दारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला.
सहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता..
मोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या..
यावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला..
तिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची..
त्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते..
शेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा..
बालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..!!
क्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला..
पाचवा पेग अर्धाच सोडून.. दुनियादारीला विसरून..
यारीदोस्ती निभावायला..!
................
................
...........
....
....
लग्नाच्या दिवशी सहजच कोणीतरी विचारले, "आज तुझा जिगरी दोस्त दिसत नाही कुठे??"
त्याने एकवार तिच्याकडे पाहिले,
"पडला असेल बेवडा कुठेतरी पिऊन....." म्हणत, विषयच संपवून टाकला.
- तुमचा अभिषेक
आवडली. पण प्रेडिक्टेबल होती
आवडली.
पण प्रेडिक्टेबल होती
सुरेख
सुरेख