अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥
कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला ।
मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥
न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥
मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे ।
कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥
न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥
प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया ।
धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥
नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या ।
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥
तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्त राहिला ।
विकास जाहला कसा, बकाल देश जाहला ॥
तरूण राबता करू, जनांस लावु शिस्त ह्या ॥
चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ४ ॥
नरेंद्र गोळे २०१३०९१२
http://anuvad-ranjan.blogspot.in/
ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
अगदी जोरदार कविता आहे ही काका
अगदी जोरदार कविता आहे ही काका ... मस्तच ....
व्वा..... एकदम दणदणीत !! पण
व्वा..... एकदम दणदणीत !!
पण इतकी छान कविता इथे म्हणजे कलेत कशी ?
वाह !!!
वाह !!!
शशांक, जयश्री आणी
शशांक, जयश्री आणी वैभव;
सगळ्यांना अभिप्रायार्थ मनःपूर्वक धन्यवाद!
जयश्री,
खरे तर कविता म्हणजे कला आहेच.
मात्र इथे मायबोलीवर, ती कला गटात "कुरूप वेडी" दिसत असल्याने, तिथून वेगळी केली आहे!
मस्त !
मस्त !