"आज शाहे जहाँगीर दमे नजायूं जुस्तबंद
बा ख्वाहिशे दिल गुप्त कि कश्मीर दिगर है च "
याचा अर्थ मृत्युनंतर स्वर्ग कोणी पाहिलाय, पण जीवनात ज्याने काश्मिरची भूमी पाहिली त्याला पुनः पुन्हा येथे यावसं का नाही वाटणार! खरंतर स्वर्ग उपभोगण्यासाठी मृत्यु आवश्यक आहे का? का मृत्युपूर्वी स्वर्ग अनुभवताच येणार नाही? याच उत्तर एक आणि एकच "काश्मिर". काश्मिरच्या एका बाजुला नाजुक सौंदर्याने नटलेले कश्मिर खोरे, बर्फाने झाकलेली शिखरं, घनदाट जंगल, देवदारचे सुंदर वृक्ष, दल सरोवर, अक्रोड, सफरचंदांनी लगडलेली झाडे, केशरची निळी फुले आणि त्यातुन डोकावणारे केशर, मुघल बागा तर दुसरीकडे रौद्र सौंदर्याने नटलेला लडाख परीसर, काळजाचा ठोका चुकवणारे "पास", मॅग्नेटिक हिल्स, निळाशार पँगाँग सरोवर, जगातील सर्वात उंचीवरचे मोटरेबल रोड, शांत, सुंदर आणि बौध्द धर्माच्या खुणा बाळगणारे बौध्द गोंफा (मॉनेस्ट्रीस), निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेले शीत वाळवंट म्हणजेच नुब्रा व्हॅली.
खरंतर लेह लडाखच्या सौंदर्याने आधीच (हो अगदी ३ इडियटच्याही आधी :-)) मनावर गारूड केले होते पण जाण्याचा योग काहि जुळुन येत नव्हता. गेल्या वर्षी श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्गला भेट देऊन झाली त्यामुळे या वर्षी लडाखवारीचा बेत नक्कीच करायचा ठरला. "एक तरी वारी अनुभवावी" या उक्तीप्रमाणेच "एकदा तरी लेहवारी घडावी" अशी जबरदस्त इच्छा होती. योग जुळुन आला आणि या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला श्रीनगर-कारगिल-लेह-सार्चु-मनाली-चंदिगड असा लेहचे दोन्ही प्रवेशद्वार पाहिले.
काश्मिर खोर्यातुन लडाखला निघाल्यावर सोनमर्गच्या पुढे निसर्ग कूस बदलतो. झोझीला पासच्या अलिकडचा निसर्ग हा नाजुक तर पलिकडचा रौद्र. पण दोघांचीही बात काही औरच. एकदा का तुमचे पाऊल लडाखमध्ये पडले तर सारा निसर्गच तुम्हाला म्हणतो, "वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बांहे जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे..."
चला तर या स्वप्ननगरीची सैर करूया, कारण फारसी मुग़ल बादशाह जहाँगीरने म्हटलेच आहे.
गर फ़िर्दौस बर रुए ज़मीन अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त।
(अगर इस धरती पर कहीं स्वर्ग है, तो वो यहीं है... यहीं है)
दल लेक (श्रीनगर)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
सोनमर्ग
प्रचि ०५
लेहच्या वाटेवर
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
हेमीस मॉनेस्ट्री
प्रचि ०९
नुब्रा व्हॅली (हुंडर)
प्रचि १०
डिस्किट मॉनेस्ट्री
प्रचि ११
प्रचि १२
पॅंगाँग सरोवर
प्रचि १३
प्रचि १४
लेह-मनाली रोड
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
तटि: माझ्या इतर मालिकेप्रमाणेच लेह-लडाख मालिका सादर करत आहे. ज्यात श्रीनगर ते लेह लडाख आणि लेह ते मनाली असा प्रवास चित्ररूपात मांडण्याचा मानस आहे. मायबोलीकर मार्को पोलो, सेनापती, केदार, इंद्रधनुष्य, साधना, जिवेश यांनी लडाखबद्दल भरभरून लिहिले असल्याने मी फक्त प्रचिच प्रदर्शित करत आहे. इतर मालिकेप्रमाणे हि मालिकाही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
(क्रमशः)
(पुढिल भाग - दल लेक, सोनमर्ग, झोझीला, द्रास, कारगिल)
जियो... /\
जियो... /\
Wow!!! मस्तचं!!!
Wow!!! मस्तचं!!!
सुपर मित्रा.. १०, १५ व १६
सुपर मित्रा..
१०, १५ व १६ मस्तच.
Apratim... !
Apratim... !
भन्नाट फोटो खासच...
भन्नाट फोटो
खासच...
मला कोणी सांगता का, लडाखच्या
मला कोणी सांगता का, लडाखच्या प्र०चित्रांमध्ये बर्याचदा रंगीबेरंगी कापडाचे तुकडे ओवलेले आणि लटकवलेले दिसतात. ते काय असते?
