Submitted by आनंदयात्री on 28 August, 2013 - 00:51
जाणवे आता मला की, स्वप्न क्षितिजापार आहे
भोवती काळोख दिसतो, आतही अंधार आहे
मुखवटे चढवा कितीही, दाखवा शोभा स्वतःची
एकदा नक्कीच ही आरास कोसळणार आहे
आपल्या असण्यात इथल्या फार मोठा फरक आहे -
तू इथे नसशीलही पण मी इथे असणार आहे
वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे
मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे
यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाही
शोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/08/blog-post_27.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिया, पुन्हा वाचलीस एवढंच
रिया, पुन्हा वाचलीस एवढंच महत्त्वाचं माझ्यासाठी!
समीर मनापासून धन्यवाद!
चिन्नु, इध्धरही है हम...
सर्वांचे आभार पुन्हा
वाह...! सहज आणि
वाह...! सहज आणि सुंदर.........
सगळेच शेर चढत्या क्रमाने
सगळेच शेर चढत्या क्रमाने आवडले. शेवटचे दोन तर सर्वोत्कृष्ट !
सुरेख आहे गझल.
वा आनंदयात्री. मुखवटे आणि
वा आनंदयात्री. मुखवटे आणि शेवटचे दोन खूप आवडले. त्या " __णार आहे " मधे जे positive conviction आणि खात्री आहे ते फार आवडलं.
मस्त आहे . >> वेगळा होईन मी
मस्त आहे .
>> वेगळा होईन मी पण, मोकळा होणार नाही
जीव माझा फिरून येथे नित्य घुटमळणार आहे
मोह होतो - 'या क्षणी घ्यावी विरक्ती', मग समजते -
ही विरक्तीही क्षणापुरतीच या टिकणार आहे >> हे जास्त आवडले.
उत्तमोत्तम...
उत्तमोत्तम...
यापुढे कोणासही सर्रास मी
यापुढे कोणासही सर्रास मी दिसणार नाहीशोधण्या येतील जे, त्यांनाच सापडणार आहे>>
किती सहज सुंदर लिहिली आहे..मस्त...
पुन्हा धन्यवाद
पुन्हा धन्यवाद
Pages