मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.
भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..
गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.
परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.
आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.
थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.
ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.
- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.
- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.
- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.
- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.
- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.
- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.
- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.
ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?
( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).
लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.
१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.
हे म्हणले निघा, अन आम्ही
हे म्हणले निघा, अन आम्ही निघालो. बाफं म्हणजे तुमचं घर आहे का? कैत्तरी आपलं. नको तिथे पुंगाटबाजी करायची, नको तिथे हक्क दाखवायचा. ह्यातच मोठेपणा. तुम्हाला पकवायला मी इथे अजून काही बोलू शकतो पण आता पुष्कळ झालं. इतर बरीच लोकं वाचतायत म्हणून लिहित होतो.
इब्लिस, ग्रो अप. येवढच म्हणतो.
लोकहो, भाषा आवरा आणि भांडू
लोकहो, भाषा आवरा आणि भांडू नका. जसे तुम्ही इतर सार्वजनीक धाग्यांवर जाऊन प्रतिसाद देता तसेच इतरही या धाग्यावर येऊन प्रतिसाद देउ शकतात हे लक्षात ठेवले तरी पुरे.
तसेच ज्या ग्रूपात हा धागा तयार केला आहे त्याचे वर्णन "परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव" आहे.
मिना हा विषय त्या बाफवर
मिना
हा विषय त्या बाफवर डिस्कस करावा, तो बाफ आहे ना अजून ? तिथे डिस्कस करायला अडचण आहे का ?
किरण - योगदान नसल्याचा संदर्भ
किरण - योगदान नसल्याचा संदर्भ येथे ही आहे.
इब्लिस, हो आहे. अर्थात वाद मुद्द्यांबद्दलच आहे, वैयक्तिक तुमच्याबद्दल, किरणबद्दल किंवा इतरांबद्दलही काही आकस नाही. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल आक्षेप घेतलेला आहे त्या त्याने लिहीलेल्याच नाहीत असे माझे मत आहे.
सिंहगड च्या पार्किंग बद्दलः मला पार्किंग मिळवून देण्याची जबाबदारी कुणा 'क्ष' ची आहे - येथे तो 'क्ष' म्हणजे सिंहगडावर येणार्या लोकांसाठी तेथे पार्किंग चालवणारे लोक, त्यांची आहे. इतरांची नाही. इतरांकडून अपेक्षा एवढीच आहे की रस्त्यावर वाहने लावू नयेत. यात मला काही चूक दिसत नाही.
<<@ फारएण्ड प्लीज मनस्मीच्या
<<@ फारएण्ड प्लीज मनस्मीच्या लेखाबद्दल इथे चर्चा नको. प्लीजच. तो विषय तिथेच बरा. धन्यवाद. >>
किरणु, हा अट्टाहास कशासाठी? माझ्यामते या बाफची जननी मनस्मीचा बाफ आहे. मग त्याचा रेफरंस आला तर काय बिघडलं?
बादवे, हा बाफसुद्धा "परतोनी पाहे" गृपमध्येच दिसतोय...
@ जसे तुम्ही इतर सार्वजनीक
@ जसे तुम्ही इतर सार्वजनीक धाग्यांवर जाऊन प्रतिसाद देता तसेच इतरही या धाग्यावर येऊन प्रतिसाद देउ शकतात हे लक्षात ठेवले तरी पुरे.>>
त्या बाफवर नानबा यांनी खुलासा करेपर्यंत आणि खटकलेलं असल्याने चर्चा करत होतो. एकदा त्यांनी तुमचे प्रतिसाद इथे नकोत असं सांगितल्यावर तिथं लिहीलेलं नाही. तीच अपेक्षा इथे करतो आहे. चुकतंय का काही?
फारेण्डा जाऊच द्या. मी दुसरा
फारेण्डा
जाऊच द्या.
मी दुसरा बाफ उदाहरणार्थ दिलाय जिथे टिका आहेच. आरटीओ मधला अनुभव आहेच. पण एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. की ब्वा मला अशा अडचणी आल्या, मला असा अनुभव आला, मी असे केले.
