"आज शाहे जहाँगीर दमे नजायूं जुस्तबंद
बा ख्वाहिशे दिल गुप्त कि कश्मीर दिगर है च "
याचा अर्थ मृत्युनंतर स्वर्ग कोणी पाहिलाय, पण जीवनात ज्याने काश्मिरची भूमी पाहिली त्याला पुनः पुन्हा येथे यावसं का नाही वाटणार! खरंतर स्वर्ग उपभोगण्यासाठी मृत्यु आवश्यक आहे का? का मृत्युपूर्वी स्वर्ग अनुभवताच येणार नाही? याच उत्तर एक आणि एकच "काश्मिर". काश्मिरच्या एका बाजुला नाजुक सौंदर्याने नटलेले कश्मिर खोरे, बर्फाने झाकलेली शिखरं, घनदाट जंगल, देवदारचे सुंदर वृक्ष, दल सरोवर, अक्रोड, सफरचंदांनी लगडलेली झाडे, केशरची निळी फुले आणि त्यातुन डोकावणारे केशर, मुघल बागा तर दुसरीकडे रौद्र सौंदर्याने नटलेला लडाख परीसर, काळजाचा ठोका चुकवणारे "पास", मॅग्नेटिक हिल्स, निळाशार पँगाँग सरोवर, जगातील सर्वात उंचीवरचे मोटरेबल रोड, शांत, सुंदर आणि बौध्द धर्माच्या खुणा बाळगणारे बौध्द गोंफा (मॉनेस्ट्रीस), निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेले शीत वाळवंट म्हणजेच नुब्रा व्हॅली.
खरंतर लेह लडाखच्या सौंदर्याने आधीच (हो अगदी ३ इडियटच्याही आधी :-)) मनावर गारूड केले होते पण जाण्याचा योग काहि जुळुन येत नव्हता. गेल्या वर्षी श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्गला भेट देऊन झाली त्यामुळे या वर्षी लडाखवारीचा बेत नक्कीच करायचा ठरला. "एक तरी वारी अनुभवावी" या उक्तीप्रमाणेच "एकदा तरी लेहवारी घडावी" अशी जबरदस्त इच्छा होती. योग जुळुन आला आणि या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला श्रीनगर-कारगिल-लेह-सार्चु-मनाली-चंदिगड असा लेहचे दोन्ही प्रवेशद्वार पाहिले.
काश्मिर खोर्यातुन लडाखला निघाल्यावर सोनमर्गच्या पुढे निसर्ग कूस बदलतो. झोझीला पासच्या अलिकडचा निसर्ग हा नाजुक तर पलिकडचा रौद्र. पण दोघांचीही बात काही औरच. एकदा का तुमचे पाऊल लडाखमध्ये पडले तर सारा निसर्गच तुम्हाला म्हणतो, "वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बांहे जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे..."
चला तर या स्वप्ननगरीची सैर करूया, कारण फारसी मुग़ल बादशाह जहाँगीरने म्हटलेच आहे.
गर फ़िर्दौस बर रुए ज़मीन अस्त, हमीं अस्त, हमीं अस्त।
(अगर इस धरती पर कहीं स्वर्ग है, तो वो यहीं है... यहीं है)
दल लेक (श्रीनगर)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४सोनमर्ग
प्रचि ०५लेहच्या वाटेवर
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८हेमीस मॉनेस्ट्री
प्रचि ०९नुब्रा व्हॅली (हुंडर)
प्रचि १०डिस्किट मॉनेस्ट्री
प्रचि ११
प्रचि १२पॅंगाँग सरोवर
प्रचि १३
प्रचि १४लेह-मनाली रोड
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९तटि: माझ्या इतर मालिकेप्रमाणेच लेह-लडाख मालिका सादर करत आहे. ज्यात श्रीनगर ते लेह लडाख आणि लेह ते मनाली असा प्रवास चित्ररूपात मांडण्याचा मानस आहे. मायबोलीकर मार्को पोलो, सेनापती, केदार, इंद्रधनुष्य, साधना, जिवेश यांनी लडाखबद्दल भरभरून लिहिले असल्याने मी फक्त प्रचिच प्रदर्शित करत आहे.
इतर मालिकेप्रमाणे हि मालिकाही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
(क्रमशः)
(पुढिल भाग - दल लेक, सोनमर्ग, झोझीला, द्रास, कारगिल)
जिप्सी, तूझ्या फोटोंची वाट
जिप्सी, तूझ्या फोटोंची वाट पहात होतो कधीचीच. वर्णन करता न येण्याईतके मस्त आहेत फोटो. आता निवांत बघतो.
