हा माझ्या मुलीचा 'रंगी नाचतो'
पाल्याचे नावः आरोही.
वयः ४.९ वर्षे
एकदाच रंगवून पोट भरले नाही. म्हणून या चित्राच्या आणखी 'भर्पूर' प्रति छापून आणायला लावल्या आणि सगळ्या वेगवेगळ्या रंगांचे प्रयोग करून अगदी समरसून रंगवून पाहिल्या.
ही सगळी रंगवलेली चित्रं मग तिच्यासमोर ठेवून 'यातलं कुठलं जास्त आवडलं हे सांग, मग आपण ते मायबोलीवर अपलोड करू.' असं विचारल्यावर कोणतं एक निवडायला तिला 'हे की ते, ते की हे' असं झालं. आणि शेवटी या चित्रावर हाताचा पंजा ठेवला. मला कल्पना आहे, की ही काही दर्जेदार चित्रे नाहीत, आणि आहेत त्यातही डावं उजवं आहेच. पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं.
संयोजकांना आणि चित्रकार 'प्रिया' यांना धन्यवाद.
संयोजक, मुलीने रंगवलेल्या या चित्राच्या बाकीच्या प्रति इथे प्रतिसादात दिल्या तर चालतील का?
मस्त रंगवलंय चित्रं आरोहीनं.
मस्त रंगवलंय चित्रं आरोहीनं. बाप्पा एकदम मल्टिकलर आहेत.
शाब्बास आरोही!
गजानन,धन्यवाद! खुप मस्त
गजानन,धन्यवाद!
खुप मस्त रंगवलय चित्रं आरोहीने
सगळीचं पिल्लं किती गोड रंग भरतायेत
जिथुन बघुन हे चित्रं काढलेलं त्या चित्रापेक्षा ही चित्रं कैकपटीने सुंदर रंगवली गेलीयेत
बरं वाटतय
गजानन, भरपुर' म्हणजे किती?..
गजानन, भरपुर' म्हणजे किती?..
चालतील प्रतिसादात लोड केलीत तरी.
मस्त रंगवंलंय आरोहीने.
मस्त रंगवंलंय आरोहीने.
गजानन, आमच्याकडे पण २-३ गणपतीबाप्पा रंगवले होते. पण ते रंगवून झाल्यावर परत पापाच्या बॅगमध्ये ठेवले आणि पापा कॉलेजात विसरलाय. जर आज पापा घेवून आला तर आज नाहीतर मग सोमवारी अपलोड करू आम्ही आमचे बाप्पा.
दर्जेदारच आहे हं आरोहीचा कलर
दर्जेदारच आहे हं आरोहीचा कलर सेन्स. मस्त रंगवलंय.
मस्त रंगवलेय चित्र. आरोहीला
मस्त रंगवलेय चित्र.
आरोहीला मोठ्ठी शाब्बासकी.
मस्त रंगवलय चिमुकलीने
मस्त रंगवलय चिमुकलीने
धन्यवाद मंडळी. संयोजक, भर्पूर
धन्यवाद मंडळी.
संयोजक, भर्पूर म्हणजे सात.
१) 'गणा'ला महादेवासारखा रंग देऊन बघावा का?
२) की काल मी केळीच्या पानात जेवले त्या पानासारखा छान छान हिरवा देऊ या?
३) की आणखी जरा जास्तीचे रंग भरून बघावे?
मस्तच.
मस्तच.
भारि
भारि
सहीच... मस्तच रंगवलेत बाप्पा.
सहीच... मस्तच रंगवलेत बाप्पा. सात वेळा एकच चित्रं रंगवण्याची चिकाटी ह्या वयात. मान्या.
जबरी! अरोहीला अनेक शाबासक्या.
जबरी! अरोहीला अनेक शाबासक्या. आगे बढो. सर्वच बाप्पा आणी रंगछ्टा आवडल्या.
आरोही गोड आहेत सगळी चित्रं
आरोही गोड आहेत सगळी चित्रं
मस्त.
मस्त.
एकदम गोड
एकदम गोड
पण तिने रंगवलेल्या प्रत्येक
पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं
>>> हे फार्फार आवडलं.
सुंदर.
सुंदर.
खरचं छान रंगवलेत की बाप्पा
खरचं छान रंगवलेत की बाप्पा
सात वेळा एकच चित्रं रंगवण्याची चिकाटी ह्या वयात. मान्या.>>>> आमच्याकडे तीन वेळा रंगवून झालेत आणि 'काय गं फक्त ३ चं प्रिंट का आणलीस १० (टेन) आणायचीस ना.' असं तीनतीनदा म्हणुन झालयं खुप चिकाटी असते हे मात्र खर.
छानय....
छानय....
सगळीच चित्र मस्त रंगवलीत.
सगळीच चित्र मस्त रंगवलीत. उपक्रमासाठी दिलेले चित्र बघून "जेम्स" आठवले
>> आणखी 'भर्पूर' प्रति छापून
>> आणखी 'भर्पूर' प्रति छापून आणायला लावल्या आणि सगळ्या
किती गोड!
>> तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं.
मस्त हो गजाभाऊ. शेवटी या
मस्त हो गजाभाऊ.
शेवटी या चित्रावर हाताचा पंजा ठेवला. मला कल्पना आहे, की ही काही दर्जेदार चित्रे नाहीत, आणि आहेत त्यातही डावं उजवं आहेच. पण तिने रंगवलेल्या प्रत्येक चित्रावर तिने एवढा जीव ओतला की निवड करताना ती बुचकळ्यात पडली, हे बघून लै ग्वाड वाटलं >> "ही काही दर्जेदार चित्रे नाहीत" ह्या तुलनेची गरज नाहि हो गजाभाउ
कित्ती गोड! मला आवडला
कित्ती गोड! मला आवडला मल्टीकलर बाप्पा.
गोड श्टोरी आहे चित्रामागची
गोड श्टोरी आहे चित्रामागची
मळ्टीकलर बाप्पा - मामी एकदम बरोबर
अरे मस्तच हे रंगाचे प्रयोग
अरे मस्तच
हे रंगाचे प्रयोग करुन बघणे लै आवडले.. आरोही तुला गोड गोड पापा
(No subject)
अरे वा! प्रशंसापत्र? धन्यवाद
अरे वा! प्रशंसापत्र? धन्यवाद हो संयोजक.
आणि चित्राच्या कौतुकाबद्दल धन्यवाद मंडळी.
सगळीच रंगवलेली चित्रं खूप
सगळीच रंगवलेली चित्रं खूप आवडली , आरोही.
धन्यवाद,
धन्यवाद, बिल्वा.
प्रशंसापत्रावरची चित्रे बघून आरोही म्हणाली की, "अरे! ह्याच्यावरची तर सगळीच चित्रे रंगवलेली आहेत. आता मी काय रंगवू?"