आता या विरुद्ध,
'कायदेशिर प्रॉब्लेममुळे, (उदा हिरवं पिवळं कार्ड वा व्हॉटेव्हर) तिकडे रहाताच येत नसेल, तर गोष्ट वेगळी. पण अदरवाईज स्लीप ऑन इट' हे वाक्य त्या बाफवर आहे की नाही?
कम ऑन.
हा फरक दिसत नाहीचेय का?
दुसर्या बाफवर रणकंदन का माजले नाही?
इथेच का माजले?
असो...
बुवा,
कम लेट्स ग्रो अप टुगेदर.
<<इब्लिस, ग्रो अप. येवढच
<<इब्लिस, ग्रो अप. येवढच म्हणतो. >>
हा हा हा... आय थिंक आय हॅव सीन धिस मुव्ही बिफोर...
किरण, दोन्ही धागे
किरण, दोन्ही धागे परतणार्यांबद्दलच असल्याने जो धागा सध्या चालू आहे तेथेच प्रतिक्रिया देउन फायदा आहे. ज्यांच्या प्रतिसादाबद्दल लिहायचे आहे त्यांनी तेथे जाऊन ते वाचलेच नाही तर काय उपयोग. आणि हा धागा परतलेले लोक जे बोलतात त्यावरच आहे ना? मग मनस्मिचा धागा त्यात आलाच की.
किरणु, हा अट्टाहास कशासाठी?
किरणु, हा अट्टाहास कशासाठी? ??
राज लेखात कुठे उल्लेख आहे का ? तसच या बाफची जननी तो बाफ आहे असंही कुठे म्हटलेलं नाही. तो तुमचा समज आहे. इथेच काही पोस्टआधी खुलासा केलेला आहे. मायबोलीबाहेरही परतून येणा-यांचे अनुभव स्थानिकांना येत असतात. त्याबद्दल हा बाफ आहे. स्थानिकांनी लिहायचे आहे.
सकारात्मक लिहायचे असल्यास कुणीही लिहू शकतं! यात अडचण आहे का ?
फारेण्ड. मर्जी तुमची. मला
फारेण्ड. मर्जी तुमची. मला त्या विषयावर इथेही आणि तिथेही चर्चा करायची नाही.
राज, वाँट टु फ्लाय अ काईट?
राज,
वाँट टु फ्लाय अ काईट? ~wink~
मज्जा येते. या इकडं दोघे मिळवून उडवू.
<< सकारात्मक लिहायचे असल्यास
<< सकारात्मक लिहायचे असल्यास कुणीही लिहू शकतं! यात अडचण आहे का ? >>
सगळेच गुडी-गुडी लिहायला लागले, रियालिटीकडे कानाडोळा करायला लागले तर प्रगती होइल का?
लोक्स शुभरात्री ! पुन्हा
लोक्स शुभरात्री !
पुन्हा भेटू. इथे उल्लेख झालेल्या सिंहगडावरच्या पार्किंगसारख्या उदाहरणांबद्दल काय करता येईल हे पाहूयात पुन्हा केव्हातरी. नकारात्मक अनुभवांचा सप्लाय झाला तरी चालेल असं आता वाटू लागलंय. आपण तोडगे शोधूयात. ज्यांना त्यात रस नाही त्यांना शुभेच्छा !
ता.क. : सिंहगडावर काही वर्षांपूर्वी खूप कचरा होता. पर्यटक आणि इतरांकडून प्लास्टीक वेस्टचा ढीग लागला होता. या प्रवृत्तीवर फक्त टीका करण्याऐवजी किंवा हे अनुभव सार्वजनिक ठिकाणी सांगण्याऐवजी किरकटवाडीच्या राजू हगवणे या मित्राने त्याचा मित्रपरिवार, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून गडाची नियमित स्वच्छता केली. या अभियानासाठी नेत्यांना बोलावलं. त्यातून आता दक्षता समित्या स्थापन झाल्यात आणि गडावर जाण्यासाठी फीज लावली गेलीये. या फीतून गडावर विकासकामे होतात.
फक्त अनुभव सांगण्याने हा बदल झाला असता का ? काय वाटतं ?
नकारात्मक अनुभवांसहीत तोडगे सुचवा इतकंच म्हटलं होतं ज्याचा प्रचंड इश्यू केला गेलाय असं वाटतं.