सुंदर फोटो.................
सुंदर फोटो.................
कित्ती सुंदर. अस वाटत
कित्ती सुंदर. अस वाटत पेंटींग्ज आहेत. अप्रतिम.
सु प्प र फोटोज सगळे.. !! पण
सु प्प र फोटोज सगळे.. !! पण ४, ७, १० ,१४ ,१६ ,१८ हे काय फोट्टो आहेत !!!
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
सहीच..
सहीच..
जबरी... लय भारी
जबरी... लय भारी
ऑस्सम!!!!! .....अप्रतीम
ऑस्सम!!!!! .....अप्रतीम फोटो.....
जिप्स्या.. ऑसम कला लाभली आहे
जिप्स्या.. ऑसम कला लाभली आहे तुला.. काय एकेक फोटो आहेत.. तू आपल्या कलेक्शनमधून कसा निवडत असशील देव जाणे!!!!
अशक्य... भारी!!! काही प्र.चि.
अशक्य... भारी!!!
काही प्र.चि. तर अग्गदी पेंटींग्ज वाटताहेत...
कविता दृष्यरुपात आली तर जशी
कविता दृष्यरुपात आली तर जशी वाटेल तशी दिसताहेत तुमची प्रकाशचित्रे. सुंदर हे विशेषणही अपुरे आहे.
अप्रतिम
अय्य्यो...!! सुर्रेखसुंदरअप्र
अय्य्यो...!!
सुर्रेखसुंदरअप्रतिमलाजवाबखल्लासअशक्यजबराटअहाहाऑस्समभारीसुप्पर्बभन्नाट्मस्त...!!!!!
असे आलेत फोटो सगळे..!!
अशक्य छायाचित्रे !!!!
अशक्य छायाचित्रे !!!!
भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे
भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद!!!!!
आणखी एक लेहमालिका? फक्त प्रची चालणार नाहित. इतरांनी कुठे अश्या उर्दु पंक्ती अर्जल्या होत्या?>>>> aschig
आशु, अंजली
एच्डीआर केलेत काय काही?>>>>>नाही नंद्या, एकही फोटो एचडिआर नाही.
मनापासुन धन्यवाद, दाद.
नावाप्रमाणेच भटकतोय जिप्सी>>>>शशांक
मला कोणी सांगता का, लडाखच्या प्र०चित्रांमध्ये बर्याचदा रंगीबेरंगी कापडाचे तुकडे ओवलेले आणि लटकवलेले दिसतात. ते काय असते?>>>>>जीडी, त्याच्यावर शांतीमंत्र लिहिला आहे. लडाखला सर्वत्र हे दिसतात. गाडीला, घरच्या दरवाजाला, बाईकला, लावता येतात. मीही यातले छोटे तोरण आणले आहे.
तू आपल्या कलेक्शनमधून कसा निवडत असशील देव जाणे!!!!>>>>वर्षूदी
तो दाराचा (प्रचि ७) तर अतिशय भावला
७ च कंपोझिशन खासच
सातव्याची कल्पना खूप आवडली. हा सगळा निसर्ग खरच कडीकुलपात ठेवावा लागणार आहे नाही तर काही खरे नाही.>>>>>मस्त माधव. प्रचि ७ची फ्रेम मलाही आवडली. तो प्रचि क्लिक केल्यावर हि गझल आठवली, पण तुमचा वरचा विचार सह्हीच आहे..
गली के मोड़ पे, सूना सा कोई दरवाजा
तरसती आँखों से, रास्ता किसी का देखेगा
निगाह दूर तलक, जा के लौट आयेगी
करोगे याद तो हर बात याद आयेगी.....
जिप्सी, ओके.
जिप्सी, ओके.
(No subject)
अत्यंत सुंदर....
अत्यंत सुंदर....
__/\__
__/\__ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सिंपली ऑस्सम!!! लेह-लडाख खरचं
सिंपली ऑस्सम!!! लेह-लडाख खरचं देवभूमी वाटतीय या प्रचिंमुळे. आकाशाची निळाई, वातावरणातील स्तब्धता, शांत जीवन... सगळं सगळं अनुभवता आलं या प्रचिंमधून.
जिप्सी या वर्षी फक्त तुझ्याच लेह-लडाख प्रचिंच प्रदर्शन भरवू शकशील असे एक से एक बढिया प्रचि आहेत. __/\__
या वर्षी फक्त तुझ्याच
या वर्षी फक्त तुझ्याच लेह-लडाख प्रचिंच प्रदर्शन भरवू शकशील असे एक से एक बढिया प्रचि आहेत. >> +१००
स्व-र्गी-य !
स्व-र्गी-य !
अप्रतिम x १००००० = ?
अप्रतिम x १००००० = ?
अशक्य सुंदर!
अशक्य सुंदर!
अ प्र ती म !
अ प्र ती म !
जिप्सी, जबर्दस्त फोटो !
जिप्सी, जबर्दस्त फोटो !
Pages