र्हाईन फॉल हि अगदी छोटीशी ( म्हणजे वेळेच्या दॄष्टीने ) सहल. साडेतीन तासात आपण परतही येतो. ( बाकीच्या सहली १०/११ तासांच्या आहेत. ) त्यामूळे परतीचे विमान दुपारी २ नंतरचे असेल तर शेवटच्या दिवशीही हि सहल करता येते आणि येताना थेट विमानतळावर जाता येते.
तर हा र्हाईननदीवरचा धबधबा. युरपमधील सर्वात मोठा. गोविंदा आणि राणी मुखर्जीचे एक गाणे इथे चित्रीत
झाले होते. ( कुठले ते जाणकारांना विचारा )
या धबधब्याला भिडायचे अनेक पर्याय आहेत. अंग न भिजवता नदीच्या काठाकाठाने पायी जाता येते. धबधब्याच्या थोड्या मागे एक रेल्वेचा ब्रिज आहे. त्यावर आता जाता येते का ते माहीत नाही, पण गेल्या वेळेस मी गेलो होतो. उजव्या बाजूला एक राजवाडा आहे तिथून खाली उतरत ( आता लिफ्ट आहे ) एका सज्ज्यावर येता येते. तिथून धबधब्याला हात लावता येतो.
शिवाय बोटी आहेतच. या बोटींचेही पर्याय आहेत. एक बोट लांबूनच जाते तर एक चक्क धबधब्याच्या जवळच नेते. आणखी एक पर्याय म्हणजे त्या मधल्या सुळक्यापाशी ती सोडते. दहा मिनिटांनी परत न्यायला येते.
ऐन धबधब्याच्या मधे चारी बाजूंनी पाणी वहात असताना, नुसते असणेच थरारक असते.
पण हे सर्व अत्यंत सुरक्षित आहे. बोट अजिबात हेलकावत नाही. तसेच सुळक्यावर जायला व्यवस्थित पायर्या आहेत. तिथल्या धक्काही सुंदर आहे.
तिथे मात्र दोन भारतीय बायकांनी घोळ घातला. गाईडने नेमक्या सुचना देऊनही त्या दोघी हरवल्या.
वेळ झाली तरी बसकडे आल्याच नाहीत. नियमानुसार दहा मिनिटे त्यांची वाट बघून, गाईडने बस सोडली.
अशा वेळी एक सर्टीफिकेट तयार करून दोन साक्षीदारांच्या सह्या घेतात. मी सही केली पण ती करताना~
खरोखरच लाज वाटली. आणि नवल म्हणजे गाईडलाही वाईटच वाटत होते. ( त्यांना परत यायला समजेल ना ? पैसे असतील ना ? अशी काळजी तिला वाटत होती. )
मी अर्थात वेळेवर परत आलो होतो. येताना तिथल्या भारतीय स्टॉलवर गेलो तर गर्दी होती म्हणून परत आलो. दहा मिनिटे थांबायचे ठरले म्हणून परत तिथे गेलो तर तिथल्या भोंगळ कारभाराचा चांगलाच
अनुभव आला. सामोसे घ्यायचे होते, नुसते मागितल्याबरोबर सुटे पैसे द्या. दोनच आहेत, जास्त मिळणार
नाहीत. मी तरी किती तयार ठेवू. तुम्ही असेच बस सुटताना येता. मग घाई करता.. अशी बडबड.
( विशिष्ठ शहरातला दिसत नव्हता पण त्याचे ग्राहक मात्र तिथलेच असावेत. )
अर्थात मी घेतलेच पण काही खास नव्हते.
परतीच्या वाटेवर एअरपोर्टवरून काही गेस्टस पिक अप केले पण त्यापुर्वी थोडा काळ आपण जर्मनीत असतो.
तिथे सरकारी गेट आहे पण पासपोर्ट कंट्रोल नाही. पासपोर्ट जवळ ठेवावा अशी अपेक्षा असते, पण कुणी
विचारत नाही. जर्मनीमधले अन्नपदार्थांचे भाव तुलनेने कमी असल्याने, अनेक स्विस लोक केवळ
खरेदीसाठी तिथे जात असतात.
मी सहसा व्य्क्तींचे फोटो इथे टाकत नाही. पण हे बाळ मात्र खुप आवडले. ऐट तरी बघा. बाजारहाटीला निघालय. ते मावेल एवढी पिशवी आहे. झेब्रा वरूनच क्रॉस करायचा निर्धार आहे.
धबधब्याचे पहिले दर्शन
आणि दुसरे दर्शन
जागूचे मित्र !
बोटीतून सुळक्याकडे जाताना
धक्क्यावर पोहोचल्यावर
सुळक्याच्या वाटेवर
सुळक्याच्या वरून
तो सज्जा दिसतोय, तिथून धबधब्याला हात लावता येतो.
परत जाणारी बोट
दूरवरून दर्शन
सुळक्याच्या मागे
सुळक्याच्या पायतळीचा बोगदा
गुलाबी बोट, ( हि धबधब्याच्या जवळ नेते )
सुळक्यावर जायचा जिना
फेसाळ पाणी
फेसाळ पाणी
या जागी मला रफीचे, सौ बार जनम लेंगे.... आठवलं !
अर्थात त्यासाठी सौ बार मरायची तयारी आहे माझी !
सुरक्षित धक्का
जर्मनीतली शेती ( इथून पुढचे सर्व फोटो चालत्या बसमधून घेतले आहेत )
रांगोळी
जर्मन स्विस बॉर्डर
जरा फोटुग्राफी !