मिना हा विषय त्या बाफवर
मिना
हा विषय त्या बाफवर डिस्कस करावा, तो बाफ आहे ना अजून ? तिथे डिस्कस करायला अडचण आहे का ?>> ईब्लिसान्नी इथे लिहिले त्याला मी उत्तर दिले.
मा. अॅडमिन, >> तसेच ज्या
मा. अॅडमिन,
>>
तसेच ज्या ग्रूपात हा धागा तयार केला आहे त्याचे वर्णन "परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे अनुभव" आहे.
<<
हे रिमाईंडर बरोबर आहे.
माझी थोडी इब्लिसगिरी प्लीज माफ करणार का?
>>तसेच ज्या ग्रूपात हा धागा तयार केला आहे त्याचे वर्णन "परदेशातून परतलेल्या, परतू इच्छिणा-यांचे(मला आलेले) अनुभव" आहे.<<
तो कंस माझ्या मनात आहे. त्याला संपादकीय अॅप्रूव्हल प्लीज देणार का?
धागा त्या ग्रूपमधे असला तरी सार्वजनिक आहे म्हणुन लिहितो आहे.
इब्लिस, तुम्ही उल्लेख केलाय
इब्लिस, तुम्ही उल्लेख केलाय ते वाक्य असे आहे, कॉपी करून
कुणीही मला परतण्याबद्दल विचारले तर माझा एकच प्रश्न असतो की परतायला हवेच का? जर काही कौटुंबिक अडचण असेल किंवा नोकरीचा प्रॉब्लेम असेल किंवा लीगल स्टेटसचा प्रॉब्लेम असेल तर येणे अपरिहार्य आहेच पण असे काही कारण नसेल तर कृपया परतण्याबद्दल फेरविचार करा. Sleep on it. >>>
यात भारताला दोष देण्याचा उद्देश मला दिसला नाही. परत जायची ज्यांना गरज आहे ते सोडून इतरांनी पूर्ण विचार करून ते करा, एवढेच.
लीगल स्टेटसचा प्रॉब्लेम असेल
लीगल स्टेटसचा प्रॉब्लेम असेल तर येणे अपरिहार्य आहेच पण असे काही कारण नसेल तर कृपया परतण्याबद्दल फेरविचार करा. Sleep on it.
हेच मी थोडं मराठी भाषांतर करून लिहिलंय का??
'कायदेशिर प्रॉब्लेममुळे, (उदा
'कायदेशिर प्रॉब्लेममुळे, (उदा हिरवं पिवळं कार्ड वा व्हॉटेव्हर) तिकडे रहाताच येत नसेल, तर गोष्ट वेगळी. पण अदरवाईज स्लीप ऑन इट' हे वाक्य त्या बाफवर आहे की नाही?>>> असे वाक्य धरले तरी मला ध्वनित अर्थ "भारताला दोष देण्याचा उद्देश मला दिसला नाही. परत जायची ज्यांना गरज आहे ते सोडून इतरांनी पूर्ण विचार करून ते करा, एवढेच." असाच दिसतो.
ज्यांचा व्हिसा संपलाय त्यांना पर्यायच नाही. पण इतरांनी पूर्ण विचार करा. या काय चूक आहे?
फारएण्ड धागा सार्वजनिक होता.
फारएण्ड
धागा सार्वजनिक होता. त्यामुळे इतरांकडून तो वाचला गेला. त्यांना आवडला नाही. त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं. तीन वर्षात असेच अनुभव आले हे पटलं नाही जे बदलणं शक्य नाही दॅट्स ऑल ! आपण थांबूयात.
परत जायची ज्यांना गरज आहे ते
परत जायची ज्यांना गरज आहे ते सोडून इतरांनी पूर्ण विचार करून ते करा, एवढेच.
<<<
'गरज आहे' नव्हे, नाईलाज आहे, असा त्याचा अर्थ होतो.
इतरांनी पुन्हा विचार करा म्हणजे, 'शक्यतो येऊ नका'
मायबोलीवरच्या दिग्गज मराठी भाषा प्रेमिकांना इतके सोपे अर्थ विस्कटून सांगावे लागतात??
बाय व्हर्चू ऑफ विच स्पेक्टॅकल्स?
