माझा इथे कुणीही शत्रू न मित्र आहे

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2013 - 13:27

माझा इथे कुणीही शत्रू न मित्र आहे
काही म्हणा खुळ्यांनो पण मी पवित्र आहे

दुखवून आपल्यांना परक्यास हास्य देतो
जितके जमेल तितके बनतो विचित्र आहे

मारू कसा तुझ्याशी मी दिलखुलास गप्पा
नाहीस तू समोरी नुसतेच चित्र आहे

मदिरा खराब आहे हे सांगता कुणाला
कोणी मला विचारा उर्जाजनित्र आहे

भूषण तयार असता, झाला कशास त्याला
मकरंद कर्करोगी...... असुदेत...... मित्र आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा सोडून सगळे आवडले

मतला,चित्र अप्रतिम !

मारू कसा तुझ्याशी मी दिलखुलास गप्पा
नाहीस तू समोरी नुसतेच चित्र आहे

वाह वा वा !

दुखवून आपल्यांना परक्यास हास्य देतो
जितके जमेल तितके बनतो विचित्र आहे

अप्रतिम.

मारू कसा तुझ्याशी मी दिलखुलास गप्पा
नाहीस तू समोरी नुसतेच चित्र आहे

ह्या शेरावरून जौक चा एक शेर आठवला:

ऐ अहले-नजर आलमे-तसवीर को देखो
तसवीर का क्या देखना तसवीर में क्या है

भूषण तयार असता, झाला कशास त्याला
मकरंद कर्करोगी...... असुदेत...... मित्र आहे>>>>>

एक जोरदार धक्का ! पण शेवट्ची ओळ...मला अशी आवड्ली असती...

हे मुर्ख कर्करोगा! मकरंद मित्र आहे....

काही खटकल्यास माफी असावी.

मनातल्या दु:खाला शेवटच्या शेरातून वाट मोकळी करून देण्याकरीता ही गझल झाली असावी आणि केवळ त्याच कारणासाठी मला गझल आवडली.

दुखवून आपल्यांना परक्यास हास्य देतो
जितके जमेल तितके बनतो विचित्र आहे >>>हा फारच आवडला. Happy

अहं काही खास नाही. मित्र आणि पवित्र तर इतकं ओढून आणलंय की रचनाकर्त्यांची दया यावी.

-दिलीप बिरुटे
(कोणाचाच शत्रु नसलेला)

ठीक आहे.

माझा इथे कुणीही शत्रू न मित्र आहे >> त्यांचंही मत विचारात घ्यायला हवं ना ! (:दिवा: हलकेच घ्याल प्लीज )