जरा फोटुग्राफी !
मला आवडलेली घरे
मागे वळून बघताना.
वाह दिनेश! अप्रतिम फोटो. अगदी
वाह दिनेश! अप्रतिम फोटो. अगदी नेत्रसुखद.
बाळाचा आणि धबधब्याचे फोटो खूप आवडले.
अप्रतिम नजारा!
अप्रतिम नजारा!
सुंदर नजारा... दिनेशदा प्रचि
सुंदर नजारा... दिनेशदा प्रचि मस्तच
सुरेख. आधी धबधबा पाहुन म्हणलं
सुरेख.
आधी धबधबा पाहुन म्हणलं हे काय एवढुस्साच???
मग रेफरन्सला बोट बघुन कळालं.
रांगोळी मस्तच.
रांगोळी मस्तच.
सर्व फोटो सुंदर!! अगदी
सर्व फोटो सुंदर!! अगदी नेत्रसुखद!
व्वा!! फोटोतच इतके सुंदर
व्वा!! फोटोतच इतके सुंदर वाटतेय तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल!!
आभार दोस्तांनो... झकोबा, २३
आभार दोस्तांनो...
झकोबा, २३ मीटर्स हाईट सांगतात, पण तेवढी वाटत नाही. सर्व टप्प्यांची एकत्रित मोजत असतील
पहिल्या दर्शनाच्या सुळक्यावर, झेंड्यापाशी माणसे आहेत. त्यांच्याशी तुलना करून पहा.
मस्त! रांगोळी भारीये.
मस्त! रांगोळी भारीये.
इस जिंदगीके दिन कितने कम
इस जिंदगीके दिन कितने कम है..
मार्व्हलस! तुम्हाला भरभरुन धन्यवाद. सर्व नजारे अप्रतीम! नशीबवान आहात आणी असेच रहा.:स्मित:
आता पुढच्या वेळी मॉरीशस ट्रिपचे फोटो टाका. ( रंगासेठच्या बाफावर वाचले म्हणून लिहीले)
गोविंदा राणीचे गाणे म्हणजे हद
गोविंदा राणीचे गाणे म्हणजे हद कर दी आपने मधले का?
रश्मी, ही सहल केवळ फोटो
रश्मी, ही सहल केवळ फोटो काढण्यासाठीच केली होती. सगळं आधी बघून झाले होते पण त्यावेळेस डि़जीटल कॅमेरा नव्हता.
मॉरिशियस आहे ना अजेंडावर. पण त्या आधीची ३ व्हेकेशन्स बूक झालीत
त्या गाण्याची लिंक बघावी लागेल.
व्वा.. मस्त
व्वा.. मस्त
व्वा झक्कास फोटो.
व्वा झक्कास फोटो.
अतिशय सुंदर फोटो, धबधबा
अतिशय सुंदर फोटो, धबधबा भन्नाट आहे, खूप छान.
सुं>>>>द>>>र्र्र्र!!!!!!!!!!!
सुं>>>>द>>>र्र्र्र!!!!!!!!!!!!!
धबधबा फारच खळाळता आहे. तो
धबधबा फारच खळाळता आहे. तो धोकेदायकही आहे काय?
नायागराचा लहान भाऊ वाटतोय...
नायागराचा लहान भाऊ वाटतोय...
मस्त ठिकाण आणि फोटो तर
मस्त ठिकाण आणि फोटो तर झक्कासच.
मस्त अनुभव दिला फोटोंनी.
मस्त अनुभव दिला फोटोंनी. वर्णनही झकास....
सर्व नजारे अप्रतीम! नशीबवान
सर्व नजारे अप्रतीम! नशीबवान आहात आणी असेच रहा>>>>>>>>>>>>>>११११११११११११११११
आभार दोस्तांनो. पा.भे.
आभार दोस्तांनो.
पा.भे. स्विसमधे आपल्या मर्यादेत राहिलो तर काहिच धोकादायक नाही.
सुंदर.. पाणी जाम आवडले. कसले
सुंदर.. पाणी जाम आवडले. कसले खळाळते, सुदर हिरवे निळे आहे.... ते सौ बार जनम लेंगेही लैच भारी
मजा आली पाहताना....
कसले फोटो आहेत <<रफीचे, सौ
कसले फोटो आहेत
<<रफीचे, सौ बार जनम लेंगे.... आठवलं !>>
ते, सौ बार जनम लेंगे,
ते, सौ बार जनम लेंगे, भंडारदरा ला चित्रीत झाले होते का ?
सुं द र !! जळवंतीची शोभा आणि
सुं द र !! जळवंतीची शोभा आणि सर्वच प्रचि .
अ प्र ति म
अ प्र ति म
दिनेश त्या तिथे पलिकडे तुला
दिनेश त्या तिथे पलिकडे तुला प्रश्न विचारला होता लेन्स कोणती आहे?
रॉबीन, लेन्स वगैरे काही नाही.
रॉबीन, लेन्स वगैरे काही नाही. साधा कूलपिक्स कॅमेरा आणि ऑटो मोड.
अपरेचर / शटर अॅडजस्टमेंट वगैरे सगळे कॅमेराच करतो गुणी बाळ !
धबधब्याजवळचे फोटो सोडले तर, सर्व ( अगदी पहिले दोनही ) धावत्या बसच्या काचेतून घेतलेले आहेत.
सुंदर! आहाहा! काय तो धबधबा
सुंदर! आहाहा! काय तो धबधबा आणि काय ते फेसळते पाणी. मस्त भटकंती झाली.
Pages