मासे ४५) खवली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 October, 2013 - 06:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खवली मासे २ वाटे
१ गड्डा लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग (नसल्यास चालेल)
पाव वाटी तेल
अर्धा चमचा हळद
१.५ ते २ चमचे मसाला
आवश्यकते नुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

खवली मासे हे जास्तकरून खाडी व खाडीलगतच्या शेतांमध्ये सापडतात. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये ह्यांची रेलचेल जास्त असते. ह्यांचे शरीर चकचकीत खवल्यांनी भरलेले असते म्हणून ह्यांना खवली म्हणत असावेत. आत मधला काटा बारीक काट्यांचा असतो जसा मांदेली, मोदकांमध्ये वगैरे असतो तसाच. बोईटा एवढेही खवली मासे असतात. खालील फोटोतील खवली मासे हे लहान साइझचे आहेत. पण हे लहान खवली मासे चविला अप्रतिम असतात. अगदी मोठ्या मोठ्या नामवंत चविष्ट माश्यांची चव झाकून टाकतात इतके टेस्टी.

मासे लहान असल्याने साफ करणे जरा कष्टाचे काम असते. विळीवर न काढता सरळ नखांनी उलट्या बाजूने काढून टाकायची. नरम असल्याने सहज निघतात. डोके ठेवायचे. फक्त डोक्याच्या खाली ली साईडने थोडी चिर पाडून पोटातली घाण काढून घ्यायची व साफ केलेले मासे तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे.

हे मासे शिजवण्यासाठी भांड्यात तेल गरम करून घ्या. त्यावर लसुण पाकळ्या परतवा. आता ह्यावर हिंग, हळद, मसाला घालून पटापट परतवून (मसाला जळू नये म्हणून) त्यावर मासे टाका. लगेच गरजेनुसार मिठ घाला. गॅसची फ्लेम अगदी मिडीयम किंवा मंदच ठेवा. अगदी हलक्या हाताने हे मासे ठवळा. आता ह्यावर झाकण ठेऊन मंद आचेवरच वाफेवर शिजवत ठेवा. मधुन एकदा परत हलक्या हाताने ढवळा किंवा भांडे झाकणासकट फडक्यात उचलून वरखाली करून ढवळा म्हणजे माश्यांचा चुरा होणार नाही. १० मिनीटांत शिजतात मंद आचेवर शिजतात. चव अगदी खल्लास.

अजुन एक

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

चिंच टाकण्याची गरज नसते.
मोठे खवली मासे नुसते तळता येतात.
डोके काढायचे नाही त्याला चांगली चव असते व ती मसाल्यात मुरते.

माहितीचा स्रोत: 
चुलत सासरे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मला माहित नव्हता हा मासा. मस्त दिसताहेत.

जागू .... अजून फक्त ५ की तुझं टारगेट पूर्ण होईल. उद्यापनाला हे सगळे प्रकार कर अन आम्हाला बोलाव नक्की. Happy

जागु छान रेसिपी Happy
माझी मजल अजून सुरमईच्या पलिकडे गेली नाही.
आणि मला रश्श्यातला मासा अजिबात आवडणार नाही.. Sad

कसले भारी दिसताहेत. छोट्या माशांची चवच न्यारी. वर्षभर तुझ्या आसपास राहून तुझ्याबरोबर भाजी बाजार / मासळी बाजार फिरले पाहिजे Happy

( नर्सर्‍या फिरायला अजून एक सेपरेट वर्ष )

सही फोटो आणि पाककृती आहे.

आपल्याकडे माश्यांचे खवले काढायला स्पेशल चाकू आणि अवजारं नाही का मिळत?

जागू,
वाटे असे लिहू नकोस, नेमके किती नग ते लिही.
तूला बघून कोळणी, वाट्यावर तेवढेच नग फ्री देत असतील.

जागूताई...तुम्हाला आणि तुमच्या पाककलेतील ज्ञानसंपदेला मनापासून सलाम!!!!!

आह्हा..अम्म्म्म्म्म!!!!!!! Happy
जागु च्या रेसिपींज ची एक खासियत आहे, करायला सोप्या पण सुप्पर्ब टेस्टी

हो सृष्टी तळ्यातही मिळतात बहुदा हे.

अखी Happy

बन्डू, जयन्त Lol

नुतन, दिनेशदा, स्वाती, जाई, श्रद्धा, सिंडरेला, वर्षूताई धन्यवाद.

मामे नक्की ग.

दक्षे आता एकदा कोलंबी आणि पापलेट ट्राय कर.

मृण्मयी मासे कापण्यासाठी कास काती असते. काती म्हणजे उलटा कोयता. मी उद्या फोटो टाकते हवे तर. ह्याने खवलेही फटाफट निघतात. माश्यांच्या तुकड्याही व्यवस्थित पडतात.

मेधा मलाही आवडेल तुझ्याबरोबर नर्सर्‍या बघत फिरायला. Happy

प्रितीभुषण डोळ्याच्या इथला कल्ला लालसर, मासा कडक, सुरकुत्या न पडलेला ही लक्षणे ताज्या माश्याची.

दिनेशदा जवळ्याचे नग कसे मोजू ? Lol

एक भाप्रः त्या मास्याचे डोके काढायचे नाही म्हणजे डोळ्यांसकट शिजवायचा? आणि खाताना ते डोळे कसे काढायचे? मी शुध्द शाकाहारी आहे पण तुमच्या सगळ्या माश्यांच्या रेसिपिज वाचल्या आहेत आणि आवडतात.

पेरू तो डोक्याचा भाग काही जण चाऊन खातात तर काही तसाच ठेउन देतात. तो भाग तसाच ठेऊन मधला मांसल भाग खायचा.

खवल्या वरती लाल कलरची चकचकीत लाईन असलेल्या माश्याला आम्ही डेबरी मासा बोलतो. आईकडे पावसाळ्यात घरी भात व ह्या माश्याचा रस्सा खुप खाल्ला. भाऊ (वडील) पहाटे जाऊन मासे स्वता जाळ्यात पकडुन आणत. आता भाऊ नाहीत. माहेरी गेल्यावर छोटा भाऊ मला आवडतात म्हणुन वीकत आणतो.
पन त्यावेळी जी चव लागत होती ती आत्त्ता कीतीही मालमसाला घालून केलेल्या रस्याला नाही..........

(माफ करा. लेखनात चुका असतील. पन भावना थांबवू शकले नाही.)

जागू, रुचिराप्रमाणे वाटी / चमचा याचे प्रमाण न मोजता येणार्‍या नगांसाठी वापर.
आणि तुझ्या नेहमीच्या कोळणीला आवर्जून आम्हा सगळ्यांचा नमस्कार सांग !

दिनेशदा मी मासळी बाजारात गेली ना की मिच गोंधळून जाते. ५-६ कोळणी मला हाका मारत असतात इकडे ये इकडे ये म्हणून. काही तर रुसुन पण बसतात. माझ्याकडे नव्हती का म्हणतात. पावसाळ्यात रेनकोट घालून जायचे म्हणून निदान लपायला तरी मिळायचे Lol पण एक आहे सगळ्या चांगले मासे देतात जर चांगले नसतील तर सांगतात आज नको घेउ म्हणून. एक-दोन कोळणींच्या कोर्टात केसेस चालू आहेत त्यामुळे त्या नवर्‍याच्या क्लायंट आहेत. त्या तर काय फॅमिली डॉ. प्रमाणे फॅमिली कोळणी झाल्या आहेत. चांगले मासे मिळाले की घरी घेउन येतात मग वकिलसाहेबांनाही त्यांची फी घेताना कमीच घ्यावी लागते. जाऊदे ह्यावर एक लेख लिहून होईल असे वाटते मला Lol

भारती डोके खायचे नाही सोडून द्यायचे.

सिंगापुर, चीन , इंडोनेशिया देशांत फिश हेड करी अत्यंत पॉप्युलर आहे.. इट्स यम्म्म्मी!!!!!!!!!!!!

आणी कोब्रा हेड करी इज अ डेलिकसी !!!!!!!!!

जागू, मस्त आणि सोपी रेसिपी. आम्ही याला " तेलावरचे म्हणतो. पण नुसता लसुण न घेता आले,लसुण दोन्ही घेतो आणि आंबट्पणा यायला कोकम वापरतो. हा मासा कधी खाल्ला नाही. मात्र डोळे न काढता खाणे कठिणच आहे.

वर्षू नील, ईकडच्या व्हिएतनामी र्ग्रोसरी दुकानात अशी डोकी ठेवलेली पाहीली आहेत. फक्त माशांचीच नाहीत तर सर्व प्राण्यांची असतात. अगदी बघवत नाही. पण काय करणार, माशांसाठी जावेच लागते. वास तर इतका भयंकर असतो की, दुकानात शिरायच्या आधी एक दिर्घ श्वास घ्यायचा मग श्वास रोखुण आत शिरायचे.

Pages