बसमधे एक अफ्रिकन आजीबाई चढल्या... boycut, skirt, हातात पर्स, बॅग एकदम टापटीप...ड्रायव्हरशी हसुन बोलुन तिकिट घेउन आत आल्या, जागा शोधत माझ्या शेजारी येऊन बसल्या.
माझ्या पलिकडच्या सीटवर माझा नवरा आणि पोरगी खिडकीतून बाहेर बघत, गप्पा मारत होते...
आजी एकदम शांत आणि साध्या वाटत होत्या... सगळी बस शांत होती. एकदम रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली.. NRI Punjabi लग्न सुरू होत..सजवलेला शुभ्र घोडा, सरदारजी रंगीत पगड्या घातलेले, छान साड्या, ड्रेस घातलेल्या बायका आणि बॅन्ड... बस मधले सगळे लोक गंमत बघत होते. मी खिडकीत बसले होते आणि शेजारच्या आजींनी डोकावुन बाहेर बघीतलं आणि हासल्या.. Indian wedding...
जरा वेळ मोकळा झाल्या वर हाळुच म्हणाल्या पलीकडे बसलेली छोटी मुलगी सारखी तुझ्याकडे बघतेय. म्हट्ल माझीच मुलगी... त्यांना गंमत वाटली..माझी पोरगी पाहात होती आई कोण्त्या आजी जवळ बसली आहे ते...मग आजींची कळी खुलली... थोड्या ईकड्च्या तिकड्च्या गप्पा झाल्यावर मग नातवंडांच्या गमती सांगायला लागल्या..
सून,मुलगा लंडनला राहातात आणि आजी, आजोबा ब्रिस्टलला... केनियातून आल्या होत्या...सगळ्या आज्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्ह्णजे नातवंड...त्या म्हणाल्या छान आहे तुझी मुलगी, शांत बसली आहे बाबां जवळ्...म्हटलं तशी शहाणी आहे... पण खायला, रोजचं जेवायला नको.. पास्ता, पीझ्झा आवडीनी खाते...
मग काय सुरु झालं त्यांचं बोलणं..माझा नातू बिस्कीटं खातो खूप, फास्ट फूड नको द्यायला, फ्रुट्स देत जा...जास्ती बनाना नको..
आजींचा केनिया टाईप English आणि हातवारया सकट मोठमोठ्यानी बोलणं सुरू झालं होता...बस मधले बाकी लोकं बघायला लागली आणि हळुच हासत होती... एरवी इकडे बस मधे लोकं तोंडाला चिकटपट्टया लावुन बसतात, चुकुन बोललो तर दंड पडेल असा भाव चेहरयावर असतो... त्यात आजींच्या गप्पा बरया वाट्त होत्या..
आजी मनापासून बोलत होत्या.. नातवंड आत मोठी झालीत, शाळेत जातात, सून्-मुलगा जॉब करतात..मुलगी-जावयी ब्रिस्टलला असतात..मुलांच्या ओढीनी त्या आणि आजोबा केनिया सोडून London ला आले.. आजोबांना कसं अजुन ईकडे करमत नाही..तिकडे आवडतं..सगळे relatives तिकडे आहेत्..मुलीच्या घराजवळ छोट्या घरात आजी-आजोबा राहतात.. मुलीचं कौतुक, सुनेच्या complaints आणि कितीतरी सल्ले.....
त्या आजी वय, देश, भाषा, काळ, स्थळं, वेळ विसरून बोलत होत्या...मनात म्हटलं कुठेही गेलं तरी आजी, आजोबा आणि नातवंड यांचं नातं सगळीकडे सारखंच असतं.. त्या केनिया च्या boy cut, skirt, sandal वाल्या smart तरतरीत आजी मला एकदम ओळ्खीच्या वाटायला लागल्या..
त्यांचा stop आल्यावर अगदी काळजी घे स्वतःची, मुलीची म्हणत.. माझ्यामुलीला flying kiss देवुन पट्कन बस मधुन उतरल्या..
हातांनी जरी bye केलं, तरी मनानी त्यांना "welcome" म्हटलं होतं...
कितीतरी वेळ मनात त्यांचे विचार रेंगाळत होते...It is like painting the same picture on different canvases and colours...अर्थ एकचं.. आईवडील, मुलं या दोघांकडे कुठेतरी कर्तव्य भावना असते..पण आजी-आजोबा आयुष्यभर कष्टकरुन, मुलांना मोठं करतांना राहीलेले, निसटलेले सुखाचे क्षण नातवंडांशी खेळतांना मिळवतातं आणि नातवंड आईबाबांन कडून न पूरवलेले हट्ट, लाड, कौतुक आजीआजोबांकडुन करुन घेतात... निरपेक्ष प्रेम...हे नातं म्हणजेच आयुष्याचा "बोनस"...
छोटासाच अनुभव पण खुप
छोटासाच अनुभव पण खुप जिव्हाळ्याचा विषय यातुन मांडला गेला!! असे हलके फुलके प्रसंग बरच बोलुन जातात!
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
आवडलं लिखाण
आवडलं लिखाण
छान आहे.
छान आहे.
छान लिहिलयं.
छान लिहिलयं.
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
छान लिखाण
छान लिखाण
आवडलं
आवडलं
शेवटचा परिच्छेद विशेष आवडला
शेवटचा परिच्छेद विशेष आवडला