गती
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
4
अश्वाचे पाय घेऊन
जग जलद धावते आहे
इथे बिचारी गती कुर्मासम
जगणे तुरुतुरु चालले आहे
त्यांना गाठायचे आहेत चंद्र
रोज नवे आकाश हवे आहे
इथे आयुष्याच्या पोकळीत
केवळ काळोख झिरपत आहे
तिथे अशी पहाट उमलते
चोहीकडे किलबिल विरते
इथे दिवसाच्या पानावर
शिळ्या रात्रीची शाई ठिबकते
तिथल्या हवेत सोनचाफी परिमळ
तजेलदार चर्येवर हास्य विखरते
तिथला विचार करता करता
इथली बाग उजाड होते!!!!
विषय:
प्रकार:
शेअर करा
बी, छानच.
बी,
छानच. खोलवर रुतली कविता.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
आवडली.
आवडली.
अप्रतिम!!
अप्रतिम!! आवडली कविता!!!
वर्षा
बी सुंदर
बी सुंदर कविता .........!