किरण, मग योगदानाबद्दल हे: या
किरण, मग योगदानाबद्दल हे:
या भारतीयांचे अमेरिकाच्या जडणघडणीत योगदान नसते ही एक आवडती थिअरी आहे. याच बाफवर नव्हे, इतरही अशा ठिकाणी हमखास हे वाक्य येते. हे योगदान कसे ठरवणार? १८०० साली जे मिसिसीपी ओलांडून निघाले त्यानंतर ५०-६० वर्षे जे झाले त्यांचेच फक्त योगदान होते का? जे भारतीय लोक पब्लिक वर्क्स मधे आहेत - रस्ते, पूल बांधायच्या कामात आहेत, जे लोक संशोधनात आहेत, जे लोक संशोधन करणार्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवतात त्यांचे 'योगदान' होत नाही का? मग हे तक्रार करणारे लोक यातील काहीही करत नसतील हे कशावरून?
'गरज आहे' नव्हे, नाईलाज आहे, असा त्याचा अर्थ होतो. >>>मान्य आहे. पण येथे त्याचा अर्थ फक्त निर्णय तुमच्या हातात नाही असा होऊ शकतो.
इतरांनी पुन्हा विचार करा म्हणजे, 'शक्यतो येऊ नका'>>> नाही तसा उद्देश नसावा. मला तरी दिसला नाही. स्लीप ऑन इट इतरत्रही ऐकलेले आहे. करू नका असा ध्वनित अर्थ नसतो. घाईघाईत करू नका असा असतो. मनस्मिनेही त्याच संदर्भाने वापरला असावा एवढा बेनेफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नाही
अन हेच उद्वेगाने म्हणतोय, की
अन हेच उद्वेगाने म्हणतोय, की नकाच येऊ हो!
उपहासाने सांगतोय, की देशाचे मालक आम्ही आहोत, अन आम्ही परतीचं आवतण धाडलं नाहिये.
अन याचेही अर्थ विस्कटून सांगूनही पोहोचत नाहियेत.
मलाच इंग्लिश शिकायला लागेल बहुतेक.
लेट्स ग्रो अप टुगेदर.
इन द मिनव्हाईल, लेट्स एंजॉय बिइंग ज्युव्हेनाईल अँड फ्लाय अ काईट.
धन्यवाद!
अहो इब्लिसशेट, "स्लीप ऑन इट"
अहो इब्लिसशेट, "स्लीप ऑन इट" चा अर्थ जास्त मनाला लावुन घेउ नका. अमेरिकेत तो सर्रास, हलक्या-फुलक्या अर्थाने वापरला जातो. नशिब, मनस्मीने "सक इट अप" हा वाक्प्रचार नाहि वापरला...
अन हेच उद्वेगाने म्हणतोय, की
अन हेच उद्वेगाने म्हणतोय, की नकाच येऊ हो!
उपहासाने सांगतोय, की देशाचे मालक आम्ही आहोत, अन आम्ही परतीचं आवतण धाडलं नाहिये.
अन याचेही अर्थ विस्कटून सांगूनही पोहोचत नाहियेत.>>> तुम्हाला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत आहे पण तुम्ही मूळ वाक्याचा अर्थ लावला आहे तो अचूक नाही. मी किमान अमेरिकेत प्रचलित अर्थ सांगितला. मनस्मि येथे अनेक वर्षे राहिलेला असल्याने व तो लेखही येथे राहणार्यांना उद्देशून लिहीलेला असल्याने तो येथील प्रचलित अर्थाने वापरला असण्याची शक्यता धरावी एवढेच म्हणायचे होते.
http://idioms.thefreedictiona
http://idioms.thefreedictionary.com/sleep+on+it
sleep on it
to not make an immediate decision about a plan or idea, but to wait until the next day in order to have more time to think about it You don't have to give me your decision now. Sleep on it, and let me know tomorrow.
