गणराज 'रंगी' नाचतो - गजानन - आरोही

Submitted by गजानन on 14 September, 2013 - 02:34

हा माझ्या मुलीचा 'रंगी नाचतो' Happy

पाल्याचे नावः आरोही.
वयः ४.९ वर्षे

Aarohi_bappa_paiting_01.JPG

एकदाच रंगवून पोट भरले नाही. म्हणून या चित्राच्या आणखी 'भर्पूर' प्रति छापून आणायला लावल्या आणि सगळ्या वेगवेगळ्या रंगांचे प्रयोग करून अगदी समरसून रंगवून पाहिल्या. Happy

ही सगळी रंगवलेली चित्रं मग तिच्यासमोर ठेवून 'यातलं कुठलं जास्त आवडलं हे सांग, मग आपण ते मायबोलीवर अपलोड करू.' असं विचारल्यावर कोणतं एक निवडायला तिला 'हे की ते, ते की हे' असं झालं. आणि शेवटी या चित्रावर हाताचा पंजा ठेवला. मला कल्पना आहे, की ही काही दर्जेदार चित्रे नाहीत, आणि आहेत त्यातही डावं उजवं आहेच. पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं. Happy

संयोजकांना आणि चित्रकार 'प्रिया' यांना धन्यवाद.

संयोजक, मुलीने रंगवलेल्या या चित्राच्या बाकीच्या प्रति इथे प्रतिसादात दिल्या तर चालतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन,धन्यवाद!

खुप मस्त रंगवलय चित्रं आरोहीने Happy
सगळीचं पिल्लं किती गोड रंग भरतायेत Happy
जिथुन बघुन हे चित्रं काढलेलं त्या चित्रापेक्षा ही चित्रं कैकपटीने सुंदर रंगवली गेलीयेत Happy
बरं वाटतय Happy

मस्त रंगवंलंय आरोहीने. Happy
गजानन, आमच्याकडे पण २-३ गणपतीबाप्पा रंगवले होते. पण ते रंगवून झाल्यावर परत पापाच्या बॅगमध्ये ठेवले आणि पापा कॉलेजात विसरलाय. जर आज पापा घेवून आला तर आज नाहीतर मग सोमवारी अपलोड करू आम्ही आमचे बाप्पा.

धन्यवाद मंडळी.

संयोजक, भर्पूर म्हणजे सात. Wink

१) 'गणा'ला महादेवासारखा रंग देऊन बघावा का?

Aarohi_bappa_paiting_02.JPG

२) की काल मी केळीच्या पानात जेवले त्या पानासारखा छान छान हिरवा देऊ या?

Aarohi_bappa_paiting_04.JPG

३) की आणखी जरा जास्तीचे रंग भरून बघावे?

Aarohi_bappa_paiting_05.JPGAarohi_bappa_paiting_06.JPGAarohi_bappa_paiting_07.JPG

पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं

>>> हे फार्फार आवडलं. Happy

सुंदर.

खरचं छान रंगवलेत की बाप्पा Happy
सात वेळा एकच चित्रं रंगवण्याची चिकाटी ह्या वयात. मान्या.>>>> आमच्याकडे तीन वेळा रंगवून झालेत आणि 'काय गं फक्त ३ चं प्रिंट का आणलीस १० (टेन) आणायचीस ना.' असं तीनतीनदा म्हणुन झालयं Happy खुप चिकाटी असते हे मात्र खर.

>> आणखी 'भर्पूर' प्रति छापून आणायला लावल्या आणि सगळ्या
किती गोड! Happy

>> तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं.
Happy

मस्त हो गजाभाऊ.

शेवटी या चित्रावर हाताचा पंजा ठेवला. मला कल्पना आहे, की ही काही दर्जेदार चित्रे नाहीत, आणि आहेत त्यातही डावं उजवं आहेच. पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं >> Happy "ही काही दर्जेदार चित्रे नाहीत" ह्या तुलनेची गरज नाहि हो गजाभाउ

धन्यवाद, बिल्वा.

प्रशंसापत्रावरची चित्रे बघून आरोही म्हणाली की, "अरे! ह्याच्यावरची तर सगळीच चित्रे रंगवलेली आहेत. आता मी काय रंगवू?" Lol