल की बारीक हाडे पण खाता येतात.. प्लीज नीट सांगा ना काय ते..
परवा एकदा सौ ने मासे केले (माझ्या आग्रहा वास्त्तव) तर मी दुपारी १.५ तास जेवत होतो.. सगळे काटे शोधत ( केसां एवढे बारीक सुध्दा) ....
सौ म्हणते एवढ हळु जेवलास तर संध्याकाळच्या जेवणाची वेळ येइल...
मोरपंखिस हाच प्रश्न तू सोयरड
मोरपंखिस हाच प्रश्न तू सोयरड बोंबिलवर टाकलायस तिथे मी प्रतिसाद दिला आहे.
तिथला प्रतिसाद परत इथे देते
तिथला प्रतिसाद परत इथे देते
मोरपंखीस फक्त करली-काटी, पाला दाताळ, आणि हे बोंबील ह्यात काटे जास्त असतात जे व्यवस्थित सावकाश काढले तर घशात नाही जात. माझ्या मते हे काटे इतकेही हानीकारक नसतात की पोटात गेल्यावर काही त्रास होईल.
आणि हे वरचे सोयरे बोंबील आहेत जे साधारण बोईट सारखे दिसतात. पण जे मऊ केसांचे बोंबील तुम्ही म्हणता ते बॉम्बे डक. ते वेगळे.
ते नुसते 'बोंबिल'वर लिहीलय मी.
त्या बोंबिलमध्ये केसासारखे काटे असतात जे अगदी मऊ असतात त्याने काहीच हानी होत नाही. ते अडकतही नाहीत घशात. आणि मध्ये एक काट्याची दांडी असते तीही काहीजण खातात. पण ती बाजूला काढतात.
लहान बोंबील मध्ये एवढे केसाळ काटे नसतात शक्यतो बोंबील लहान घ्यायचे म्हणजे ह्या केसाळ काट्यांचा प्रश्न येत नाही आणि ते चांगलेही लागतात.
धन्यावाद प्राजक्ता ... म्हणजे
धन्यावाद प्राजक्ता ... म्हणजे प्रत्येक माश्या मधले काटे काढावेच लागतात अस नाही. ... हम्म हे अत्ता कळल..
अहो मला मासे खुप आवडतात.. पण मला ते पापलेट व बांगड या पलिकडे काही माहीत नाही... आणी सौ त्याच फ्राय करते बास्स...
एकदा असच कोणता तरी मासा अणला ( बंगाली मित्राच्या सांगण्यावरुन ' इलिस' का काय ते.. खुपच महाग.. )
सौ ने त्याचा रस्सा आमटी बनवली पहतो तर काय बरेच काटे त्य मध्ये छोटे मोठे ... मग ते एक एक घास खायच्या अगोदर दहा वेळ चेक कि काट आहे का या मध्ये.. मला वाटल आपल काही तरी चुकतय मासे खाण्य मध्ये किंवा ते तयार करण्य मधे....
Pages