@ फारेण्ड. सध्या तुझ्याकडून
@
फारेण्ड. सध्या तुझ्याकडून काही तरी गल्लत होतेय. या पोस्टचा आणि या बाफच्या विषयाचा काहीच संबंध नाही. इतरत्र कुणीतरी उपहासाने देशाला नावं ठेवत असतील त्यांना उपहासाने उत्तरं दिली असतील तर त्याचे संदर्भ वेगळे असतील. असो. तुझ्या पोस्टी संयत असतात आणि विचार करण्याला भाग पाडतात. हे वैशिष्ट्य या दोन बाफवर जाणवत नाहीये. माफ कर. मी तुला असं बोलू शकतो असं वाटलं.
जे लोक संशोधन करणार्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवतात त्यांचे 'योगदान' होत नाही का? मग हे तक्रार करणारे लोक यातील काहीही करत नसतील हे कशावरून? >>
ते इथंही होतंच कि. उलट इथे काहीही नसताना ते निर्माण करणा-यांचं योगदान विसरून करण्याचं केवळ टीका करण्याचं कारण कळत असून पटत नाही. इथे संगणक क्रांती झाल्यानंतरच सॉफ्टवेअर साठी लोकांना परदेशात जायचा मार्ग खुला झाला. मग सॅम पित्रोदांच्या या सकारात्मक कार्याची दखल नको घ्यायला ? हे बेसिक काम झालं नसतं तर सॉफ्टवेअर मध्ये भारताचा सहभाग दिसलाच नसता. यातही गंमत म्हणजे हार्डवेअर आजही आपण बनवत नाही. तिथल्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणं हे महाग पडत असल्याने भारत आणि आशियायी देशातील सॉफ्टवेअर इंजिनियर्स कडून ते बनवलं जातं. ब्रिटन अमेरिकेतलं योगदान म्हणजे त्यांचा सिव्हीक सेन्स, शिस्त, वैज्ञानिक दृष्टीकोण, सामाजिक प्रगती, औद्योगिक क्रांती, वैज्ञानिक क्रांती, शोधांचं युग, विचारांचा खुलेपणा यात भारतियांचं काय योगदान आहे ? ते तर तिथं जाऊन डेव्हलप होतं. काहिंना त्यासाठी तिथे जावंही लागत नाही. इथे येऊन सिव्हीक सेन्स वरून फक्त आणि फक्त बदडण्याला विरोध आहे. गंमत याची वाटते.
सिंहगडचं उदाहरण इथेही डकवलं आहे. त्याला उत्तर दिलय. राजू हगवणे या लोकल तरुणाने त्याला वाटलं म्हणून सिंहगडावर खूप सुधारणा घडवून आणल्यात. तिथे केवळ पार्किंगची अडचण झाली म्हणून लोकांना सिव्हीक सेन्स नाही असं म्हणणं हे राजू हगवणे व इतरांवर वर अन्यायकारक नाही का ? राजू हगवणे एक छोटा कार्यकर्ता आहे. बदल झाले ते संघटनांच्या प्रेशर खाली. देवटाकं स्वच्छ झालं. परिक्रमा मार्ग सुधारला. रेलिंगचं काम झालं. गडावर दारू पिण्याला बंदी घालण्यात आली. कोंबड्या कापण्याला बंदी घातली गेली. परीसर नजर लागेल इतका स्वच्छ झाला. हे काहीच न पाहता केवळ पार्किंगचा अनुभव देणं हे पटण्यासारखं नाही असं माझं मत आहे. सिंहगडावर आजही भजी सुरेख मिळते. दही घट्ट मिळतं आणि ठेचा भन्नाट लागतो. जशी नजर तसे अनुभव !
सिंहगडावर पार्किंगसाठी कितीशी जागा असणार ? रविवारी पुण्यातले सगळे कार ओनर्स इकडे हजेरी लावतात. वरपर्यंत चढल्यावर पार्किंगला जागा नसते. मग घाटातल्या रस्त्यावर वाहने लागतात. हेच लोक खडकवासल्यालाही जाम करून ठेवतात आणि हेच लोक कुठेही गाड्या पार्क करून इतरांची गैरसोय करतात. पुढच्या वेळी आपली गैरसोय झाली कि मात्र हा देश सुधारणार नाही म्हणून शेरे मारायला हेच पुढे असतात. वृत्ती आहे ही. खडकवासल्यात नेहमी रविवाई होणा-या ट्रॅफीक जाममुळे लोकांनी मिटींग घेतली आणि हा प्रश्न सोडवा म्हणून लोकप्रतिनिधींना गळ घातली. खडकवासल्याचे दिवंगत आमदार श्री. रमेश वांजळे यांनी पुढाकार घेऊन गावाबाहेरून रस्ता काढला. त्यासाठी लोकांनी स्वतःहून जमिनी दिल्या. लक्षात घ्या, या लोकांच्या जमिनी ऑलरेडी धरणात गेलेल्या आहेत आणि अद्याप भरपाई नाही. धरणाचा फायदा मात्र शहराला आहे. या लोकांना सिव्हीक सेन्स नाही ? हा बाहेरून काढलेला रस्ता सिंहगडाला जाताना दिसला नाही ? तीन वर्षात त्याबद्दल माहीती मिळाली नाही ? जे लोक निव्वळ नावं ठेवतात त्यांनी लोकप्रतिनिधींकडून अशिक्षित लोक कसे काम करून घेतात हे पहावं. वाईट याचंच वाटतं कि इतकं करूनही सोकॉल्ड सुशिक्षितांकडून या रस्त्याचा वापर होत नाही. ते जुन्याच रस्त्याने जातात आणि डॅमच्या दुतर्फा पार्किंग करून लोकांची आणखी गैरसोय करतात. स्थानिकांच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. कधी काय होईल सांगता येत नाही. एखाद दुस-याला फटके बसले, गाडीचं नुकसान झालं कि मग परत स्थानिक लोकांची अक्कल काढण्यात येईल. कारण त्यामागची कारणमीमांसा जाणून घेण्यात टीकाकारांना रस नाही.
इब्लीस यांनी म्हटल्याप्रमाणे गडाच्या पर्यटनाला कार कशाला हवी ? खाली प्रशस्त पार्किंग आहे. खालून चढून जाण्यात वेगळाच आनंद आहे. पण पर्यटनाच्या नादात बेसिक गोष्टी विसरायच्या, रविवारी गर्दी होईल याचा अंदाज घ्यायचा नाही आणि थोडावेळ अडचण झाली कि थेट सिव्हीक सेन्स !!
ज्यांनी गडावर विकासकामे केली त्यांना सिव्हीक सेन्स नव्हता का ?
़खूप छान पोस्ट
़खूप छान पोस्ट
इब्लीस यांनी म्हटल्याप्रमाणे
इब्लीस यांनी म्हटल्याप्रमाणे गडाच्या पर्यटनाला कार कशाला हवी ? >> कारला परवानगी नाही असं काही आहे का? कार न्यायच्या नाहित तर रस्ता आणि वर पार्किंगची सोय कशासाठी केलिये?
लोकांनी रस्त्यात कुठेही गाड्या लावून ट्रॅफिक जॅम केला असं म्हणाला तर यात राजू हगवणे आणी त्यांचे इतर कार्यकर्ते यांचा अपमान कसा काय झाल? राजू हगवणे आणी त्यांच्या कार्यकर्त्यांना सिव्हिक सेन्स नाही असं कुणी म्हटलंय काय? ज्या लोकांनी अरूंद रस्त्यावर पार्किंग केलंय त्यांना सिव्हिक सेन्स नाही (यातले काही परतलेलेही असतील, कोण सांगावं?) असं म्हटलं तर त्यात काय चुकलं?
खाली प्रशस्त पार्किंग आहे. खालून चढून जाण्यात वेगळाच आनंद आहे. पण पर्यटनाच्या नादात बेसिक गोष्टी विसरायच्या, रविवारी गर्दी होईल याचा अंदाज घ्यायचा नाही आणि थोडावेळ अडचण झाली कि थेट सिव्हीक सेन्स !! >> प्रत्येकालाच खालून चढून जाता येतंच असं नाही. बरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील त्यांनाही कंपल्सरी चढायला लावायचा गड?
तीन वर्षात असेच अनुभव आले हे पटलं नाही जे बदलणं शक्य नाही दॅट्स ऑल >> तिकडे लेख चालू करताना आधी इथे काय काय चांगलं आहे हेच लिहिलं होतं आणि नंतर काय अडचणी येउ शकतात ते दिलं होतं. चांगल्याबद्दल लिहिलेलं कोणि वाचलेलंच दिसत नाही
...
...
Pages