Submitted by जिप्सी on 15 September, 2013 - 03:16
यावर्षीचे मुंबई गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचे प्रचि. सध्या कामात व्यस्त असल्याने विभागवार प्रचि प्रदर्शित करण्याऐवजी सगळे एकाच धाग्यात देत आहे, त्याबद्दल क्षमस्व. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, उंच मूर्ती, विलोभनीय देखावे, बाप्पांची मनमोहक छबी हि मुंबई सार्वजनिक मंडळांची खासियत पहायला मिळत आहे. यंदाचे खास आकर्षण आहे गणेशगल्ली येथील सोरटी सोमनाथाची प्रतिकृती, लालमैदान (परळ) येथील भिमाशंकर मंदिराची प्रतिकृती, लक्ष्मी कॉटेज (परळ) येथे बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेल्या व्यंगचित्रांवर आधारीत देखावा, स्प्रिंगमिल (नायगाव) येथे उत्तरांचलमधील प्रलय आणि केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती, तर सह्याद्री मित्र मंडळ चेंबुर यांनी सादर केलेला शंभर वर्षे सिनेसृष्टीची देखावा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया! _/\_ एक
गणपती बाप्पा मोरया! _/\_
एक से एक सुंदर बाप्पा
अप्रतिम फोटो
घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद रे जिप्सी
वाह!!! किती सुरेख आहेत सर्वच
वाह!!! किती सुरेख आहेत सर्वच बाप्पा!!!
धन्स रे जिप्स्या!!!
मुंबईच्या राजाची अनेकविध रुपं
मुंबईच्या राजाची अनेकविध रुपं ! मेजवानी दिलीस नजरेला जिप्सी, धन्यवाद खूप खूप.
सुंदर प्र.चि. योगेश. वेळात
सुंदर प्र.चि. योगेश. वेळात वेळ काढुन बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल आभार.
वा! मोरया!
वा!
मोरया!
मस्तच मेजवानी. धन्यवाद
मस्तच मेजवानी. धन्यवाद जिप्सी.
सध्या कामात व्यस्त असल्याने >>>
मस्त दर्शन घडवलेस. धन्यवाद.
मस्त दर्शन घडवलेस. धन्यवाद.
घरबसल्या मुंबईतल्या गणपतींचं
घरबसल्या मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
अगदी प्रामाणिक मत द्यायचं तर मला तेजु काया आणि अमृत मंडळाच्या मूर्ती आवडल्या नाहीत. चेहरा उग्र वाटला फारच. तसंच हल्लीच्या मॉडर्न, नाचणार्या किंवा कसल्याशा आवेशात असणार्या गणपतीबाप्पांपेक्षा मला आपल्या ट्रॅडिशनल, सोज्वळ मूर्तीच जास्त भावतात.
सुरेख मस्तच घरबसल्या
सुरेख
मस्तच
घरबसल्या मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल
घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद जिप्सी :) गणपती बाप्पा मोरया!
व्वा मस्त फोटो. काही कॉपी
व्वा मस्त फोटो. काही कॉपी करून घेतले. तूझी परवानगी न घेता.
मुंबैतले गणपती जरा उग्र असतात
मुंबैतले गणपती जरा उग्र असतात का की फोटो तसे आलेत
छान फोटोज , धन्यवाद जिप्सी !
छान फोटोज , धन्यवाद जिप्सी !
धन्यवाद रे! मस्त फोटो.
धन्यवाद रे! मस्त फोटो. घरबसल्या सगळे गणपती बघायला मिळाले.
धन्यवाद जिप्सी लहानपणी
धन्यवाद जिप्सी लहानपणी खेतवाडी , परळ लालबागचे गणपती पहायला जाण हा मोठा कार्यक्रम असायचा आमच्यासाठी:) परळ - लालबाग येथिल गणपती हे देखाव्यांसाठी प्रसिद्ध असायचे , एखाद ५-७ मि. चलतचित्र खेळ असायचा, पप्रचंड उत्कंठा असायची . गणेशगल्लीतला गणपती पाहण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या, गणेशगल्लीत राहणाऱ्या एका ओळखीच्या कुटुंबामुळे तेथील गणपतीचे दर्शन लवकर होई , मग उरलेले गणपती पाहण्यसाठी निघायचो , लालबाग मार्केट (गरम खाडा) येथील पण हल्ली प्रसिद्ध पावलेला लालबागचा राजा , येथे अगदी नॉर्मल गर्दी असायची ,म्हणजे मार्केटमध्ये जाऊन पटकन दर्शन घेऊन आल असा प्रकार असायचा पोलिस चौकीजवळ असणारा गणपती हा सदैव उंदीरमामांच्या डेकोरेशनचा असायाचा . तेजुकाया , रंगारी बदक चाळ असे आसपासचे गणपती, तिथले वातावरण सगळेच गणपतीमय व्हायचे. गणपती बाप्पा मोरया!
घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल
घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल खुप खुप आभार!!
मला तेजुकायाचा गणपती आवडला. खुदकन हसतोय असे वाटतेय.
छान.. धन्यवाद.
छान.. धन्यवाद.
सुंदर!
सुंदर!
सुंदर... धन्यवाद जिप्सी मला
सुंदर... धन्यवाद जिप्सी
मला शेजारी राहूनही या राजांचे दर्शन झालेले नाही.. आणि हा जिप्सी म्हणतोय की तो कामात व्यस्त आहे.
सोज्वळ मूर्तीच जास्त भावतात. >> अनुमोदन... त्या साठी खास माटुंगा सेंट्रलचे गणपती बघायला जायचे...
तिथले वातावरण सगळेच गणपतीमय व्हायचे. >> गे ते दि गे
धन्यवाद जिप्सी. वर ते लाल
धन्यवाद जिप्सी.
वर ते लाल पितांबर कसले सुंदर बनवले आहे.
जिप्स्या, गेली काही वर्षे
जिप्स्या, गेली काही वर्षे तूझ्याच हस्ते दर्शन घडतेय.. तूला पोटभर आशिर्वाद आणि शुभेच्छा !
कलर्स, प्रकाश, फ्रेमिंग आणि
कलर्स, प्रकाश, फ्रेमिंग आणि ... न्यु स्टाईल वॉमा मस्तच रे योगेश.
अप्रतिम
अप्रतिम
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
मस्त! धन्यवाद जिप्सी
मस्त! धन्यवाद जिप्सी
मस्त फोटो! नरे पार्कचा बाप्पा
मस्त फोटो!
नरे पार्कचा बाप्पा भारीच.
जिप्स्या , सगळे फोटो भारी..
जिप्स्या , सगळे फोटो भारी.. या सगळ्या मंडळांची माहीती घ्यायला पुढ्च्या वेळी मलाही बरोबर घे ..... नुसते बाप्पाच नाहे तर त्यांच्य मंडळांच्या माहीतीचा ही डेटाबेस बनवुन टाकु....
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपतीबाप्पा मोरया .....
गणपतीबाप्पा मोरया .....
वेगवेगळ्या बाप्पांचे छान दर्शन झाले ,धन्य-धन्य झालो
Pages