वाह बहोत खूब
वाह
बहोत खूब
बोलायला शब्दच नाहीत इतके
बोलायला शब्दच नाहीत इतके अप्रतिम आले आहे फोटो. तो दाराचा (प्रचि ७) तर अतिशय भावला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणखी एक लेहमालिका? फक्त प्रची
आणखी एक लेहमालिका? फक्त प्रची चालणार नाहित. इतरांनी कुठे अश्या उर्दु पंक्ती अर्जल्या होत्या?
(रच्याकने, इतरांच्या लेखांचे आकडे एकत्रीतपणे कुठे मिळतील का?)
अरे हो, प्रची छान (नेहमीसारख्याच) आहेत हे सांगायचे राहूनच गेले.
छान
छान
कडक.... जिप्स्या..फोटोग्राफीब
कडक....
जिप्स्या..फोटोग्राफीबरोबर फोटोशॉपमध्ये पण तरबेज झालेला दिसतोयस....
पहिले चारही फोटो मास्टर पीस....
अद्वितीय
९, १६, १७ पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! सगळे प्रचि एकदम क्लास
व्वा! सगळे प्रचि एकदम क्लास आले आहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
खल्लास. एक से एक भारी आहेत.
खल्लास. एक से एक भारी आहेत.
मस्तच. १० आणि ४ भारी आहेत.
मस्तच.
१० आणि ४ भारी आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वच अप्रतिम आहेत. १८ मधे
सर्वच अप्रतिम आहेत. १८ मधे मागचे डोंगर अक्षरशः सोन्याचे वाटत आहेत.
लई भारी योग्या !!! लईच भारी,
लई भारी योग्या !!!
लईच भारी, क्रांतिकारी .
७ पासून पुढचे खूप आवडले सगळेच !
मस्त रंग, कलर काँबिनेशन्स.
एच्डीआर केलेत काय काही?
मस्त !
मस्त !
जबरी..... ७ च कंपोझिशन खासच
जबरी..... ७ च कंपोझिशन खासच
अप्रतिम!
अप्रतिम!
जिप्सी, नि:शब्दं! कधी कधी असं
जिप्सी, नि:शब्दं!
कधी कधी असं काही वाचते इथे की त्यादिवशी पुन्हा काही वाचू नये... हीच इच्छा होते. आणि खरच नाही वाचत मी काही.
तुमचे हे फोटो बघून असं हालू नये, बोलू नये झालं.
आज खरच काही इतर बघायचं नाही!
जियो!
Mesmerizing!
Mesmerizing!
ऑस्सम!!!!! काय जबरदस्त फोटो
ऑस्सम!!!!! काय जबरदस्त फोटो काढलेत...... खरच नि:शब्द!
पुढच्या फोटोंची आतुरतेने वाट पहात्येय.
केवळ अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!!!
केवळ अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!!!
नावाप्रमाणेच भटकतोय जिप्सी
नावाप्रमाणेच भटकतोय जिप्सी आणि ज्याचे फोटो काढतोय त्याचे "सोने" करतोय - प्र चि १८
जिप्सी - तुझी नजर एवढी तयार आहे की जरा फिल्म इंडस्ट्रीत तरी पाठव अशा प्र चि - लगेच "एक्स्ट्राऑर्डिनरी" कॅमेरामन म्हणून पाटी झळकेल त्या हिरो, हिरविणींच्या जोडीला - अणि पिक्चर सुप्पर डुप्पर हिट होईल हे सांगायला नकोच ....
२, ४, १५, १८
२, ४, १५, १८ अफलातून.
दोनमध्ये ग्रॅडीएंट फिल्टर वापरला आहेस का?
सातव्याची कल्पना खूप आवडली. हा सगळा निसर्ग खरच कडीकुलपात ठेवावा लागणार आहे नाही तर काही खरे नाही.
फोटो बघुन नि:शब्द व्हायला
फोटो बघुन नि:शब्द व्हायला झाले.. एकदम भारावुन गेलो.. सगळे मस्त... मस्त हा शब्द पण कमी पडेल..
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
मस्त. पहिला, सोनमर्गचा, १८
मस्त.
पहिला, सोनमर्गचा, १८ वा विशेष आवडला. ते रस्त्याचे निळ्या आभाळाचे पण छान.
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख! ७ वा डेस्कटॉपवर टाकला.
सुरेख!
७ वा डेस्कटॉपवर टाकला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(गेले काही दिवस माझ्या डेस्कटॉपवर लेह/लडाखचेच फोटू आहेत. :फिदी:)
सुर्रेख ! फार आवडले फोटो
सुर्रेख ! फार आवडले फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशक्य सुंदर __/\__
अशक्य सुंदर __/\__
सुंदर.. खुप वाट बघायला लावलीस
सुंदर.. खुप वाट बघायला लावलीस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बापू!
बापू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages