सुंदर माझे पुणे - तळजाई टेकडी

Submitted by हर्पेन on 3 September, 2013 - 14:54

वाढत्या वस्तीला, वाहनांच्या प्रदुषणाला पुरून उरून पुण्याचे हवामान अजूनही बरेच चांगले / टिकून आहे, याचे एक प्रमुख कारण पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या टेकड्या.

ह्या टेकड्या म्हणजे जणू पुण्याला ऑक्सिजन पुरवठा करणारे कारखानेच होत.

जेव्हा केव्हा गडाकिल्ल्यांवर जाता येत नाही तेव्हा तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवायला उपयोगी पडतात या टेकड्या.

कोणा नवख्या माणसाला तो गडाकिल्ल्यांवर जाऊ शकेल की नाही याचा अंदाज बांधायला मदत करतात या टेकड्या.

घरातल्या लहान मुलांना पुण्यातल्या पुण्यात सह्याद्रीची ओळख करून द्यायला उपयोगी पडतात या टेकड्या.

खालील प्रकाशचित्रे ही एका बाजूला सहकारनगर तर दुसर्‍या बाजूला सिंहगड रस्ता असणार्‍या तळजाई टेकडीवर गेलो असताना काढलेली आहेत.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा अशोकरावांबरोबर दिनेशदा पण येणार - मग काय जमलंच की सगळं - आटीव दूध, त्यात साखर, त्यात केशर - अशी कोजागिरी केव्हा बरे येणार ?????

दिनेशदा - पुढच्या पुणे ट्रिपचे ठिकाण तर ठरले - आता तुम्ही फक्त तारखा ठरवा की झाले सगळे फिक्स.

अरे वा अशोकरावांबरोबर दिनेशदा पण येणार - मग काय जमलंच की सगळं - आटीव दूध, त्यात साखर, त्यात केशर - अशी कोजागिरी केव्हा बरे येणार ????? >>> अगदी अगदी

शशांक, अशी कोजागिरी येईल तेव्हा येईल, आपण प्रतिपदा द्वितिया तरी करूया Happy

कापो - जाणार आहे का काय विचारतोयस, चल जाऊ असे म्हण. Lets go !

"....आटीव दूध, त्यात साखर, त्यात केशर....."

~ हर्पेन, मग मी मेलोच !! माझ्या डॉक्टरांनी या पदार्थांचे वाचन जर केलेच यदाकदाचित तर बेधडक मला ते आय.सी.यू.त टाकतील.

<<<रोजचा किमान आठ-दहा किलोमीटर चालण्याचा माझा नित्यनेमाचा व्यायाम इथेही असल्याने तळजाई परिसार मस्तपैकी फिरता येईल....शक्यतो तुम्हा दोघांबरोबरही. >>>>>

@अशोक : काकाश्री, तुमचा हा पुतण्या धनकवडीतच राहतो हे विसरू नका म्हंटलं Wink

अरे विशालबेटा..... तू आणि निपो माझ्या यादीतील अलिखित सदस्य आहातच...... खोटे वाटत असेल तर कराडला निपोला आत्ताच फोन कर. आमचे बोलणे झाले सविस्तर आजच सकाळी..... मी कात्रजचा उल्लेख करताच निपो उद्गारला 'अरे मग विशालही तिथेच भेटेल आपल्याला....!"

सो....लेट शशांक, हर्पेन अ‍ॅन्ड दिनेश फिक्स द एक्झॅक्ट डेट फॉर दॅट स्पेशल गटग.

अशोक पाटील

मस्त Happy

तळजाई नाव वाचुन धागा उघडला. गेल्या रवीवारी मी तळजाईला गेले होते. तळजाई मंदिराच्या समोरुन जो रस्ता जातो त्याने आम्ही वर गेलो. वर ब-याच बिल्दींगी आहेत आणि नविनही होताहेत. वर फोटोत आहे तसे काही तिथे आहे हे माहित नव्हते. नाहितर नक्की पाहिले असते.

काका अरे ते जाऊन आल्यावर सांगुन काय उपयोग ? Wink
ह्म्म मला हेवा वाटतो आहे, मी या अशा गटगला उपस्थित राहू शकणार नाही. Sad

गटग पुढच्या शनिवारी ८ मार्चला किंवा रवीवारी ९ मार्चला करुया का? आणि हो सायकल गटग प्रमाणेच हे टेकडी गटगसुध्दा सगळ्यांसाठी खुले असेल. Happy

या गटगला माझा हात वर. सायकल चालवत नाही येणार पण Happy
ठरवा वेगळ्या धाग्यावर, अजेन्डा वगैरे. वनविहार करायचा का, का नुसतेच चढायचे? ऊन फार चटकन व्हायला लागले आहे. त्यामुळे हे गटग लवकरात लवकर करायला हवे.

अरे हे कसं प्॑अहिलं नाही? मस्तच!
हर्पेन ....या वाटा किती असंख्य वेळा तुडवल्यात.....त्याला गणती नाही!

तळजाई हे एक व्यसन आहे. सुरुवातीला मला फारसे नाही आवडायचे तिकडे जायला. फार गच्च झाडीमुळे अंधार-अंधार वाटायचा, पण नेहमी जायला लागल्यावर मात्र खूप आवडायला लागलंय. आता नवीन नवीन पायवाटा शोधून चक्कर पूर्ण करायचा छंदच लागलाय. सध्या उन्हाळा सुरु झाल्यामुळे हिरवाई कमी कमी होत चाललेय, पाऊस येईपर्यंत आता असच राहिल.
मी रोज संध्याकाळी ५:३० ते ६:३० दरम्यान असते तिकडे.

मी १९७२ पासुन पर्वती , वाघजाइ (शाहू कोलेज्च्या मागील बाजुस) ; तळजाइ (पाचगाव पर्वती असे त्याचे त्या काळातील नाव होते) या टेकद्या.न्वर हि.न्डण्याचा आन.न्द घेत आहे. वन खात्याच्या काही चा.न्गल्या कामाला या परिसराच्या हिररवेपणाचे ष्रेय द्यावे लागेल.
या परिसरात मोर ; ससे आणी पोपट मुबलक दिसतात.
माझी एकच तक्रार आहे कि इथे जी वनस्पती जास्ती करून लावलि आहे (भारता बाहेरील असावी) ती फक्त जुलइ ते ऑक्टोबर या ३-४ महिन्यापुरतीच हिरवी असते.बाकीचे ८ महिने फक्त वळक्या झुडुपाच्या रूपात भकासपणा घेउन येते. खूप स्नख्येनी वड ; पिम्पळ, कडुलि.न्ब , शिरीश असे भारतीय व्रुक्श लावायला हवेत जे कि पूर्ण वर्शभर हिरवे असतात.

Pages